Thursday, 19 July 2007

तुम्ही कधी तुमचा एको पॉईंट शोधलाय...?

(शीर्षक: ’...आणि तरीही मी’मधल्या सौमित्रच्या ’एको पॉईंट’ ह्या कवितेवरून.)

"काहीतरी मोठ्ठं-भव्य-दिव्य कर ग..."माझी चिल्लर स्वप्नं ऐकून माझा एक मित्र कळवळून म्हणाला होता!

तेव्हा त्याच्याशी वाद घालणं राहून गेलं होतं. पण ते वाक्य आणि त्याच्यामागची त्याची सच्ची कळकळ डोक्यातून पुसली गेली नव्हती, नाही. तसंच त्याचं कुठेतरी काहीतरी चुकतंय, ही खात्रीही.

तर... हे काही प्रश्न मित्राला -

खरं आहे. काहीतरी मोठ्ठं-भव्य-दिव्य करायला हवंय.

पण ’मोठ्ठं-भव्य-दिव्य’ म्हणजे नक्की काय रे? त्याच्या व्याख्या केल्या आहेस का तू तुझ्यापाशी नक्की? उदाहरणार्थ अमुक इतक्या माणसांवर सत्ता गाजवू शकलो आपण म्हणजे मोठ्ठं? (हे फारच ढोबळ झालं नाही?! बरं, आपण जरा वेगळ्या शब्दांत मांडू - ) अमुक इतक्या माणसांच्या आयुष्याला आकार देण्याची ताकद मिळाली म्हणजे मोठ्ठं? किंवा अमुक इतके पैसे कमवले आणि उर्वरित आयुष्य अधिकाधिक मिळवत राहण्याची बेगमी केली म्हणजे मोठ्ठं? किंवा जगातल्या अमुक इतक्या ठिकाणी आपलं नाव छापून आलं, आपण अमुक इतक्या लोकांना माहीत झालो, म्हणजे मोठ्ठं? परदेशात शिकण्याची, काम करण्याची संधी मिळाली म्हणजे मोठ्ठं? याआधी कुणीच न केलेलं काही आपल्या हातून घडलं म्हणजे मोठ्ठं?

काय? मोठ्ठं म्हणजे नक्की काय?

खरं सांगू? हे निकष नाहीतच एखादी गोष्ट ग्रॅण्ड असण्याचे. मला चढणारी झिंग, माझं समाधान, माझ्या जिवाला लाभणारी स्वस्थता हे खरे निकष. मग जगातली कितीही मोठ्ठी गोष्ट माझ्यासाठी फडतूस ठरू शकते. आणि जगाच्या लेखी कितीही क्षुद्र असलेली गोष्ट माझ्यासाठी स्वप्नवत ठरू शकते.

माझा जीव किती तीव्रतेने, खोलवर गुंततो आहे...
माझ्या टीचभर आयुष्यातलं काय काय पणाला लागतं आहे...
मी किती बेभान सावधपणे खेळात उतरते आहे...
It matters...

हां, आपल्याला खुणावणारे असले खेळ शोधायलाच लागतात आयुष्यात. त्यातून सुटका नसते. ते शोधण्याचे रस्ते, त्यातल्या अडचणी, पुन्हा पुन्हा घेरत राहणारी निराशा आणि तिला वारत पुढे चालत राहण्याची आपली मस्ती... मिळेल... पुढच्या वळणावर असेल... असे स्वत:ला समजावताना येणारे वैफल्य आणि स्वत:च्या शहाणपणाबद्दल येणार्‍या रास्त शंका... हे सगळे अपरिहार्यच.

’मोठ्ठं-भव्य-दिव्य’ या गोष्टीच्या व्याख्या मात्र आपल्या आपण ठरवायच्या.
आपला एको पॉईंट आपला आपणच शोधायचा.

What say?

17 comments:

  1. khara aahe. Jagaache nikaSh laavoon yashaache maap TharavaNyaapexaa aapaaplaa swapnancha gaav, echo point shodhalelaa shreyaskar. "swadharme nidhane shrey:, paradharme bhayaawa:", yaa oLeentoonhi hech abhipret asaave.

    ReplyDelete
  2. मी किती बेभान सावधपणे खेळात उतरते आहे...
    It matters...

    arre wa!!! awadlay... perfect words to discribe the condition...

    ReplyDelete
  3. I guess you are a big fan of Saumitra!

    Tumhi mhanta te patala..aple nikash apanach lavayche apan isolation madhe nahi rahu sahakt..tyamule comparison he honarach. Paisa, Prasidhhi he majhyamate universal nikash ahet.

    ReplyDelete
  4. क्षमा करा, पण प्रस्तुत टिपणाला टाळ्याखाऊ वपुकाळेछाप लिखाणापेक्षा जास्त मूल्य कसे प्राप्त होईल असा मला मनापासून प्रश्न पडला आहे.

    "पिंडात ब्रम्हांड", "परधर्मो भयावह:" यासारख्या वचनांनी त्याला तात्त्विक डूब देता येईलसुद्धा, परंतु मूळ लिखाणातील substanceचा अभाव दडवला जाऊ शकत नाही.

    आपल्या "स्व"शी असणारी commitment हा प्रत्येक सच्च्या मनुष्यमात्राचा स्थायिभाव असला पाहिजे यात शंका नाही. मात्र ज्या पिंडाशी पराकोटीची निष्ठा सिद्ध करायची त्या पिंडामध्ये कलेची उत्तुंग शिखरें सर करण्याची तगमग, ज्ञानमार्गाची न संपणारी वाट पार करण्याची (अंती वृथा का होईना, पण ) आकांक्षा, जग बदलण्याची, त्याला एक जास्त चांगले ठिकाण बनविण्याची ईर्षा, याआधी कुणीच न केलेले एव्हरेस्ट पार करण्यासारखे, "किनारा तुला पामराला" म्हणावेसे वाटण्याजोगे काही करण्याची तृष्णा नसेल तर मग चढणारी झिंग, मिळणारे समाधान, मिळणारी स्वस्थता यामध्ये फार काही profound हाती लागणें दुरापास्त आहे. लिहिलेल्या शब्दांतून, ब्रशच्या फटकाऱ्यातून, गळ्यातील तानेतून, अहर्निश प्रयोगांतून , अथक केलेल्या कामातून जोवर या सगळ्या seemingly chaotic पसाऱ्याला अर्थ देऊ पाहण्याची, त्याचा अर्थ शोधण्याची, अंधारातून प्रकाशाचा एकतरी कण शोधायची कसलीच शक्यता नाही तोवर निव्वळ आत्ममग्नता, निव्वळ आत्मनिष्ठेला एका संकुचित अर्थापलिकडे फार स्थान नाही.

    माझा अभिप्राय कठोर - कदाचित् malicious वाटेल; परंतु त्यामागे लिखाण आणि विचारांचे स्वरूप संकुचित राहू नये अशी कळकळ आहे.

    ReplyDelete
  5. As my friend Amit says - "To each his own!"
    Pratyekache abhaL vegLe, raste vegLe aNi swarg hi vegLa.

    You are right. Appla echo point aapaNach shodhaycha!

    ReplyDelete
  6. @Meghana
    The thought is really good.
    All the best.

    @MuktaSunit
    The ultimate thing is you shold know what you want from your life. Then its better how bigger or biggest/ greatest it gets.

    ReplyDelete
  7. मेघना, आधी पोस्टविषयी: सर्वात आधी स्वःतच्या टर्मस वर जगण्याच्या कैफासाठी शुभेच्छा! रोजच्या rat race मधे आपण कधी सामील होतो, स्वःतची स्वप्न विसरुन यशाच्या उधार व्याख्या कधी जवळ करतो हे ही इथे बरयाच लोकांना कळत नाही. निदान तू स्वःतचं बरं वाईट ऒळखतेस is a big deal. ३ प्रकारचे लोक असतात; ज्यांना कणाच नसतो आणि येणारा दिवस वाकवेल तसे ते वाकतात, दुसरा प्रकार फक्त कणाच ज्यांना असतो आणि परिस्थिती ज्यांना क्रुरपणे तोडू शकते ते आणि तिसरा, तुझ्या शब्दात सांगायचं तर बेभान सावधपणे जे खेळात उतरतात ते. Generally आर्टि लोक दुसरया प्रकारात मोडतात पण तू व्यवहार आणि कला यांच्या मध्यभागी ऊभी राहु शकत असशील, तर you will be the chosen one!!

    आता दुसरा भाग: मी पोस्ट लिहीलं आणि delete केलं कारण somehow मला ते आवडलं नाही. नकळतपणे वैयक्तिक आयुष्याच्या रेघा ओलांडल्या गेल्या असं मला वाटलं आणि म्हणून तो प्रपंच. गेला निम्मा महीना विमान प्रवासात (हवाईसुंदरयांच्या सानिध्यात:)) काढला आणि आत्ता quarterly review नावाचा भयंकर प्रकार पार पाडल्या मुळे लिहीणं वगैरे स्वप्नवतच वाटत होतं but am back now:)

    ReplyDelete
  8. The point from where you can hear the reflected sound is your echo point. One should be able to hear his or her own voice and also its reflections. Reflections should reinforce the truth and originality of your own voice. I think some people doubt if they can hear these reflections or if the reflections are true. Mag tyana kuNitari dusaryani te reinforce karava lagta mag tyana paTata...han he barobar aahe... kiti moorkhapaNa asato to khara... Aaplya antaratmyachya aawajachi reflections aaplyala aiku aali mahnaje zala...tee spashTa aiku aali tar reinforcing dekhil astat....paN aikavi lagtat na... tu aikteyas he vachun lai bara vaTala ni aaplyala 100 takke paTala tu lihilela...:)

    ReplyDelete
  9. For how many days, we are supposed to listen to the same echo? Ye dil mange more..

    ReplyDelete
  10. Aho Meghana baii.. liha ki ata tumhi hi nav post! itakya saglyana agraha karataay ani swat: lihayala visrataay hoy? ..

    Do write more often gal!

    ReplyDelete
  11. मॅडम, मी तर सध्या संथ प्रवाहात अडकलोय .. तुमचं काय चालू आहे. लिहा की काहीतरी ... की तुम्ही पण टुलिपच्या मागे निघालात?

    कोणीच का नाही लिहीत काही. अभिजीतनं ते अधिवेशन लिहीलं आणि गेला स्वत: अधिवेशनाला ... संवेदनं कोर्ट चालू केलं आणि स्वतः शांत झाला ... टुलीप तर जगजाहीरपणे संपावर गेलीय.

    प्लीज ... लिही ना काहितरी.

    ReplyDelete
  12. Yes thats true, yeh dil maange more. :-)
    -Vidya

    ReplyDelete
  13. echo point sapadat nahiye ka?...to nanatar shodh.....liva kaytari navin....

    ReplyDelete
  14. Meghana,
    It is true that one should define his/her own echo point. It helps us to make a plan, channelise our energies, and take suitable action to achieve that goal.
    The challenge is - how well/accurately can we define that goal?
    Others will always 'advise' - but one has to define the echo point himself/herself.

    Keep writing.
    ~Ketan

    ReplyDelete
  15. back after almost 2 months ... so scanning all my favorite blogspots again ... came across this one ...

    छान विषय निवडलायस ... मलाही आठवते मी बऱ्याच जणाना ऊगाच ग्यान देताना की कुछ बडा सोचो ... पण खरं सांगू ... तू म्हणतेस ते सगळे पटले ... पण समोरा समोर बोलताना, आपले स्वप्न सांगताना, किंवा स्वतःवर टिका करताना खरे दिसून येते की खरच मला स्वतः जे करतोय त्यात काही point दिसतोय का ते. अणि ते जर नसेल, तर समोरचा माझ्यासारखा आरडा ओरडा करतो की ... बडा सोचो.

    बडा म्हणजे काय ... मोठ्ठे म्हणजे काय हे जरी प्रत्येकाच्या लेखी वेगळे असेल, तरी मोठ्ठे विचार करताना, किंवा करताना, जे समाधान येते चेहऱ्यावर ... एकुणच वागण्यात, ते सर्वांचे थोडे फार सरखेच असते [:)]

    what say?

    ReplyDelete