काही पत्रं लिहिली जातात, पण इच्छित मुक्कामी पोचतातच असं नाही. कधी पोचतात, पण वाचणाऱ्यापर्यंत पोचतात असं नाही. ही अशीच काही पत्रं. अर्ध्यात राहिलेली.
एक काळ असाही होता, जेव्हा तुला फोन करावा, तुझा फोन यावा असं सतत वाटत असे. आता तसं असत नाही. आपण हल्ली एकमेकांना लिहितोही क्वचित. नुसती भांडणं करण्यापेक्षा नकोच ते, असं वाटून थांबलो का आपण? माहीत नाही.
आपण भेटतो तेव्हाही काही हिशोबांची परतफेडच तर करायची असते फक्त. अपेक्षा असतात. अपेक्षाभंग असतात. मग वाट्टेल तसं अद्वातद्वा बोलणं असतं; नाही तर ओठ आवळून गप्प बसणं तरी असतं. प्रश्न असतात... असंच करायचं आहे का आयुष्यभर? याचसाठी केला होता अट्टाहास?
उत्तरं नसतातच.मग अजून भांडणं, चिडचिड, त्रागा, वैताग ...
खरोखर तुला नाही या साऱ्याचा त्रास होत? की तू इतका विचारच करत नाहीस या साऱ्याचा? तू खरोखरच मला गृहित तर धरून चाललेला नाहीस ना?
मलाच कितीतरी वेळा प्रश्न पडतो, का कुणाला तरी हवं असावं मी? तुला इरिटेट होईल इतक्या वेळा हा प्रश्न मी तुला विचारलेला आहे. होय ना? पण तो मला खरोखरच सतावतो. वाटतं, या मुलाने आपल्या असण्यात फक्त सोय तर नाही ना पहिलेली?
हा तुझ्यावर अन्याय असेलही कदाचित. पण तसा तो व्हायला माझ्याइतकाच तूही कारणीभूत आहेस मित्रा. तुझ्या आयुष्याबद्दल काय ठाऊक आहे मला?
तुझा जन्मदिवस, पत्ता, कुटुंबीयांचे तपशील, रंग-वजन-उंची-पगार हे सारे तपशील कदाचित सांगू शकेन मी. पण एकमेकांशी जोडलं जाणं इतकंच असतं फक्त? तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणालाच सांगता येणं शक्य नाही आणि तुला सांगितल्याशिवाय ज्याची पूर्तताही व्हायची नाही असं काहीतरी माझ्यापाशी असतं. आपण एकमेकांना हा मान, ही जवळीक देऊ करतो तेव्हा इतर कसल्याही तपशिलांनी येणार नाही इतके जवळ येतो. असा एकच क्षण येऊन पुरत नाही. त्या एका क्षणानं खूण पटेल कदाचित एकमेकांची. पण तिथेच थांबत नाही ते. अशा एका क्षणापासून दुसऱ्या क्षणापर्यंत, दुसऱ्यापसून तिसऱ्यापर्यंत ... असे असंख्य प्रवास करायचे असतात.
Am I sounding too romantic or filmy? May be...
हे इतकं बटबटीत आणि फिल्मी वाटत असेल तर मग माझी तोकडी भाषाच त्याला कारणीभूत आहे.
मी मागेही एकदा तुला लिहिलं होतं - कधी कधी सध्या, रोजच्या बोलण्यातून सूर जुळत जतात. समोरचा माणूस जे बोलत असतो, ते आणि तेवढंच बोलत नसतो तो. ऐकू न येणारं, पण जाणवू शकणारं असंही बरंच काही असतं. ते ऐकू यायला लागतं - पटतं, तेव्हा तर आपण अधिकाधिक मोकळे होत जातो.
कधी कधी मात्र असे सूर नाहीच जुळत. किती वचावचा बडबड केली, तरी आपण तस्से कोरडेच राहतो.
अलीकडे मला हे फार जाणवतं. तुझ्या असण्याबद्दल मनातून आनंद- आनंद नाही दाटून येत. आपण एखादी बिझिनेस मीटिंग आटपावी, तसे भेटतो. चार पुस्तकांबद्दल चार ताशेरे झाडतो, दोन टोमणे मारतो, आणि आपापल्या वाटेने चालते होतो.
इतकंच असायचं होतं का या साऱ्याचं आयुष्य? इतकंच मिळायचं होतं आपल्याला एकमेकांकडून?
माझ्याकडे उत्तरं नाहीत मुला. मला त्रास देणारे प्रश्न मी संगतवार मांडायचा प्रयत्न करते आहे फक्त. मी फार कोरडी आहे स्वभावानं. तुझ्या-माझ्या नात्यात तर फारच. आपल्याकडून कुठून कसल्या प्रेमा-मायेचा अंशही निसटता कामा नये, म्हणून स्वत:वर पहारा देत असल्यासारखी वागते मी. तसेच स्पर्शाबाबतचे माझे संकोच...
या साऱ्याला मी काहीच करू शकत नाही मुला. मी अशी अशी आहे, इतकंच म्हणता येतं फक्त. म्हणून का तू असा रेषा आखून दिल्यासारखा बाहेरचाच झालास?
परवा संध्याकाळी सैरभैर झाल्यासारखी झाले होते मी. उगाच रडायला येत होत. सिनेमा पाहताना मॅडसारखं एकटीनंच रडून घेतलं मी. कारण? ठाऊक नाही. वाटत होतं, किती मोठी मोठी स्वप्नं पाहतो आपण.. आणि प्रत्यक्षात मात्र हातात काहीच मिळत नाही. जेमतेम भाकर तुकडा मिळवण्याचे हिशेब, अजून पैसे मिळवण्याचे काटेकोर क्षुद्र बेत.. घर नि दार... हे काय होऊन बसलंय... असे काहीतरी निराशावादी विचार. आता नवे बेत करायचं वय सरत चालल्याची घाबरवून टाकणारी जाणीव. 'सामान्यपण’ स्वीकारणं फार जड जात होतं...
त्या क्षणी मला इतकं प्रचंड एकटं वाटलं -
आपल्याला जिथे तुटतं आहे, ते कुणालाच - दुसऱ्या कुणालाच - सांगून समजणार नाही अशी भयानक खात्री माझी मलाच. आणि त्याचंही वाईट वाटतंच आहे...
ब्रह्मांड अनुभवलं.
पण तेव्हाही, निसटता प्रयत्न तरी करून पाहू असं म्हणूनही, तू नाही आठवलास.
हे आत्ता. आपण अजुनी एकमेकांच्या आयुष्याशी अधिकृतपणे - समाजमान्य पद्धतीने जोडलेही गेलेलो नसताना.
का रे हे असं होऊन बसलं?
की हे असंच असायचं असतं?
इतकंच?

hmmmmm.....
ReplyDeletei was expecting this....
ventilator!! fine...
keep it up
ज्या भावना शब्दबद्ध करनं अवघड असतात त्या तु अगदी समर्पकपणे केल्यास अस वाटतं..anyway it happens everywhere..पण जो भोगतो त्यालाच हे माहित असतं..हेच खरं...
ReplyDelete1) Let your mind go and your body will follow.
ReplyDelete2) Fear makes you hesitate - Hesitation makes worst of your fears come true.
I read these words in a movie - (Keanau Reaves, Kurt Russell) - may be they will help.
Keep writing.
Thanks a lot for your comments.
ReplyDeleteपण तेव्हाही, निसटता प्रयत्न तरी करून पाहू असं म्हणूनही, तू नाही आठवलास.
ReplyDeleteहे आत्ता. आपण अजुनी एकमेकांच्या आयुष्याशी अधिकृतपणे - समाजमान्य पद्धतीने जोडलेही गेलेलो नसताना.
>>>
lihilas te manapasun vatat asel tar ajun pudhe jodaychya adhich todun taak. meleli naati farapatat nevu nayet pudhe.
lihit raha. it helps:D.
सुंदर! "अखियों के पानीमें रखना वो चिठ्ठीयॉं" काय सुंदर title दिलं आहेस, अगदी समर्पक.
ReplyDeleteसवयीची झाली की नाती अळवाच्या पाना सारखी होतात; आभासी ओली!पण म्हणून ती नसतातच असं ही नाही. एक क्षण, एक प्रसंग परत जिवंतपणा आणायला बाकी असतो.Otherwise असण्या नसण्याचे सारे संदर्भ फार तात्कालीक असतात
ट्युलिप -
ReplyDeleteखरंय, it helps!
संवेद -
असण्या-नसण्याचे संदर्भ फार तात्कालिक असतात>>>
खरंय. पण म्हणून ते कमी महत्वाचे नसतात. असल्या तात्कालिक गोष्टी आपापली ठाम मागणी आणि मुद्रा घेऊन येतात. त्या नाकारता येत नाहीत.
You don't have choice.
:)
"अप्रतीम" हा शब्द इथं वापरणं चुक आहे. बहुधा जे सोसलंय ते कागदावर ऊतरवलयंस तू. भावनांना वाट करून दिली की त्या अडचण बनंत नाहीत आणि मला वाटतं अशा परिस्थीतीत जर कुणी अशा रितीनं विचार मांडू शकेल तर आपला फ़क्त "सलाम".
ReplyDeleteतुझे सारे प्रश्न पटले. बहूतेक इजाजत मधला डायलॉग आहे - सारांश फ़क्त लक्शात आहे - रिश्ते जब पुराने हो जाते हैं तो सडने लगते हैं असं काहीतरी आहे. हे असं होणं आवश्यक नसतं आणि unfortunately ते टाळताही येत नसतं. टाळण्यालायंक असतं तर घडलंच नसतं. एक गोष्ट मात्र खरी - नात्यात आदर नसेल तर ती नाती ऊखडायला वेळ नाही लागंत
संवेद म्हणतो "असण्या-नसण्याचे संदर्भ फार तात्कालिक असतात". मला नाही पटंत ते. माझ्या मते, असणं आणि नसण्यातील फ़रकावरच नाती जीवंत रहातात. नात्यातला गोडवा किंवा कटूता फ़क्त या सत्यतेवरच जगतो वाढतो आणि संपतो.
असो. ईच्छा एकच. तूझा/झी कोणी मित्र / मैत्रीण सोबत असो. रडणं वाईट नाहीये. एकट्यात रडायला लागण्म दुख्खदायक असतं. "नाचीकेताचे ऊपाख्यान" मधे नचिकेत म्हणतो "हवं तेंव्हा हवा तो माणूस न येणं हाही नरकंच".
टाळण्यालायंक असतं तर घडलंच नसतं.>>>
ReplyDeleteहे मात्र खरं.
Thanks for your comment. :)
This comment has been removed by the author.
ReplyDeleteChhan lihile aahes - vaachun agadi vapuncha 'Partner' athavala!
ReplyDeleteShevati I feel that every individual is responsible for his / her own state of life. May it be happy or sad. One likes to hold others responsible especially for problems, but it is not right most of the time. Courage / Positive thoughts can help one glide through and win over rough patches and emotions. Really touching article. Be Brave! Stay Good!
Ithe lihu ki nako asa vichar karat mailach lihavi asahi vichar kela. Pan vatala kadachit te jast hoil ka? Aso...felt as if i have been there too.
ReplyDeleteMy experience says, when you cant keep it,break it. And let the time heal the wound. It definitely helps you get over it. And when you look back, you feel that yes, I have taken a right decision when required. And then it doesnt hurt as it used to.
-Vidya.
अभिजीत, रणजीत, विद्या -
ReplyDeleteThanks for your concern.
ही पोस्ट लिहिताना मला ’लिहू की नको..’ असं झालंच. आणि अपेक्षित असल्याप्रमाणे ’काय गरज आहे? Leave it now, come out..'अशा प्रतिक्रिया भोवतालातून मिळाल्याच. तरीही, ’आपण उगीच सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करत नाहीयोत ना..’ असा प्रश्न मलाच पडूनही हे लिहिलं.
Now I understand, it was just a need to share. Sometimes it's needed. Thanks.
Hey Meghana,
ReplyDeleteitk saar sangitlyanantr mi kaay vegl saagnaare kappl arthat khoop vel houn gelay hya sarya goshteena tarehee... I think lihun mokle hoto aapn.. tasech kahis zaal asnaar