"भंकस ही कधीपण क्रिएटिव्हच असते..दर वेळी नवीन करावी लागते ना ती!"
"हे काय च्यायला, तुम्ही एखादी गोष्ट शिकवणार, म्हणून काय आयुष्यभराचे राजे? जमणार नाही."
असली त्याची मुक्ताफळं ऐकून सुरुवातीला मी त्याला सिरियसली घेतलंच नाही. तसा फारसा नव्हताच तो ऑफिसात. आधी हात मोडला म्हणून, मग पाय मोडला म्हणून; साहेब जवळ जवळ चार महिने रजेवरच होते. नंतरच आमची जरा जरा ओळख व्हायला लागली. संध्याकाळी फारच वैतागला तर गप्पा मारायला म्हणून येत असे तो माझ्या डेस्कजवळ. कॉलेजमधली मस्ती, फिल्म फेस्टिवल, नाटकं, संदीप, कंटाळा.... असल्या कसल्याही गप्पा. मग हळूहळू त्याचं एखादं वाक्यं नकळत डोक्यात राहून जायला लागलं.
”’आपण’ का नाही लिहित काहीतरी?"
"शोधा म्हणजे सापडेल. पण काय शोधायचं ते माहीत नाही, असंच झालंय ना ’आपलं’?"
"मग? पुढे काय शिकायचा विचार आहे ’आपला’? हे टीचर्स ट्रेनिंग का काय ते ’आपण’ नाही करणारे का?"
हा ’आपण’चा खास वापर - समोरच्याला ऑफ गार्ड पकडणारा. ही त्याची खास लकब लक्षात यायला लागली, तेव्हाच त्याला ’हॅपी गो लकी’ म्हणून टाईपकास्ट करायचं मी बंद केलं असावं. निमित्त त्याचं झालं. पण मग आजूबाजूची सगळीच, मी द्विमित म्हणून फुली मारून टाकलेली, माणसं माझ्या लेखी हळूहळू त्रिमित व्हायला लागली ती त्याच सुमारास.
सतत पॅटर्नल वागून समोरच्याला पंखाखाली घेऊ पाहणारा एक मित्र. त्याच्यापासून सुरक्षित अंतरावर राहून त्याच्या आक्रमक पालकत्वाचा राग येऊ न देता त्यातली फक्त आस्था तेवढी उचलायला शिकत होते. मात्र त्यातही त्याचं समोरच्या माणसाबद्दलचे आडाखे बांधणं थांबत नाही हे जाणवलं तेव्हा मला ’जग उफराटं आहे’ असा धक्कादायक साक्षात्कार झाल्याचा आठवतो...!
नवीन काहीही करा-शिकायचा प्रचंड उत्साह असलेला एक मित्र. त्याचं फ़्रस्टेशन आणि ’क्या यार, कम से कम सपने तो बडे देखने चाहिये...तभी तो कुछ कर सकते हैं..’मधून लख्ख दिसणारा त्याचा निरागस स्वप्नाळूपणा. तो पाहूनच मी माझ्या निष्क्रिय कडवटपणाला दटावायला लागले नकळत.
जाड भिंगांचा चष्मा आणि चेहऱ्यावरचे ’बाळू’छाप निरागस भाव घेऊन असलेला एक मित्र. बोलता बोलता कधी विकेट काढेल याचा काही नेम नाही मात्र. ऐकणारा पार गारच.
पुरुष हा विषय आयुष्यातून एका समंजस शहाणपणाने बंद करूनही कडवट न झालेली एक मैत्रीण...
इतक्या सरळपणे - खरं तर मूर्ख म्हणावं इतक्या सरळपणे - वागून इतकी वर्षं कसे टिकले असतील इथे, असं आश्चर्य मला नेहमी वाटायला लावणारे फिलॉसॉफर बॉस...
ज्याला पाहून मला न चुकता दर वेळी भारत सासणेंच्या ’रंगराजाचा अजगर’ या कथेची आठवण येते, असली राजकारणं खेळणारा एक टीम लीडर. पण तशीच त्याची अंगावर घेतलेले पंगे एन्जॉय करत निभावून नेण्याची खुजलीही....
ही आणि अशी कितीतरी माणसं. जिवंत. आपापला इतिहास-भूगोल घेऊन येणारी. माझ्या असण्यावर रिऍक्ट होणारी. मला रिऍक्ट व्हायला भाग पाडणारी. एकाच वेळी प्रेमळपणे काही देऊ करणारी आणि त्याच वेळी आपल्या निखळ स्वार्थानं मला चकित करून टाकणारी...
त्यांच्या असण्याचं भान मला त्यानं पुरवलं. त्याचा तसा उद्देश होता असं अजिबातच नव्हे. कदाचित त्याचा अंगभूत चांगुलपणा असेल किंवा स्वत:चा अहंकार सुखावण्याची गरजही. किंवा दोन्ही. किंवा या दोन्हीबरोबर कुठेतरी काठ शोधायची माझी आत्ताची गरज.
काहीतरी झालं खरं.
म्हणूनच परवा तो बोलता बोलता सहज बोलून गेला ते वाक्य तेव्हा मी चमकले.
" तुला असं नाही वाटत मी बरेच दिवस तुझ्याशी बोलून या सगळ्याची तयारी करून घेतोय...? It's time to get married..."
म्हणजे? तू कोण माझ्या आयुष्यात काहीतरी ठरवायला येणारा? मी तो हक्क अद्याप दिलेला नाही कुणाला. इतकी माझी काळजी का करावी कुणी? मला नाही आवडत कुणी इतकं पर्सनल झालेलं...
अशा संतप्त, कडवट प्रतिक्रिया उमटून गेल्या डोक्यात. पण मागोमाग आवंढाही आला एकदम. पुढे-मागे काही बोलताच येईना. तो क्षण तसाच रेटून नेताना पुरेवाट झाली...
आणि मग कळलंच मला एकदम - इतके दिवस या माणसांना खोटी खोटी, आपल्या आयुष्यात नसलेली, निव्वळ सोईपुरती माणसं समजत होतो आपण. ते तसं नाहीय.
One can't afford to treat the world like a lifeless thing. It's a whole, live, throbbing life... react to it.
Thanks friend, for making me see it. Thanks.

पु. ल. म्हणतात तसे ... एखाद्याची वेवलेंथ कोणाशी का जुळावी ... आणि का जुळू नये ... हे काही सांगता येत नाही. गोष्टी असतातच बाजुला कदाचीत, पण आपल्याला डोळे उघडल्यावर दिसतात. आता कोण डोळे उघडवतो ... त्याला काहीजण चांगला मित्र म्हणतो तर काही जण आणि काही
ReplyDeleteअसो ... छान लिहीलेयस. आवडले एकदम. :-)
arre!!!!
ReplyDeleteapla jag badalayla hawach... its a survival need....good... i think u r going to find life....bara watatay g jade.... hold it just hold it... pan mala asa watatay now no need to...u got the key....
मेघना, ही पहिलीच भेट आणि आणखी तुमचं घर तसं पूर्ण पहायचं राहिलंय. पहिलीच खोली पाहिली आणि आवडेल असं वाटतंय. परत येईनच. पण जाता जाता एक विचार.
ReplyDelete”’आपण’ का नाही लिहित काहीतरी?" या विचारानं मला मागल्या काही दिवसात अथवा महिन्यात इतक्यांदा डिवचलंय की तुझ्या ब्लॉग मधे वाचल्या बरोबर असं वाटलं "अरेच्चा, हे तर आपलंसं काहितरी आहे".
असू दे. येतो परत सगळं वाचायला. लिंक तर save केलीचंय.
Hi Meghana,
ReplyDeleteYou write with an amazing intensity. And I also like your choice of words, especially the ones you use in the heading/title of a post.
Sahi aahe! Wishing you very best for the future posts!
Keep writing.
~Ketan
p.s. Thanks for the comment on my blog.
This comment has been removed by the author.
ReplyDelete@रोहित
ReplyDeleteThanks a lot!
@snehal
:)
मजा येतेय!!!!
@mad-z
लिहिण्याबद्दल -
लिहीत तर आपण असतोच. निदान मी तरी लिहीत होते. पण ते असं कुणालाही वाचण्यासाठी खुलं करून ठेवणं... I was not sure.
पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण लिहिलेलं वाचून, जाणीवपूर्वक समजून, कुणी काही प्रतिक्रिया दिली तर आपण मनापासून खुश होतो; तेव्हा मी ’मी छापण्यासाठी लिहीत नाही’ अशी शेखी मिरवणं सोडून दिलं.
म्हणून तर माझ्या मित्राचा ”’आपण’ का नाही लिहित काहीतरी?" हा प्रश्न मला चांगलाच ’लागला’!!!
Thanks for your comment.
@monsieur_k
तुमचा ब्लॉग बरेच दिवस वाचत होते.
Thanks for your appreciation.
:)
Awesome dear!!!!!!!!!!!!!!!!!!!
ReplyDeletemaja aali, so "aaapan" worked .
keep it up yaar!!!! startup is really nice! jarasa "aalas" nahi kelas tar maja yeil; baki sagale nimittmatra!! but one thing is for sure, U have got that touch.
Aj prathamach tumcha blog vachla! Chhan ahe.
ReplyDeleteKeep it up:)
मस्त लिहितेस..
ReplyDeleteखूप आवडलं !
chhan lihilayes. paN suruwatilach muLi tu jagala, ani aju-bajuchya lokanna tuzya ayushya pasun vegala kasa thevu shakalis?
ReplyDeletemaja ahe, tu tyanna samavun ghyayala shikate ahes, ani kuna kunala matr lokanna vegaLa kadhun apala ayushya tyanchya pasun IMMUNE karun ghena shikava lagata. :-)
neat & good post! keep blogging!
मेघना, अप्रतिम लिहितीस तू... खुप Rich आहे article...
ReplyDeleteBlogger वर नवीन असलेल्या मला आता माझं लिखाण अगदीच बाळबोध वाटायला लागलंय :)
Chhan lihile aahes, Meghana! Lekh Avadala!
ReplyDeleteThis is the first I came to your blog and fell in love with it. Chaanach lihile aahes. I liked the last few lines very much....
ReplyDelete"म्हणजे? तू कोण माझ्या आयुष्यात काहीतरी ठरवायला येणारा? मी तो हक्क अद्याप दिलेला नाही कुणाला. इतकी माझी काळजी का करावी कुणी? मला नाही आवडत कुणी इतकं पर्सनल झालेलं...
अशा संतप्त, कडवट प्रतिक्रिया उमटून गेल्या डोक्यात. पण मागोमाग आवंढाही आला एकदम. पुढे-मागे काही बोलताच येईना. तो क्षण तसाच रेटून नेताना पुरेवाट झाली..."
I could imagine your reaction so well. Very well written.
-Vidya.
@अभिजीत
ReplyDeleteएक प्रकारचा अंगभूत माणूसघाणेपणा! :P
BTW Do you remember -
"sawaashNine jasa kumku lavayacha vrat ghyava, tasa blogger var account open karaNaryanni hi livayacha vratt ghyava.. :-D (dive ghyaa!!!)"
मी विसरले नाहीय! Thanks a lot for your comment(s)!!!
@yogesh
Come on!!!
@रणजीत, विद्या
Thanks. :)
माणसं सहज पणे आयुष्यात येतात आणि जातात. त्यांनी अमुकतमुक सारखं असावं हा आपला अट्टहास. प्रत्येकासाठी मुशी शोधणं, त्या साच्याबाहेर कुणी वागताच धक्का लागणं...खरच आपल्याला सगळी माणसं सारखीच असायला हवी असतात?
ReplyDeleteचला...एकूणात मजा आली...
पुढच्या लिखाणाची वाट बघू
@प्रमोद
ReplyDelete:))))))))))
@आनंद, संपदा, संवेद
थॅन्क्स.
:)
म्हटलं पंधरवडा ऊलटला. ताट रिकामं झालं. काही वाडा हात कोरडा पडण्याआधी. नाहीतर धुवायलाही नाही जमायचा.
ReplyDeleteलवकर लवकर काहीतरी गरम लिही. खूप भूक लागलीय.
hey...masta....i discovered your blog today.....mhanaje aadhi vachala hota pan ha lekha vachalyavar jasa appeal zala tasa zala navata....karan mazahi agadi asach hota....upajat manusghanepana yes...prayatna karunsuddha jaat nahi..keep it up..
ReplyDeletehmmm sahi hai ye teree philosophy! bar mag AAPAN kaay kartaay sadhya? :D :P
ReplyDelete