सांस्कृतिक कार्यक्रम तसे गावाला नवे नव्हेतच. गाणं, नाटक, चर्चा-बिर्चा, मुलाखती, व्याख्यानं... सगळ्यात तशी वरघटून गेलेली मी. पण परवाच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला जाताना मात्र बर्याच दिवसांनी जुन्या घरी परतल्याचा ’फील’ यावा, तसं झालं. प्रत्यक्षात अप्रूप-कौतुक किती होतं मला कार्यक्रमाचं कुणास ठाऊक.. ’फॉर ओल्ड टाईम्स सेक...’ प्रकारच्या हुरहुरत्या-निसटत्या आनंदाचाच भाग जास्त असल्यासारखा...
नाटकाच्या जादूनं इतकं भारल्यासारखं व्हायचं, की साधं ग्रीन-रूममधे शिरतानाही बेक्कार धडधडायचं छातीत. त्याला कितीसे दिवस झाले? ए. सी., पर्फ्यूम्स, मेक-अप आणि चहा यांचा तो विलक्षण उत्तेजक गंध. आनंद, एक्साईटमेंट आणि एक विचित्र दडपण यांनी वाढलेले छातीचे ठोके. तिथल्या मंद-सोनेरी प्रकाशातला, धीरगंभीरपणे मेक-अप उतरवणारा वीरेन्द्र प्रधान आणि त्याचा शांत आत्ममग्न चेहरा. इतका लख्ख कोरला गेला आहे तो डोक्यात, की अजुनी ’स्ट्र’ला त्याचाच चेहरा दिला जातो आपसूक...
प्रमुख पाहुणे म्हणजे आपल्या बापाची जहागीर असल्याच्या थाटात उत्सुक चाहत्यांवर डाफरणारे मंडळाचे दीडशहाणे कार्यकर्ते आणि त्यांना शहाजोगपणे बाजूला सारून, चुपचाप आत घुसून आशुतोष गोवारीकरला गाठणारी मी. त्याच्या रोखठोक प्रामाणिक मुलाखतीचे रंग डोक्यात पुरते ताजे. त्याच्या किंचित मिश्कील, प्रश्नार्थक मुद्रेला तसंच हसर्या नजरेचं उत्तर देत त्याला विचारलं होतं, द्याल का सही? ’हात्तेरेकी!’ असं म्हणून त्यानं झोकात सही करून दिली तेव्हा त्याच्यावरही क्षणभर विश्वासच नव्हता बसला...
तसाच मारे जागा धरून ठेवायला म्हणून घाईघाईत गाठलेला सेवासंघातला सानेकरांच्या गज़लांचा कार्यक्रम आणि जेमतेम साडेतीन प्रेक्षकांनी ’भरलेला’ तो भला मोठा हॉल. आयोजक, माझ्यासारखे कुणी तीन-साडेतीन अतिहौशी रसिक आणि चक्क वाती वळायला येऊन बसलेल्या एक ’ए’कारान्त आजीबाई. आयोजकांच्या वतीनं मलाच मनापसून शरमल्यासारखं झालेलं. आणि तरी आश्चर्यकारक चढत्या गतीनं रंगत गेलेला तो कार्यक्रम. त्यातल्या ’तुझ्या डोळ्यांमधे गहिर्या, असा मी हिंडतो आहे’नं किती काळ साथ पुरवलीय...
शनिवारची रिकामी संध्याकाळ बळेच भरून टाकायला ’मॅजेस्टिक’मधे टाकलेली चक्कर आणि काउंटरपाशी गप्पा मारणारे चक्क आख्खे जिवंत खरे-खुरे सामंत. त्यांच्या हातात त्यांचंच कोरं पुस्तक कोंबत त्यांची सही मागितली, तेव्हा ’अरेच्चा, मला ओळखता की काय’ असं काहीसं पुटपुटत त्यांनी नाव विचारलं. आणि ते सांगितल्यावर ’वा, वा... पेठे व्हा’ असं म्हणाले. त्या सगळ्या अनपेक्षितपणाच्या आनंदात मित्राशी झालेलं एक मोठ्ठं भांडण आपणहून मिटवून टाकलेलं आणि ती उदास रिकामी संध्याकाळ पाहता पाहता रंगीत-झगमगती होऊन गेलेली...
’ग्रहणम्’ नावाचा एक अप्रतिम सुरेख सिनेमा फेस्टिवलमधे पाहिलेला. बाईच्या आयुष्याचे सगळे चढ-उतार आणि त्याबद्दलची तिची सोशीक सखोल समजूत... हे सगळं टिपलं होतं त्यानं त्या लहानश्या कथानकात. तेही काळ्या-पांधर्या रंगांत. त्याचं जाडेभरडेपण अधोरेखित करून दाखवायला म्हणून त्यानं अखेरीस वापरलेल्या काही लख्ख रंगीत, उजळ फ्रेम्स... काय माध्यमावरची पकड म्हणावी ही, अशा कौतुकात थेटराबाहेर पडत असतानाच समोर उभा राहून हसतमुखानं अभिनंदनं स्वीकारणारा दिग्दर्शक. अगदी आपल्या वयाचाच असावा इतका पोरगेलासा ताजा-हसरा चेहरा. परवा-परवापर्यंत त्याचं कार्ड जपून ठेवलं होतं नकळत...
आभारप्रदर्शन ऐकून उगाच रसभंग होईल याची प्रामाणिक भीती आणि म्हणून उद्धटपणाचा आरोप पत्करून मेघना पेठेची मुलाखत ऐकून घाईघईत काढलेला पळ. तेव्हा खुद्द तिची सही घ्यायला जायचीही भीतीच वाटली होती, इतका अनाघ्रात ताजा अनुभव रक्तात साठवलेला. मग तो सगळा अनुभव कागदावर ओतेपर्यंत कुणाशी बोलायलाही जमलं नव्हतं धड...
आणि तरीही...
परवा सौमित्रची मुलाखत ऐकायला जाताना मलाच माझा उत्साह लटका वाटणारा. तिथे जाऊनही मी ’हॅट, मराठी पुस्तकांच्या दुकानाचा वर्धापनदिन आणि जमलेली सगळी टाळकी पेन्शनीत निघालेली, मरणार वाटतं खरंच भाषा माझी..’ असल्या व्यर्थ चिंतेत चूर. सौमित्र आणि प्रभावळकर अशी स्टार दुक्कल समोर असूनही मी मुलाखतकार बाईंच्या शाळा-मास्तरू प्रश्नांवर उखडलेली. सौमित्रनं सादर केलेली कविताही चक्क ’बिलंदर सराईत परफॉर्मन्स’ वाटला मला...
घरी परतताना ’वा, मजा आली’ असं म्हणायचं असल्यास, तशी मुभा होतीच. पण का कुणास ठाऊक, असं म्हणायला जीभ रेटेना... एक्साईट होण्याच्या स्वत:च्या संपून गेलेल्या क्षमतांवर, उलटणार्या दिवसांसोबत स्वत:त येत गेलेल्या निबरपणावर चरफडावं; की ’आता असे उठल्या-सुटल्या कशानंही भारावून नाही जात आपण... शहाणे-बिहाणे झालो की चक्क’ अशी स्वत:चीच पाठ थोपटावी ते कळेचना...
संदीपचे शब्द आठवले परत एकदा (!) - ’शेपटीच्या टोकावरचे हट्ट सरऽऽऽळ होत जातात...’
तसंच की काय हे?
वाढत्या वयासोबत येत गेलेली ही ’सो कॉल्ड’ मॅच्युरिटी की नुसतंच मद्दड कातडीचं निबरपण...
की एकाच नाण्याच्या दोन अपरिहार्य बाजू?

आरे व्वा! मीच पहिला.
ReplyDeleteतुझ्या ही लक्षात आलच असेल .. आज माझा काही काम करायचा मूड नाहीये. म्हणूनच तुझ्या ब्लॉगवर २ कमेंट्स टाकून आता ही तिसरी :).
सर्वप्रथम ... नेहमी सारखाच झालाय .. अगदी मस्त.
"वाढत्या वयासोबत येत गेलेली ही ’सो कॉल्ड’ मॅच्युरिटी की नुसतंच मद्दड कातडीचं निबरपण" ... पण बहुधा उत्तर तूच दिलयस. एकाच नाण्याच्या दोन बाजू. फ़क्त वेळ प्रसंगी नाण्याचं कोणतं अंग उघडायचं हे जमलं की खरी मॅच्युरिटी .. नाहितर मग रद्दड मद्दड कातडीच.
आणि बाय द वे .. ऑक्टोबर म्हणजे इथं फ़ॉल ... आणि बहुतेक तू तो सेलेब्रेट करतेयस. तुझ्या ब्लॉगमधे याच महिन्यात सर्वात जास्त पोस्ट्स आहेत :)
आणि शेवटी जाता जाता ... व्हेअर आर यू? अमेरीका की हिंदुस्तान? जर इथं अमेरिकेत असशील तर तुला देखील आज काम नाहीये असं दिसतंय आणि जर देशात असशील तर झोप येत नाहीये असं वाटतंय. जा बाईसाहेब .. झोपा!
suTlich aahes tu...sahiye..
ReplyDeletemagalya varshi maujechya ankatale kahi lekh vachale tevha mala kunitari vicharala ki kase aahet....tevha mi mhaTala hota ki varshakathi ekhada marathi pustak/anka yeto aajakaal hatat...tyamuLe mala kay paN changlach vaTTa...tyamuLe mazya drushTine tuzya prashanala uttar "maturity" asa aahe...
baki ugich chaghaLat basayacha asel ha vishay sunya RM var firtana tar scope aahe bharpur..paN ugich..maturity ch mazyamate...
paN kay surekh paragraphs aahet junya aathavaNinche...sevasanghat, shanivari sandhyakaLi bhakas vatnarya shalanchya sabhagruhat...aaThavala sagaLa...varNana ekdam chhan...nice!!...barichashi vaiyaktik paN tarihi sarvatrik...
hmm...loss of innocence aaNi kwachit cynic vaaTu shakaNaari maturity...don viruddha Toka nahi vaaTat...rather tu mhaNates tasha ekaach naaNyaachya don baju.
ReplyDeleteमेघना - तु एकेक ’सही’ विषयांबद्दल बोलायला लागलिएस. तुझं हे पोस्ट वाचल्यावर इतर वाचली, मग कमेंट्स वगैर झोल मध्ये या पोस्टचे डीटेल्स विसरलो (आणि मागे जायचा कंटाळा आलाय).
ReplyDeleteपण तरी -
मुलाखतींचं म्हणशील तर युजुअली मुलाखतकार पकाऊ असतात. एकेकाळी दूरदर्शन वर ’प्रतिभा आणि प्रतिमा’ कार्यक्रम लागायचा - त्यातले मुलाखतकार भारी होते. (मला सुधीर गाडगीळ एकेकाळी आवडायचे पण त्यांच्या ’चित्तपावन’ लेखापासुन नकोनकोसे होतात. परवा सिऍटलमध्ये दिसले होते - मी त्यांना शिस्तीत टाळलं! :)))))
सौमित्रचं बोलायचं तर -
’डी.एस.के. गप्पा’ मध्ये त्याची आणि संदीपची एकत्र मुलाखत गाडगीळ डी.एस.कें.च्या एका ’वैताग डिजाईन’ बिल्डिंगच्या गच्चीवर घेणार होते.
य गर्दी.
मराठीत बोलणारे म्हातारे कोतारे झाडुन हजर.
सौमित्रला मुंबईहुन यायला उशीर झालेला.
मग संदीप आणि इतर बळचकर विनोद करीत तास हाकावा लागला.
मग किशोर (कदम i.e. सौमित्र) आला.
मग धो-धो पाऊस आला.
बिल्डिंग डी.एस.कें.ची असल्याने किंवा आपण ’उपहार सिनेमा’ पासुन काहीही न शिकल्याने गच्चीतुन उतरायला एकच वाट.
लिफ्ट बंद.
आणि उतरणारे लोक सॉलिड म्हातारे.
नाहीतर सॉलिड पुणेकर.
सांगायचा मुद्दा काय - तर सगळे लोक कंपल्सरी भिजले.
मग खालच्या कुठल्याशा हॉल मध्ये लाऊडस्पीकर नसताना (कि आवाज घुमत असल्याने तो बंद केल्या कारणाने) त्याने एकही पुस्तक/वही न उघडता आणि न (ऍक्चुअली एकदाच) अडखळता त्याने ज्या कविता ऐकवल्या....
केवळ!
इथं मुद्दाम नमूद केलंच पाहिजे ते म्हणजे - पुणेकरांचं ज्या कधीकाळी कौतुक करावंसं वाटतं - ती म्हणजे ही वेळ. चिडीचुप शांतता, कवितेची आवड, रिदम ब्रेक होणार नाही याची काळजी घेऊन केलेल्या फर्माईशी....लई भारी.
थोडक्य़ात काय - तर मुलाखत जमुन यायला - जाणता मुलाखतकार, जाणता कवी, जाणते चाहते (आणि जाणता पाऊस) - एवढं सगळं जमुन यायला लागतं.
ते यावेळी आलं नाही, म्हणुन उगीच चुकीचे निष्कर्ष काढुन चिडचिड नाही करुन घ्यायची.
(ही कमेंट इथेच संपवणार होतो, पण तेवढ्यात डोक्यात विचार आला -
आणखी थोडी कळ काढली असतीस तर सौमित्र बाहेर चहाच्या टपरीवर भेटला असता. आणि मग त्याने एखाद्या कडव्यात संध्याकाळीची भरपाई केली असती!
अर्थात चहाच्या टपरीपेक्षा सौमित्र जवळच्या ’ताडीमाडी’ दुकानात सापडण्याचीच शक्यता जास्त!
आता एका पायमोडक्या लाकडी टेबलवर एक कलरलेस ताडीची बाटली, पाणी, दोन पिवळट पडलेले (टपरीवरच्या चहाच्या पेक्षा थोsssडे मोठे) ग्लास, शेंगदाणे आणि एकमेकांना टाळ्या देणारे सौमित्र आणि प्रभावळकर - हा सीन इमॅजिन करुन मला हसू आवरत नाहिए!)
आणि काउंटरपाशी गप्पा मारणारे चक्क आख्खे जिवंत खरे-खुरे सामंत. त्यांच्या हातात त्यांचंच कोरं पुस्तक कोंबत त्यांची सही मागितली, तेव्हा ’अरेच्चा, मला ओळखता की काय’ असं काहीसं पुटपुटत त्यांनी नाव विचारलं. आणि ते सांगितल्यावर ’वा, वा... पेठे व्हा’
ReplyDeleteमग, आता काय बुवा...मजा आहे एका माणसाची...पेठे होणार तुम्ही!!
मी दोन-तीनच चांगल्या मुलाखती ऎकल्या आहेत, रिमा आणि सुभाषच्या त्यातल्याच. ग्रेस नी मात्र लोणच घातलं. कशाचा कशाशीही संबंध नव्हता :)
@ मॅड्झ
ReplyDelete"वेळ-प्रसंगी नाण्याचं कुठलं अंग उघडायचं ते कळलं पाहिजे..."
तिथेच तर लोचा! आणि ऑक्टोबर सेलिब्रेशनबद्दल म्हणशील, तर तसं झालंय खरं! अंगात येतंय, तोवर घुमून घ्यावं अन् काय!!!
@ ए सेन मॅन
मराठी वाचनाच्या बाबतीत तुझी इतकी उपासमार का झालीय? काहीही चांगलंच वाटावं इतकी?!
@ नंदन
'सिनिक'. परफेक्ट शब्द. याच शब्दासाठी डोकेफोड केली खूप वेळ. पण रामा शिवा गोविंदा, आठवेचना! धन्यवाद.
@ अभिजीत बाठे
मुलाखतकार पकाऊ असतात हे खरं. पण त्या बाईनं तरी किती पकाऊ असावं! समोर किशोर कदम आणि प्रभावळकर बसलेयत आणि तिचं आपलं "तुम्ही वाचलेलं पहिलं पुस्तक कोणतं?" आणि "भा. रा. भागवत कित्ती छान लिहायचे नै?" असलंच कायच्या काई चाललेलं. वर "अनु मलिकनं किती सुरेख केलाय गांधीजींचा रोल.." वगैरे तपशिलाच्याही घनघोर चुका. थोडंतरी होमवर्क करावं की नाही माणसानं? वरून किशोर कदमला विचारताहेत मॅडम, "तुझ्या घरी वाचनाचं वातावरण होतं का? त्यानं खूप फरक पडतो... हल्लीच्या मुलांना वाचनाची गोडी आपणच लावायला हवी..." इत्यादी इत्यादी.
मग तेच बिचारे दोघं जण समजून बाईंवर फारशी वेळच नाही येणार बोलायची, याची परस्पर काळजी घ्यायला लागले अन् काय!
मुलाखत जमून यायला बरंच काय काय जमून यावं लागतं हे खरंच. :(
बाकी गाडगीळ नावडायला तुला 'चित्पावन' लेखाची वेळ यावी लागली? मला तर ते एकेकदा "तुमचं सगळं ठीकाय हो, पण मी किती रसिक, बहुश्रुत, जाणता, कोटीबाज आणि मिश्किल आहे, ते पाहा ना" असा मूक पुकारा करत असल्यासारखेच वाटतात. मे बी, सुरुवातीच्या काळात तसं नसेलही. पण माझ्यावर त्यांचं इम्प्रेशन तसंच आहे खरं.
@ संवेद
"ऍश्यूदेत.." असं वेडावून दाखवणारं एखादं स्मायली कम् ऑडिबल शोधायचा प्रयत्न केला मी बराच. पण तसं काही न सापडल्यामुळे तुझ्या खवचटपणाकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष करण्याचा निर्णय मी घेते आहे.
आणि एवीतेवी सामंतांचा विषय निघालाच आहे, तर तुला आठवण करून देतेय (आणि तुझ्या खवचटपणाचा माफक सूड काढण्याचा प्रयत्न करतेय), की तू 'आयवा मारू'वर लिहिणार होतास. काय झालं त्याचं? अजून काम संपलं नाही की काय?
uttar sopa aahe...ameriket marathi pustakancha dukan mala sapDalela nahi..
ReplyDeleteTya Bimma la kasha kashat majja yete... ani to lampan pan... ani dennis.... te wachun mala kharach watata ki harawlay te saglach aata apla... kahihi mhan maturity kinwa nibarpana.... fact remains ki nahi yet majja.... pan shodhat tar rahawasa watatay ajun he hi nase thodke :)
ReplyDeletepoor osarala vatta posts cha?...liva...
ReplyDelete