Friday, 7 January 2011

गालिब, तू कुठे आहेस?

कुणी आत्महत्या करायचं नक्की कधी नक्की करतं?
असतो असा - एकच एक क्षण?
एखादी फिल्मी शाम-ए-गम?
एखादी लांबलचक काळीकुट्ट रात्र?
एखादी भण्ण उदासलेली दुपार?
असतो असा - एकच एक क्षण - नक्की बोट ठेवता येणारा?

एखाद्या बोगद्यातून जात जात जात जात जात जात जात राहावं-
अंतरं कापण्याचं त्राण तर दूरच -
दूरवरचा उजेडाचा ठिपकाही भासमान वाटत जावा.
अशा
ना दिवस ना रात्र
ना आत ना बाहेर
ना जागृत ना निद्रिस्त -
अशा उंबर्‍यावरच्या संदिग्ध ठिकाणी स्वत्त्वाचं भान हरपलेलं असताना कधीतरी -

तुटून जात असेल दोरी.

मग काही अस्पष्ट स्मृती गेल्या जन्मातल्या उत्कट दुःखांच्या
पाऽर मागल्या बाकावरून मान उंचावून उंचावून पाहाव्यातश्या
झगमगत्या
चुटपुटत्या
पाहता पाहता निसटून जाणार्‍या.

मग एक निर्वात पोकळीतलं बधीर आयुष्य.
अंगावर ओरखडाही न उठू देणार्‍या गेंडाकातडीतलं.
लांबलचक, सुखासीन.

त्यात नेमका क्षण कसा शोधणार?

असतो का खरंच असा एकच एक क्षण, नक्की बोट ठेवता येणारा?

9 comments:

  1. कोई उम्मीद बर नहीं आती
    कोई सूरत नज़र नहीं आती

    आगे आती थी हाल-ए-दिल पे हंसी
    अब किसी बात पर नहीं आती

    मौत का एक दिन मु‘अय्यां है
    नींद क्यूं रात भर नहीं आती

    अशीच एखादी रात्र?

    ReplyDelete
  2. माहीत नसल्यास पूर्ण गझल: http://www.urdupoetry.com/ghalib37.html

    ReplyDelete
  3. खरंय..तो क्षण सापडणं, तो जगणं आणि तगणं- किती हवंस अन नकोसही..
    कोई आहट नही
    बदन में कही
    कोई साया नही है
    आखों में...

    ReplyDelete
  4. फार सुरेख. असा क्षण असावा - शतआर्तींची बेरीज होत जात जात.

    इथल्या एका वाळवंटातली सफर आठवली. नेहमीप्रमाणे बाजूने पाहिल्यावर त्रिकोणी दिसणार्‍या वाळूच्या टेकड्या. वार्‍याच्या दिशेला पाठ करून असणार्‍या. मात्र हळूहळू वारा वाळूचे कण त्या टेकडीच्या माथ्यावर वाहून नेतो. ते ओझं वाढत वाढत 'डोई'जड झालं की टेकडी ढेपाळते. तिच्याच पायथ्याशी पण जरा पुढे सरकून मग नवीन तयार होते. शेकडो मैलांची वाटचाल करत आलेलं ते ट्रॅव्हलिंग वाळवंट आता आठवलं. असो, अगदीच अवांतर झालं का? (मीही 'वाहवत' गेलो म्हणायचं लिहिता लिहिता :))

    ReplyDelete
  5. आपल्याच कवितेचं विच्छेदन करावं लागणं म्हणजे तिच्या अपयशावर शिक्कामोर्तबच. ('मला असं नव्हतं म्हणायचं, असंअसं म्हणायचं होतं' असं म्हणावं लागणं हीच एक नामुष्कीची गोष्ट.) पण तरी करते -
    मला आत्महत्या अभिप्रेत होती, ती कलाकाराच्या निर्मितीच्या झरा आटून जाण्याच्या संदर्भातली. ही प्रक्रिया कितीही पराधीन असली, परिश्रमासारख्या गोष्टीवर अजिबात अवलंबून नसली - तरी कलावंताचा काहीएक निर्णय असेलच की त्यात. जसा विंदांचा होता, किंवा लिहिण्याहून अधिक महत्त्वाच्या अशा जगण्याच्या धबडग्यात सापडलेल्या आणि त्यामुळे जगणं हीच अभिव्यक्ती असं मानून मूक झालेल्या कलावंतांचा असतो... किंवा यांपैकी काहीही न होता, निव्वळ बेपर्वाईनं पाठ फिरवत जाणाऱ्या कलावंताचा असतो... किंवा एखादी कलाक्ऱुती करून त्याच्या स्म्ऱुतींवर जगत राहणाऱ्याचा असतो...
    त्या आत्महत्येबद्दल मला बोलायचं होतं. म्हणून तिचं शीर्षक सौमित्रच्या कवितेची आठवण करून देणारं. आपल्यातली कविता संपून चालली आहे म्हणून व्याकुळून गालिबचा शोध घेणाऱ्या कवीची ही कविता.
    समजून वाचायचा प्रयत्न करणाऱ्या आणि कळकळीनं प्रतिक्रिया देणाऱ्या वाचकापर्यंत प्रयोगाचं फसलेपण पोचावं, म्हणून ही कबुली. :(

    ReplyDelete
  6. "मौत का एक दिन मु‘अय्यां है
    नींद क्यूं रात भर नहीं आती"

    kyaa baat hai!

    ReplyDelete
  7. मौत तू इक कविता है,
    मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको

    डूबती नब्ज़ों में जब दर्द को नींद आने लगे
    ज़र्द सा चेहरा लिये जब चांद उफक तक पहुचे
    दिन अभी पानी में हो, रात किनारे के करीब
    ना अंधेरा ना उजाला हो, ना अभी रात ना दिन

    जिस्म जब ख़त्म हो और रूह को जब साँस आऐ
    मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको

    ReplyDelete
  8. khup bahri.....mala tar Mukul Shivputranchi aathvan zali....ek gayak kalavanta ....asach pratibha sampat aalyane vyakul,kasavis zalela....

    shabdat nahi sangta yet...

    ReplyDelete