Saturday, 26 May 2007

प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे...

खरंय...

आपल्याला कित्ती कित्ती वाटलं असं असावं म्हणून, तरी आपल्याला एकाएकी उडता थोडंच येणार असतं? नसतंच.

’आत्त्त्त्ताच्या आत्त्त्त्ता पाऊस हवाय’ असं कित्ती पोटातून वाटत असेल तरी आपल्यासाठी एप्रिलमधे पाऊस येतो थोडाच? नाहीच येऊ शकत.

’जगातल्या सगळ्याच्या सगळ्या संध्याकाळी कुठेतरी सुरक्षित ठिकाणी पुरून आपण विनासंध्याकाळच्या प्रदेशात राहायला जावं’ असं किती मनापासून वाटलं तरी संध्याकाळ चुकवता येते थोडीच? रोजच्या रोज देणेकऱ्यासारखी संध्याकाळ येतेच. ऑफिसातही येते...

’संदीपला खरंच कळत असेल का तो म्हणतो ते सगळं, की बाकी साऱ्यासारखा हाही भ्रमच?’ या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळावं असं किती वाटलं म्हणून ते मिळतं थोडंच? समोरच्या माणसापर्यंत नेमकं काय आणि किती पोचतंय, त्याचे अंदाज करणं तेवढं हातात आहे, हे कितव्यांदातरी कळून घ्यावं लागतंच.

ही मेघना पेठे एवढं सगळं समजूनसुद्धा एखाद्या निगरगट्ट आणि शूर माणसासारखी कसं पेलू शकते जगणं, असा आदरयुक्त अचंबा वाटला तरी आपण तिच्याएवढे शूर होऊ शकतो थोडेच? आपण परत परत त्याच त्या आशाळ तडजोडी करत राहतोच.

आपल्या काळजाच्या देठापासून हवं म्हणून, आपली जिवाजवळची गरज म्हणून ... काही घडत नसतंच.

’आवर्तन’मधली सुरुचीची बहीण नाही का म्हणते प्रॅक्टिकली - ’आपल्याला हवं असणं आणि ते मिळणं यांचा आयुष्यात एकमेकांशी काही संबंध तरी असतो का दीदी? तूच सांग.’

खरंय. नसतोच.

18 comments:

  1. Recalled a quote after reading the post "Getting what you want is success. Wanting what you get is hapiness."

    ReplyDelete
  2. प्रश्न?प्रश्न??प्रश्न??? हे पडले नसते तर आपण आजही या झाडावरुन त्या झाडावर उड्या मारत हिंडलो असतो नाही? (माझ्या कवितांना माझा एक मित्र प्रश्नार्थक कविताच म्हणतो:))

    ReplyDelete
  3. ho g... asa nastach....
    ktti manapasun watla tari....

    ReplyDelete
  4. काही प्रश्नांना उत्तरे नसतात हेच खरे.
    पण अशा प्रश्नांमुळेच जीवन ’इंट्रेस्टिंग’ बनते हेही तितकेच खरे!

    ReplyDelete
  5. sundar aani tochnare lihale aahes.

    ReplyDelete
  6. chhaan lihilayes! pan nakki kay zalaye?

    ReplyDelete
  7. @आनंद
    खरं सांगू, हातात मिळालेल्या गोष्टीवरती समाधान मानणं मला कधीच नाही जमत. मला हवं ते, तसं, तेवढं आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे तेव्हाच. इच्छेचा कोंभ मरून गेल्यावर काय गंमत...
    येस, नाईलाजको क्या इलाज!

    @रंजीत, सहज
    मनापासून आभार. :)

    @संवेद, दी किंग
    'काही जण प्रश्न पाळतात तर काही जण उत्तरं..'(कॉपीराईट: राहुल)
    आपण बुवा प्रश्न पंथातले! आभार! :)

    @स्नेहल
    ह्म्म्म.....

    @अभिजीत
    मनापासून आभार. दाद दिल्याबद्दल आणि त्याहून जास्त ’पण काय झालंय?’ विचारण्यातला कन्सर्न पोचला म्हणून. फारसं काही नाही. मला रडारड करायला कायपण पुरतं!!!

    ReplyDelete
  8. surekh zalay lekh. suneetabainchya 'aahe manohar tari' madhil suruvatichya prakarananchi aaThavaN zali.

    ReplyDelete
  9. मला वाटतं प्रश्नांची उत्तरं .. निदान असल्यातरी .. माणसांनी स्वतःमधे शोधावी. एप्रील मधे पावूस हवा असा हट्ट करण्यापेक्शा एकतर तो असेल तेंव्हा भरपूर लुटावा आणि दुसरं एप्रीलचा पाऊस हा नाहीतरी काल्पनीकंच म्हणून कल्पनेतच भिजून घ्यावं. कल्पनेतलं भिजणं तुझ्यासारख्या माणसाला माहिती असेलंच.

    नाही म्हटलं तरी माणूस हा प्रश्नांचाच बनला आहे .. ज्यांना उत्तरं मिळतात ती माणसं ते सांगायला जगत नाहीत. शक्य झाल्यास dineshmadne.blogspot.com वाच. असं काही विशेष नाहीये तिथं पण कदाचीत तुला पटेल असं काहितरी असेल. कालच लिहीलय.

    ReplyDelete
  10. aawadala...paN sagale prashnanche tukade nakaranni ka jodale aahes?...kahi shahaNyasarakhe prashna padale tar hokar suddha miLtil kadachit..?..."ho na" :)

    ReplyDelete
  11. ही कल्पनेत भिजायची आयडिया भारी आहे!!! खरंय... थोडे शहाण्यासारखे प्रश्न पाडून घेतले तर बरं होईल.. :P

    ReplyDelete
  12. तू अभिजितला लिहील्यासारखं तुलाही विचारायचं का? फार भाव खाते रावं...
    लिहा की आता...

    ReplyDelete
  13. abe lihi aata....
    konpan lihit nahiye....mala kantala alay...attachya atta post lihi....

    ReplyDelete
  14. नमस्कार,

    तुमचा ब्लॉग नुकताच वाचला. आवडला. तुम्ही माझ्या टिपणाबद्दल दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

    खरे तर आगंतुकपणे सूचना द्याव्यात असा मी कुणीही नव्हे. आणि अनाहूत सल्ल्यांचा त्रास होतो हेही मला माहित आहे. पण तुमचे "प्रश्नोपनिषद" वाचून जे वाटले ते लिहीत आहे. त्यामध्ये खडूसपणा नाही.

    सर्वप्रथम म्हणजे तुमच्या या ब्लॉगमधून तुमची संवेदनशीलता दिसते यात शंका नाही. तुमच्या एकंदर लिखाणाचा तो जीवनरस आहे असे जाणवते. या दृष्टीने, लेखिका बनण्याकरता असणारा कच्चा माल म्हणा, इमारत-उभारणीकरता लागणारे बांधकाम-साहित्य म्हणा , अगदी नक्की आहे. आणि पहिल्या प्रतीचे आहे. या संवेदनशीलतेच्या बरोबर आहे ते म्हणजे पर्सेप्शन. (सॉरी, मराठी शब्द चटकन आठवत नाही.) म्हणूनच मग एखाद्या कवितेच्या ओळींपाशी तुम्ही रेंगाळता , त्या शोषून घेता. पर्सेप्शन नसते तर त्या ओळी ओलांडल्या असत्या विशेष लक्ष न देतां.

    परंतु, विचारांच्या या तुकड्याना बांधणारा एक अजून घटक असतो. कोहीरंस. (सॉरी, पुन्हा मराठी शब्द चटकन आठवत नाही). या सर्व इतस्ततः फिरणाऱ्या तुकड्याना बांधणारी एक साखळी. किंवा भावानुभवांचा पुंज सामावणारा, गोळीबंद आकृतिबंध. तर हा कोहीरंस तुमच्याकडे हवा , असे मला वाटले बुवा.

    मनापासून जे वाटले ते लिहिले. आगाऊपणा वाटल्यास आधीच क्षमा मागतो.

    ReplyDelete
  15. आम जनतेला writer's block आला का? का आला? कोणीच का लिहीत नाही?

    ReplyDelete
  16. काय झालं बाईसा? हे वागनं काय बरं न्हवं बगा. किती दिस झाले, रोज येताव आन जाताव बगा आम्ही तुमच्या दारामंदी ... तुमचं काय नवीन लिवायचां मेळ जमना झालाय बगा. जरा करा की डोक्याचा चुरा आन लिवा की आता. बखळ आराम केलावा. जरा हात पाय हालवा की!

    ReplyDelete