फैज अहमद फैज हा कवी मित्रकृपेनं भेटला. पुरते शब्दार्थ न कळताही भाषेच्या लयीची भूल पडते नि मागून दमदार अर्थ आकर्षण अधिक सखोल करत नेतात, तसं झालं. कवी असण्यातली सगळी वेडं जगून घेणारा हा कवी. बंडखोर, स्वप्नाळू, धुंद प्रेम करणारा, प्रेम पचवून शहाणपणाचं खंतावलेलं पाऊल टाकणारा. तो गायलाही गेला खूप. वेड लागल्यासारखी मी वाचत, ऐकत, समजून घेत सुटले. १३ फेब्रुवारीला या कवीचा जन्मदिन. त्या निमित्तानं हे साहस.
खरं तर काही ऋणनिर्देश करायला हवेत. पण काही ऋणांतून कधीच मुक्त न होण्यात... वगैरे वगैरे!
हे शब्दश: / अर्थश: भाषांतर नाही. कवितेतल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ चिमटीत धरायचा; की कवितेचं कवितापण, तिच्यातला मूड असा प्रश्न अनेकवार पडला. नि फैजच्या शब्दांना हात घालायचं पाप करतोच आहोत, तर न भिता-न कचरता-मनापासून करू, असं म्हणत मी दुसरा पर्याय स्वीकारला. गायत्री नातूनं मागे केलेली चार भाषांतरं आठवून मी खचणारा धीर सावरला. तिचे आभार मानायला हवेत. वाद होऊ शकतो अनेक गाळलेल्या नि घातलेल्या शब्दांवरून. क्रमावरून. प्रतीत होणार्या अर्थावरून. कुठे भाषांच्या मर्यादा आहेत, कुठे नादाच्या. मला मर्यादा मान्य आहेत. 'हे सापेक्ष आहे' ही इथे पळवाट म्हणून वापरत नाही, मला खरंच असंच म्हणायचं आहे, की हा कवितेनं 'मला' दिलेला अर्थ आहे नि तो प्रत्येकासाठी निराळा असेल.
असो. पुरे. एकदाच माफी मागते.
ही फैज यांची मूळ कविता:
तुम मेरे पास रहो
तुम मेरे पास रहो
मेरे क़ातिल मेरे दिलदार, मेरे पास रहो
जिस घड़ी रात चले,
आसमानों का लहू पी के सियाह रात चले
मर्हमे-मुश्क लिये नश्तरे-अल्मास लिये
बैन करती हुई, हंसती हुई, गाती निकले
दर्द की कासनी पाजेब बजाती निकले
जिस घड़ी सीनों मे डूबे हुए दिल
आस्तीनों मे निहां हाथों की राह तकने लगे
आस लिये
और बच्चों के बिलखने कि तरह क़ुलकुले-मै
बहरे-नासूदगी मचले तो मनाये न मने
जब कोई बात बनाए न बने
जब न कोई बात चले
जिस घड़ी रात चले
जिस घड़ी मातमी सुनसान, सियाह रात चले
पास रहो
मेरे क़ातिल, मेरे दिलदार, मेरे पास रहो
(इथे नायरा नूरच्या आवाजात नि इथे विद्या शाहच्या आवाजात ती ऐकताही येईल. मला विद्या शाहची आवृत्ती अधिक आवडली.)
माझ्यापाशी.
आभाळाच्या रक्तावर पोसलेली धुंद रात्र
काळोखाची लयबद्ध पावलं टाकत येते,
तेव्हा सार्या व्यथांवर क्षणमात्र फुंकर पडल्यासारखी होते.
पण तिच्या पायी कसलेले असतात दुःखांचे खळाळणारे चाळ
आणि हातच्या नक्षत्रांना लक्कन कापून जाणारी हिर्याची धार असते.
तेव्हा,
थांब इथे माझ्यापाशी.
एरवी छातीच्या तटबंदीआड मुकाट राहणार्या काळजांचा सुटू पाहतो ठाव
लागते कुण्या आश्वासक हातांची ओढ,
स्पर्शांची स्वप्नं पडू लागतात...
तिन्हीसांजेला कळवळून रडणार्या पोरासारखा भेसूर सूर असतो ओतल्या जाणार्या मद्यालाही,
अवघ्या अर्थाला निरर्थकाचे वेढे पडतात.
काहीच मनासारखं होत नाही
काही केल्या.
दूरवर कुठेच कुणीच काही बोलत नाही.
स्मशानशांतता पेरत रात्रीची काळीशार दमदार पावलं पडू लागतात.
तेव्हा जिवलगा,
थांब इथे.
माझ्यापाशी.
श्रद्धा, याच कवितेचं भाषांतर करायचा खो घेणार का?
अर्थात! घेतला.
ReplyDeleteमी टाकते दोन दिवसांत. मग आपण एकदमच चर्वितचर्वण करुयात कलेक्टीव्हली.
check one more from Faiz....
ReplyDeletehttp://anaghaapte.blogspot.in/2011/08/blog-post_27.html
Awesome! This is sung very well in te movie "In Custody" aka Muhaafiz. Faiz is at times transcendental...and that's why very haunting!
ReplyDelete@अनघा
ReplyDeleteपान उघडेना. पुन्हा देता का?
@मनिष
हो का? मला 'मुहाफिज'मधलं फक्त 'आज बाजार में पाबजौंला चलो' (http://aligarians.com/2006/12/aaj-baazaar-men-paa-bajaulaan-chalo/) माहीत आहे. तेही बेहद्द शब्दातीत सुंदर आहे. अनेकानेक अर्थांचं नि संदर्भांचं मोहोळ उठवणारं. अनेक पैलू असलेलं.
मेघना,
ReplyDeleteफ़ैजचे आणखी काही ऋणनिर्देश
वेदनेचा वाटसरु-
http://shabd-pat.blogspot.in/2013/02/blog-post_17.html
पूर्ण फ़ैज सिरीज-बोल के लब..१,२,३
http://disamajikahitari.wordpress.com/2013/
आये कुछ अब्र कुछ शराब आये
ReplyDeleteउसके बाद आये जो अज़ाब आये
बाम-ए-मीना से माहताब उतरे
दस्त-ए-साक़ी में आफ़ताब आये
कर रहा था ग़म-ए-जहाँ का हिसाब
आज तुम याद बेहिसाब आये
हर रग़-ए-ख़ूँ में फिर चराग़ाँ हो
सामने फिर वो बे-नक़ाब आये
उम्र के हर वरक़ पे दिल की नज़र
तेरी मेहर-ओ-वफ़ा के बाब आये
इस तरह अपनी ख़ामुशी गूँजी
गोया हर सिम्त से जवाब आये
'फ़ैज़' की राह सर-ब-सर मंज़िल
हम जहाँ पहुँचे कामयाब आये
दिलदार .
ReplyDeleteआधीच सांगितल्यामुळे गाळलेल्या नि घातलेल्या शब्दांनी कविता अनुवादित नाही स्वतंत्र वाटते. ही कविता मी दुरून ऐकली होती, आज पहिल्यांदा त्याचा अर्थ (सापेक्ष) बघितला जातोय, तितकासा कोड सोप्पा नाहीय, श्रद्धाने वाचले नाही का, याच कवितेचं भाषांतर,..
मी डोक्यात घुमवून घेतोय ही कविता आणि लिहितो काही. हरकत,.
ओळख -माफी- मुद्दा ..ऋण फिटता फिटत नाही. पोस्ट आवडली आहे; मात्र कमी -खूप कमी वाटते.
I could find "Raaz E Ulfat" on YouTube from Muhafiz, but couldn't find this one -
ReplyDeletehttp://www.youtube.com/watch?v=RXL7aYCDYCo
one more -
http://www.youtube.com/watch?v=0WObLnPUTds
And this one is my favourite -
http://www.youtube.com/watch?v=cNL45lH5A4Y
दुरित,
ReplyDeleteश्रद्धाच्या नजरेतून सुटलं मला वाटतं. असो. तुम्ही करा याच कवितेचं भाषांतर. तसा तो खो अर्धाच राहिला आहे खरं तर. पोस्ट अपुरी... ठीक. निदान फैजसारख्या कवीबद्दल लिहिताना तरी आपल्या निरर्थक शब्दांचे बुडबुडे टाळता येतील तितके पहावेत, नाही?
मनीष,
अनेकानेक आभार!