'आपला' पुरुष हवा असं म्हणते बाई
तेव्हा काय अभिप्रेत असावं तिला -
या प्रश्नाची लाख अलवार उत्तरं झिरपत गेली मनात,
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.
नजरेतली उनाड फुलपा़खरी मिश्किली सहज वाचत जाणारा मित्र
शरीराच्या अनवट वाटांनी अज्ञातातले प्रदेश उलगडत नेणारा प्रियकर
स्वामित्वाच्या रगेल अधिकाराचं उद्धट-आश्वासक आव्हान पुढ्यात फेकणारा शुद्ध नर
आणि भिजल्या नजरेची कोवळीशार जपणूक पावलांखाली अंथरणारा बापही.
ही सगळी नाती रुजत गेली तुझ्या-माझ्यामधल्या मातीत,
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.
तुझ्या स्वप्नील नजरेत बिनदिक्कत हरवून जाताना
तु़झ्या मोहासाठी लालभडक मत्सराशीही रुबरु होत जाताना
निर्लज्ज होऊन तु़झ्या स्पर्शाला साठवताना - आठवताना
तुला कुशीत घेऊन लपवून ठेवावं सगळ्या जगाच्या नजरेपासून
असं आईपण माझ्या गर्भात रुजवत जाताना
बाई आणि आईही जागत गेली माझ्याआत,
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.
आणि आता,
थेट 'शोले'मधल्या त्या सुप्रसिद्ध सीनची आठवण यावी
तशी ही नात्यांची छिन्नविच्छिन्न कलेवरं आपल्या दोघांमध्ये ओळीनं अंथरलेली.
भयचकित हुंदका गोठून राहावा ओठांवर
आणि सगळ्या बेडर उल्हासावर दु:खाची काळीशार सावली धरलेली.
तरीही सगळ्या पडझडीत क्षीणपणे जीव धरून राहावी कोवळी ठकुरायन
तशी एकमेकांबद्दलची ओलसर काळजी अजुनी जीव धरून राहिलेली.
तिचं कसं होणार हा एक यक्षप्रश्न तेवढा उरलेला
आता तुझ्या-माझ्यामधल्या उजाड़ प्रदेशात,
या सगळ्या विध्वंसासकट
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.
प्रदेश उजाड खरेच...
पण या आणि अशा अनुभवांना पचवत जाते,
तेव्हाच तर बाई ’आपला’ पुरुष मागू पाहते...
आपसूक मिळून गेलेलं एक कसदार उत्तर.
कसल्याच दु:खांची क्षिती न बाळगता
तुला ’आपलं’ म्हटलं तेव्हा.
'आपला' पुरुष हवा असं म्हणते बाई
तेव्हा काय अभिप्रेत असतं तिला -
या प्रश्नाची लाख अलवार उत्तरं झिरपत गेली मनात,
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.
पण या आणि अशा अनुभवांना पचवत जाते,
तेव्हाच तर बाई ’आपला’ पुरुष मागू पाहते...
आपसूक मिळून गेलेलं एक कसदार उत्तर.
कसल्याच दु:खांची क्षिती न बाळगता
तुला ’आपलं’ म्हटलं तेव्हा.
'आपला' पुरुष हवा असं म्हणते बाई
तेव्हा काय अभिप्रेत असतं तिला -
या प्रश्नाची लाख अलवार उत्तरं झिरपत गेली मनात,
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.
wah wah....bahot khoob...khup avadali...
ReplyDeleteफारच छान.
ReplyDeletesahiye!
ReplyDeleteonce again, nice!
ReplyDeleteमेघना, तुमचे ह्या शैलीतले लिखाण ’संपूर्णपणे काल्पनिक, आणि सत्य घटना अथवा व्यक्तींशी साधर्म्य नसणारे’ असेल, तर तुमच्या शैलीला आणि लिहीण्याच्या ताकदीला सलाम!
ReplyDeleteजर ही कथा/कविता तशी काल्पनिक नसेल, आणि ’तो’ सुद्धा जर हे वाचत असेल, तर मला ’तिच्या’ पेक्षा ’त्या’च्याबद्दल जास्त सिम्पथी वाटते!
बाय द वे, जस्ट ऑन अ लाइटर नोट, मराठोब्लॉग्ज.नेट वर तुमच्या ह्या पोस्टच्या जस्ट लगेच खाली डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या ’भिंत’ या गजलेची लिंक आलीये. अगदी योगायोगाने. ती गजल म्हणजे जणू तुमच्या ह्या कवितेला दिलेले उत्तर वाटते. :) आघाऊपणाबद्दल क्षमस्व, दिवे घ्या!
tooo .. tooo ... tooo good! I would like to write something like this on having a "बाई" in the form of a wife, sister, daughter, mother, and a friend. But you know, you are too good at it.
ReplyDeleteकरणार का प्रयत्न?
आणि बाय द वे. अनामिकानं म्हटल्या सारखं, मला "त्या"च्या बद्दल सिंपथी नाही वाटत ... पण हो ... "किव" येते. If this all is personal experience (which I believe is), then all I can say is, तो नक्कीच काहितरी गमावून बसलाय .. एक मैत्रीण, एक सहचारिणी, आणि बरंच काही.
ReplyDeleteह्या - आय डोन्ट थिंक सो - आय मीन मागच्या २-३ पोस्टबद्दल बोलायचं झालं तर मला अनामिकाचं म्हणणं मान्य.
ReplyDeleteपण ही कविता - जर मेघनाने लिहिली असेल (आणि नसेल तरिही) - ग्रेट!
मेघना - सही आहे कविता!
बाकी दु:खांचंच बोलायचं तर - एवितेवी ते त्याचं आयुष्य जगुन मरणार. मग जिवंत आहे तोवर त्याचा उत्सव का साजरा करु नये - ही माझी फिलॉसॉफी.
ही कविता तो उत्सव ’शोले’ च्या ताकदीने साजरा करते.
मग लेखक कोण ते अलाहिदा.
समहाऊ - आय होप कि ही कविता तु लिहिली नाहिएस. कारण लिहिली असशील तर माझी - मला एवढं भारी का लिहिता येत नाही - या विचाराने चिडचिड होईल.
jabardast ahe ...channe
ReplyDeletedas ist herrlich!!!
ReplyDeletehaa..haa.. Tulip, jar tula German madhye koutuk karayachach asel, tar sobat ekhadya online dictionary chi link tari dyayachi hotis. http://www.interglot.com
ReplyDeleteजाळपोळ...शुद्ध जाळपोळ. फक्त शोलेचा उल्लेख खारट वाटला
ReplyDelete@ कोहम्, संगीता, ए सेन मॅन, धनंजय, मॅड्झ, मनी
ReplyDeleteमनापासून धन्यवाद.
@ ट्युलिप
डान्कं श्योन!
@ अनामिका
धन्यवाद. गजल वाचली. खरंच तू म्हणतेस तसं उत्तर आहे खरं ते!
आणि अग, ट्युलिपनं चुकून पाठवली कमेण्ट जर्मनमधे. आणि 'छापू नकोस, चुकून पाठवलीय' असं घाईघाईत सांगायच्या आत मी ती छापलीपण. त्यामुळे चूक माझी आहे!
@ अभिजीत बाठे
"दु:ख जिवंत आहे तोवर त्याचा उत्सव का साजरा करू नये?"
यावर अधिक काय बोलावे...
आभार.
@ संवेद
"जाळपोळ" काय, "खारट उल्लेख" काय, "हजाम" काय... आपल्या सगळ्यांच्या दाद देण्याच्या पद्धती आणि समीक्षकी परिसंज्ञा दिवसेंदिवस अभिनव सर्जनशील होत चालल्यायत!
आभार!