Wednesday, 21 April 2021

बोलाफुलाची

एखादा लहानसा नजरानजरीचा क्षण 
सुकलेल्या फुलासारखा.
हळूच खिशात लपवून ठेवायला,
विरघळून जाईस्तो
दिवसचे दिवस बोटांनी चाचपून बघायला,
खूश खूश होऊन 
पुन्हा पुन्हा जगायला,
आवडतं मला.
तुला पुरतात, 
दिसल्या न दिसल्याशा सोबती.
वळून पाहावं,
तर होत्या की नव्हत्या होऊन जाणाऱ्या.
दिवसचे दिवस हुलकावणी देणाऱ्या
गाण्याच्या चालीसारख्या
निसटत्या.
सांग,
कशी पडावी गाठ,
फुलाची 
अन्
बोलाची?

No comments:

Post a comment

ताजं लिखाण

बोलाफुलाची

एखादा लहानसा नजरानजरीचा क्षण  सुकलेल्या फुलासारखा. हळूच खिशात लपवून ठेवायला, विरघळून जाईस्तो दिवसचे दिवस बोटांनी चाचपून बघायला, खूश खूश होऊन...