तिच्याकडे म्हणे
साक्षित्वभावानं पाहावं
चहूबाजूंनी नीट न्याहाळून, निरखापारखावं
मंद स्मितहास्य करावं तिच्याकडे पाहून.
मग ती विझते म्हणे आपोआप.
म्हणे.
कसलं काय.
तशी ती विझत असती तर काय हवं होतं?
आपली सावली लहानमोठी होत सतत सोबत यावी जशी,
तशी आपल्यात वस्तीला येते तहान.
पायात पायात येत राहणाऱ्या लाघवी चिकट पोरासारखी.
अर्ध्यात जाग आल्यानं अपुऱ्या राहिलेल्या आणि दिवसभर स्मृतीला हुलकावण्या देत डोक्यात धूसर तरळत राहणाऱ्या स्वप्नासारखी.
एखाद्या टळटळीत माध्यान्ही चिडून पायाखाली घ्यावी तिला आणि थोटकाचा निखारा चिरडावा तसं चिरडत, तुडवत, ठोकरत जावं, असंही होतं एकेकदा.
जमतं, नाही असं नाही.
पण दिवसाचे प्रहर चढत जातात
तसतशी ती पुन्हा चिवटपणे उगवते, वाढते, फोफावते.
एकेकदा तर रात्रीही.
चांदण्याला पूर यावा आणि एखाद्या बेशरमाच्या झाडानं पुरानं वाहून आणलेल्या गाळाच्या त्या सुपीक जमिनीत ताडमाड बहरून यावं,
तशी ही बया आपली हजरच.
जा बये, जा... असा चरफडाट होतो.
तहानेला जितकं पाणी पाजाल,
तितकी ती आगीसारखी लवलवत राहते, वाढतपोसत राहते, अंगचीच होते, बहरून येते, मिरवताही येते...
असंही एक म्हणे.
माझ्यासारख्या हट्टी माणसांना मात्र तिच्याशी काही केल्या जमवून घेता येत नाही,
तिला मिरवता तर येत नाहीच,
तिला नांदवूनही घेता येत नाही.
तिला कसं वारायचं,
कसं ठार करायचं,
कुठे पुरायचं...
हेच प्रश्न वारंवार.
इतके,
की त्या प्रश्नांचीच एक नवी तहान.
तहानेला पिल्लू व्हावं आणि पिल्लांनाही पिल्लं, तशी तहानांची गोजिरवाणी तान्ही पिल्लं... सूडावून सगळीभर.
साक्षित्वभाव वगैरे शब्द फोलपटासारखे उडून गेलेले वाऱ्यावर.
आपण सैरभैर होऊन
तहान ल्यालेले अंगभर,
तहानच झालेले अंगभर.

सुरूवातीला वाटलं, सावली आहे पण मग तहानेवर आलो, शेवटी तर साक्षित्वभाव शोधत राहिलो..
ReplyDeleteहा झाला माझा कानोसा, पण सांगतो शब्द थेट इथे भिडले आहेत..
आभार.
Deleteमला काहीच चूकबरोबर अर्थनिर्णयन करायचं नाही. तसं यातून जाणवत असेल, तर हे फसलं आहे सरळसोट. बाकी आपापले अर्थ.
तहान नसेल सावलीसारखी. कदाचित आपण सगळेजण तहानेच्या सावल्या (किंवा प्रतिबिंबे) आहोत. तहान बघत असेल आपल्याकडे. हे सगळं आपण साक्षीत्वभावाने बघू शकतो का?
ReplyDeleteकदाचित. विज्ञानही असंच सांगतं, की आपणच आपल्या जनुकाच्या सावल्या. पण जनुकांना असतो का साक्षित्वभाव? त्यांना ते अंग नसेलच, तर त्यांच्यासाठी झगडाही नसेल. नुसतं जगत-फोफावत जाणं. सोपं आहे. पण बोअरिंग, इजंट इट?
Delete