Thursday, 12 November 2020

तुझ्याभोवती

उतू जावं दूध 
नि दर वेळी खिदळत ओटा धुवायला घ्यावा,
साय प्रसन्न मनानं निपटत, 
पाणी ओतून कडाप्पा पुन्हा काळाशार नितळ करत, 
रथसप्तमी साजरी करावी 
नि घराचं गोकुळ गजबजून जावं..
तसं होतं,
तुझ्याभोवती.
फेर धरून येतं सगळं.
आणि?
आणि काय?
दूध उतू जातं!

No comments:

Post a comment

ताजं लिखाण

तुझ्याभोवती

उतू जावं दूध  नि दर वेळी खिदळत ओटा धुवायला घ्यावा, साय प्रसन्न मनानं निपटत,  पाणी ओतून कडाप्पा पुन्हा काळाशार नितळ करत,  रथसप्तमी साजरी कराव...