एकच एक लालबुंद तीक्ष्ण रेशीमधागा
ओवलेला सगळ्यातून.
दिसतोही लोभस तो.
कुठल्याच रंगाशी विजोड दिसत नाही.
मृगाचा किडा सोडावा कुठेही आणि त्याची रेशमी, जिवंत चमचम भरून घ्यावी नजरेत,
तरी मन भरूच नये
तसं काहीतरी.
एरवी सुटं सुटं होऊन,
घरंगळून गेलं असतं वाटेत
हळूहळू,
असं बरंच काही साधंसुधं-सुती,
काही कलाबतूसारखं भरजरी,
काही दणकट दमदार उत्कट वासाचं,
काही थोडं अप्रिय,
काही कृत्रिम पोताचं,
काही अंगासरशी घट्ट वेढून बसेल असं...
सगळं त्या धाग्यात
जोडलं गेलेलं.
सगळीभरून सळसळत गेलेला चमकदार सर्प असावा,
पार दिसेनासा झाला तरी ऊर धपापत राहावा,
थांबूच नये,
तसं काहीतरी.
दचका भरवणारं, पण अतीव आकर्षक.
सोसत नाही...
आता हळूहळू
धाग्यानेही विरत, सुटवंग होत जावं.
सुटं करून वाटभर विखरून टाकावं
सगळं ओवून घेतलेलं.
गाठी सुटाव्यात.
रंग फिके व्हावेत, ओसरावेत.
वेढे सैल पडावेत.
धाग्यानं धागा उरू नये...
मग
फुलं उमलतील.
ओवलेला सगळ्यातून.
दिसतोही लोभस तो.
कुठल्याच रंगाशी विजोड दिसत नाही.
मृगाचा किडा सोडावा कुठेही आणि त्याची रेशमी, जिवंत चमचम भरून घ्यावी नजरेत,
तरी मन भरूच नये
तसं काहीतरी.
एरवी सुटं सुटं होऊन,
घरंगळून गेलं असतं वाटेत
हळूहळू,
असं बरंच काही साधंसुधं-सुती,
काही कलाबतूसारखं भरजरी,
काही दणकट दमदार उत्कट वासाचं,
काही थोडं अप्रिय,
काही कृत्रिम पोताचं,
काही अंगासरशी घट्ट वेढून बसेल असं...
सगळं त्या धाग्यात
जोडलं गेलेलं.
सगळीभरून सळसळत गेलेला चमकदार सर्प असावा,
पार दिसेनासा झाला तरी ऊर धपापत राहावा,
थांबूच नये,
तसं काहीतरी.
दचका भरवणारं, पण अतीव आकर्षक.
सोसत नाही...
आता हळूहळू
धाग्यानेही विरत, सुटवंग होत जावं.
सुटं करून वाटभर विखरून टाकावं
सगळं ओवून घेतलेलं.
गाठी सुटाव्यात.
रंग फिके व्हावेत, ओसरावेत.
वेढे सैल पडावेत.
धाग्यानं धागा उरू नये...
मग
फुलं उमलतील.
अप्रतिम...
ReplyDeleteआभार. :)
Deleteमस्तच.Meghana.
ReplyDeleteएका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जातांनाची अस्थिरता जाणवली, रूढ स्वरूप तोलण्यासाठी हवेसे नकोसे छेद घेणं देणं म्हणजे उमलणं का...?
ReplyDeleteमाझ्या कल्पनेत उमलणं सहजस्फूर्त, विनायास असेल. पण तुमच्यासाठी असेल तो अर्थ तुमचा. :)
Delete