Tuesday, 18 January 2022

प्रायश्चित्त

तू ज्या-ज्या गोष्टीला स्पर्श करशील, त्या-त्या प्रत्येक गोष्टीला आग लावून टाकीन असं ठरवलं मी. 
मग मला इतका माग ठेवायचापण कंटाळाच आला. 
हो कौन आप,
की इतके कष्ट वेचावेत, असं झालं. 
पण मधला प्रदेश बेचिराग होऊन बसला तो बसलाच. 
त्याची चूक नव्हती असं तरी कसं म्हणणार?
सगळ्यात सगळ्यांची चूक असतेच. 
प्रायश्चित्त लाभतं,
वा नाहीही.
आपापल्या नशिबानुसार,
आणि आपापल्या वकुबानुसार.

No comments:

Post a Comment