Monday, 22 October 2007

दिवाळी अंकांना मराठीपणाचे (आणखी) एक व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल काय?

दर वर्षी त्यांच्या दर्जावर चर्चा रंगतात. वाद-विवाद झडतात. ही समृद्धी नसून उधळपट्टी आणि पर्यायानं सूज कशी आहे याचे आलेख हिरिरीनं मांडले जातात. तरी भरपूर नवे-जुने दिवाळी अंक निघतात, खपतात, त्यांच्या भिश्या रंगतात, ते वाचले जातात, निर्यात होतात, दुकानांतून - वाचनालयांतून - घरोघरी - देशी - परदेशी - रद्दीवाल्याकडे - तिथून पुन्हा एखाद्या हौशी वाचकाकडे... रिसायकल होत राहतात. दुसर्‌या कुठल्या भाषेत या अशा वार्षिकांची परंपरा नाही. अनियतकालिकांची चळवळ क्षीण होऊन गेल्यानंतरही हे सो-कॉल्ड स्वस्त साहित्य अजूनही जीव धरून आहे. त्या त्या काळातल्या महत्त्वाच्या साहित्य प्रवाहांचं प्रतिबिंब अजूनही लख्खपणे दाखवतं आहे.

’खरं साहित्य कुठे फळतंय ते त्या ’yz’ ना माहीतच नाहीये’ हे संवेदचं वाक्य खरंच. कारण एरवी साहित्यातल्या अनेक प्रवाहांचं प्रतिबिंब दाखवणार्‌या दिवाळी अंकांनीही ब्लॉगविश्वाची दखल घेतलेली नाहीच! आता निव्वळ ’आठवणींचे कढ’ किंवा ’स्वरचित कविता छापण्याची हौस’ या प्राथमिक अवस्थांतून ब्लॉगविश्व काहीसं बाहेर पडत असलं तरीही.

तरीही... तरीही त्यांचं मोल कमी होत नाही. वर्षानुवर्षं दर्जा टिकवून असणार्‌या - चाकोरीबाहेरचे दमदार विषय देणार्‌या ’अक्षर’पासून खानदानी बैठक सांभाळून असणार्‌या ’मौजे’पर्यंत... धूमकेतूसारख्या लख्ख चमकून लुप्त झालेल्या ’चार्वाक’पासून संपादिकेचा आगळावेगळा ठसा घेऊन येणार्‌या ’शब्द’पर्यंत... काहीश्या बोजड म्हणता येतील अश्या चर्चांनी विद्वत्त्जड-भारदस्त वाटणारे ’सत्याग्रही’-’युगांतर’ आणि टिपिकल पुणेरी बाजाचा पण, काटेकोरपणे दर्जा आणि वेगळेपण सांभाळून असणारा ’साप्ताहिक सकाळ’...

किती नावं घेतली तरी काही ना काही सुटून जाणारच...

या निमित्तानं तुम्हीही लिहा दिवाळी अंकांवर. टॅग करणं तसं निमित्तमात्रच. मी या मंडळींना टॅग करतेय.. पण ’खो’ तुमच्यापर्यंत पोचण्याआधीही तुम्ही लिहू शकताच!

नंदन
अभिजीत कुलकर्णी

ट्युलिप

11 comments:

  1. itakya jorat kho devun dachakavalyabaddal dhanyavaad!(?) diwali purvi lihayacha prayatn karato ya vishayavar. :-D

    btw, u keep up the good work, u r in full form of blogging these days, so go on, & score some centuries..

    ReplyDelete
  2. just a btw comment :
    u missed 'Aawaaj' - chhan katha ani excellent wyangachitre. I believe it's a good 'diwali ank' despite of its 'asabhya(?!) khidki chitre' image.

    ReplyDelete
  3. lihite g lavakarch. pan majhyakade ref. sathi ank khup kami ahet ithe. ani navya paiki meghana pethe cha 'ek shabd' sodala (ki ata to suddha juna ch jhalay?) tar itar kahi mahit nahit. teva jaraas junech vatel majh lihilel. actually kay nakki lihayala havay te kalal nahii nit sa (vyavachhedak cha arth kay ahe?) pan tari lihite:D ekandar impression vagaire tari.

    ReplyDelete
  4. aali waTTa diwaLi...diwaLi cha bhaltach utsah aalay tula...ek online diwaLi anka kadhuya...sagaLya bloggers ni ekek lekh lihayacha...ni ektra compile karun ek pdf document banavaycha...blogger's diwaLi anka...kay vaTTay?...

    ReplyDelete
  5. awaghad kho dilas, meghana :) prayatn karato lihayacha, pan mazyakade pan farasa ref material nahi :(. lihito shakya hoeel tasa.

    btw, tulip vyavachchedak = quintessential/most typical mhanata yeil.

    ReplyDelete
  6. hmm... tuze donhi blog ekatrach wachle... its needless to say good one!!! :) KEEP IT UP

    ReplyDelete
  7. vyavachchedak lakshan = "distinguishing feature".

    ReplyDelete
  8. मेघना. मी नाही दिवाळी अंकावर लिहीणार. मी वाचलेले अंक चांगले होते आणि चांगले अंक संपल्यापासून मी ते वाचलच नाहीये :)

    मला लिहायचंय ते ब्लॉगविश्वाविषयी. आपल्या हिंदुस्तानतले साहित्य किंवा मिडीया "ब्लॉग" या संकल्पनेबद्दल कधी जागरूक वाटलीच नाही. किंबहूना web2.0 ही सध्यसंकल्पनाच आणखी आपल्या ओळखीची नाहीये. I say this from my personal experience with my project team consisting of 23 members. They together could not design a Web2.0 feature in 7 months. Rather they are just not aware of what the heck it is.

    कदाचीत आपली शिक्षण प्रणालीच इतकी टाकावू झालीय कॊ काही नविन करायला पाहीजे किंवा live with the market हा कन्सेप्टच कुणाला रूजत नाहीये.

    असॊ. अमेरीकेतली आणि बाह्यजगतातली भारतीय मंडळी जितकी या web2.0शी जोडलेली आहे तितकी domestic देशी public आणखी नाहीये.

    उदाहरणच द्यायचं झालं तर rediff.com वरचे कोणत्याही .. अगदी कोणत्याही ... articleवरचे वाचकांचे मनोगत वाचून पहा कधी. मूळ मुद्दा सोडून ही मंडळी पर्सनल अटॅकवर उतरतात हे त्यांच्या ही लक्षात येत नाही. मुळात हे डिस्कशन बोर्ड कशासाठी आहेत हेच या मंडळीना कळत नाही. आणि अशा अशिशिक्षीत मंडळीना represent करणारी ही मिडीया आणि मासीकाची जनता देखील अशिशिक्षीतच. त्यांच्याकडनं अपेक्षा ती काय करणार!

    ReplyDelete
  9. ह ... दिवाळी अंक ... खरं सांगायचे तर .. त्यातली कोडी वगैरे सोडवण्यापलीकडं कधी ऊडी गेली नाही! म्हणजे ... दिवाळीच्या वेळी काही तरी वाचत ... तेही घरात ... एका ठिकाणी बसायचे म्हणजी जरा जास्तीच अवघड काम. कधी केल्याचे स्मरणात नाही. (म्हणजे चंपक, ठकठक किंवा चांदोबा याचे दिवाळी अंक सोडून)

    पण आज तुझा ब्लॉग आणि कमेंट वाचून बरीचशी आयडीआ आली. पैकी ब्लॉगरनी स्वतः लिहून मग PDF बनवणे ही मस्त आयडीआ आहे ... असेच खो देत राहू ... आणि दिवाळीला जेवढे जमतील त्याचा अंक बनवू! काय?

    ReplyDelete
  10. मेघना - विषय सुरु केलायस पण स्वत:चं मत लिहिलं नाहियेस दिवाळी अंकांबद्दल!

    ReplyDelete
  11. List of diwali anka is required. Where can one get it?

    Online kuthle anka aahet?

    Kuni mala sangel kaay?

    ReplyDelete