हे गाणं
आपल्या नॉस्टाल्जियाचा भाग असल्यामुळेच आपल्याला आवडत असणार, एरवी यात काय आहे, अशी मी
स्वतःची समजूत काढत असे. कारण पडद्यावर चित्ते, वाघ, झेब्रे इत्यादींची आठवण करून देणारी टाइट्समधली
शिल्पा शेट्टी आणि केसाळ छाती दाखवणारा अक्षयकुमार. त्यांच्या नाचाच्या मुद्रांचा
- खरं तर हातवाऱ्यांचा, let's
be realistic! - गाण्याच्या
बोलांशी काहीही संबंध नाहीय. पूर्ण गाणंभर ते एकमेकांवर शरीराच्या मांसल भागांनिशी
धडका देणे, घासणे, कुरवाळणे, जवळ येणे-लांब जाणे... अशा गोष्टी करतात. 'शरीराचा आवेग नावरे आवरीता' हेच काय ते कोरिओग्राफीमधलं विधान आहे.
पण
तरीही... गाणं नुसतं ऐकलं, तर ते कमालीचं गोड आहे.
शब्दांत एक प्रकारची चलबिचल, अनिश्चितता आहे. 'या माणसावर जीव जडलाय खरा, पण हा देईल ना साथ, की दुसऱ्या कुणाला जवळ करेल लहर फिरल्यावर?', 'बोलून दाखवू का हिला मनातले मोह? की लाजून दूर करेल?'... अशा शंकाकुशंका बोलून दाखवणारे - न दाखवणारे दोन नवे प्रेमिक. आणि त्या हळुवार संकोचांना आणि आवेगांना साथ दिल्यासारखी गाण्याची सुरावट.
कडव्याची सुरुवात अगदी खालच्या सुरात, मनातलं गूज बोलून दाखवावं हलकेच, अशी तिच्या आवाजात होते. मग तिथून तिचा हात हातात
घेऊन दाणदाण पायऱ्या चढून वर जावं तसा गायक वर जातो आणि खड्या आवाजात तिला उत्तर
देतो. तिथून तिनं लाजून त्याला पुन्हा थोडं खाली आडोशाला न्यावं, तशी धीम्या सुरातली कबुली... ध्रुपद... पुन्हा हाच खेळ. अशी
जुगलबंदी या गाण्यात कुमार सानू आणि अलका याज्ञिक मनसोक्त रंगवतात.
पडद्यावर
हे हाताळू शकणारा कुणी दिग्दर्शक मिळाला असता, तर हे
गाणं कुठच्या कुठे गेलं असतं, अशी चुटपुट वाटल्याशिवाय राहत नाही.
~
चुरा के
दिल मेरा गोरिया चली - २
उड़ा के
निंदिया कहाँ तू चली
पागल हुआ
दीवाना हुआ
कैसी ये
दिल की लगी
चुरा के
दिल तेरा चली मैं चली
मुझे
क्या पता कहाँ मैं चली
मंज़िल
मेरी बस तू ही तू
तेरी गली
मैं चली... चुरा के दिल मेरा...
अभी तो
लगे हैं चाहतों के मेले
अभी दिल
मेरा धड़कनों से खेले
किसी मोड़
पे मैं तुमको पुकारूं
बहाना
कोई बना तो ना लोगे
...अगर मैं बता दूं मेरे दिल में क्या
है
...तुम मुझसे निगाहें चुरा तो ना लोगे
...अगर बढ़ गयी है बेताबियां
...कहीं मुझसे दामन छुड़ा तो ना लोगे
कहता है
दिल धड़कते हुए
तुम सनम
हमारे हम तुम्हारे हुए
मंज़िल
मेरी बस तू ही तू - २
तेरी गली
मैं चली...
चुरा के
दिल मेरा गोरिया चली
चुरा के
दिल तेरा चली मैं चली...
नही
बेवफ़ा तुम ये मुझको खबर है
बदलती
रुतों से मगर मुझको डर है
नई
हसरतों की नई सेज पर तुम
नया फूल
कोई सजा तो ना लोगे
...वफ़ाएं तो मुझसे बहुत तुमने की है
...मगर इस जहाँ में हसीं और भी हैं
...कसम मेरी खा कर इतना बता दो
...किसी और से दिल लगा तो ना लोगे
धीरे
धीरे चोरी चोरी आके मिल
टूट ना
जाये प्यार भरा दिल
मंज़िल
मेरी बस तू ही तू - २
तेरी गली
मैं चली
चुरा के
दिल मेरा गोरिया चली
~