दर दिवशी नवी निवड. नवीन पर्याय. नवीन प्रश्न. त्यांतून रोज नवे होत गेलेले आपण. आणि रोज बदलत जाणार्या आपल्या नोंदी ठेवणारेही आपण.
काय दिसतं त्यातून? वर-खाली, मागे-पुढे, ठळक-पुसट, नव्या-जुन्या, जोरकस-नाजूक रेषांच्या खुणा. दर दिवशी नवीन चित्र? आणि मग? बदलत गेलेले आणि तरीही पुन्हा पुन्हा नव्यानं जन्मत राहिलेले आवर्तातले आपण?
वर्तुळ?
हम्म.
वर्तुळ.
पाळी येते. दर अठ्ठावीस दिवसांनी. शरीरात रक्त फेर धरतं. कुणी नाही आलं, तर समंजस निमूटपणे आपलं घर मोडून वाहून जातं. दर महिन्याला तोच खेळ. न कंटाळता.
तसंच हे? आपल्यातल्या बदलांनी पुन्हा पुन्हा आपलं बदललेलं तरीही तेच चित्र काढत राहायचं? कशासाठी? कधीतरी बीज पडावं म्हणून?
कधी पडतं बीज? आपल्याला कधीही खरी न होणारी आणि तरीही खरं होण्याची स्वप्नं दाखवणारी स्वप्नं पडतात तेव्हा?
खरं होण्याचं आणि न होण्याचं तरी काय? त्या त्या स्वप्नांपुरते तर खरेच असतो की आपण. नाहीतरी स्वप्न आणि सत्य यांतलं नक्की कुठलं खरं, हे कोडं तरी कुठे सुटलं आहे कुणाला अजून?
स्वप्नं हवीत.
आपल्या ऋतुचक्राची समंजस जाणीव घेऊन दर साल पाऊस येतो.
तसा पाऊस हवा.
स्वप्नं हवीत.
काही रुजावं वा न रुजावं.
मातीनं तयार असायला हवं.
काय दिसतं त्यातून? वर-खाली, मागे-पुढे, ठळक-पुसट, नव्या-जुन्या, जोरकस-नाजूक रेषांच्या खुणा. दर दिवशी नवीन चित्र? आणि मग? बदलत गेलेले आणि तरीही पुन्हा पुन्हा नव्यानं जन्मत राहिलेले आवर्तातले आपण?
वर्तुळ?
हम्म.
वर्तुळ.
पाळी येते. दर अठ्ठावीस दिवसांनी. शरीरात रक्त फेर धरतं. कुणी नाही आलं, तर समंजस निमूटपणे आपलं घर मोडून वाहून जातं. दर महिन्याला तोच खेळ. न कंटाळता.
तसंच हे? आपल्यातल्या बदलांनी पुन्हा पुन्हा आपलं बदललेलं तरीही तेच चित्र काढत राहायचं? कशासाठी? कधीतरी बीज पडावं म्हणून?
कधी पडतं बीज? आपल्याला कधीही खरी न होणारी आणि तरीही खरं होण्याची स्वप्नं दाखवणारी स्वप्नं पडतात तेव्हा?
खरं होण्याचं आणि न होण्याचं तरी काय? त्या त्या स्वप्नांपुरते तर खरेच असतो की आपण. नाहीतरी स्वप्न आणि सत्य यांतलं नक्की कुठलं खरं, हे कोडं तरी कुठे सुटलं आहे कुणाला अजून?
स्वप्नं हवीत.
आपल्या ऋतुचक्राची समंजस जाणीव घेऊन दर साल पाऊस येतो.
तसा पाऊस हवा.
स्वप्नं हवीत.
काही रुजावं वा न रुजावं.
मातीनं तयार असायला हवं.
hmm...
ReplyDelete"काही रुजावं वा न रुजावं.
मातीनं तयार असायला हवं."
he baki khara.
स्वप्न हवीतच व ती पुरी करायला न कंटाळता अथक तयारीतही राहायलाच हवं... न जाणो, कधी बीज रूजेल... खरेयं गं. कंटाळून कसं चालेलं...तो पर्याय नसावाच.
ReplyDeleteshevatacya don oli khas.
ReplyDeletewomen's day nantar ekadam mother's day la post. :)
sane man - pakawu nakos. yaat khara kaay? rujaawa athawaa na rujaawa - mag maateechyaa tayaar asaNyaachaa sambandh yetoch kuThe? aaNee any way haa 2x2 matrix aso naaheetar aaNakhee kaahee - this is one of the yuckee posts that I hate Meghana for. She can write so well man - such a waste....
ReplyDeleteI did not like it....बटबटीत पणा कडे झुकणारं पोस्ट! काही ही मनात आले ते भडक पणे उतरवावेच असे नाही.
ReplyDeleteअभिजित् -
ReplyDeleteमी म्हटलंच नाही, की हे फार सही पोस्ट आहे. पोस्ट ठीकच आहे. पण तुला भिक्कार चित्रपटातलं एखादं गाणं आवडत नाही, कधीच? हे तुझ्यासारखं प्रत्येक पोस्ट ०-१ मध्ये मला मोजता येत नाही.
जिथे मातीची तयारी न विचारताच बीज आपलं रुजणं ठरवत आलंय, तिथे त्या मातीच्या तयार असण्याला काहीतरी स्थान आहे, हे मला आवडलं. शिवाय मला ही कविता तिच्या इतर पोस्टांपेक्षा वेगळी वाटली. एरवी बंडाचं लाल निशाण असणारा चेव, ताव लाल मातीने आपल्यात रुजवून सोशिक न होता समंजस केलाय असं वाटलं.
नि अर्थातच ह्या दोन ओळी वेगळ्या काढून वाट्टेल तिथे उद्धृत कराव्यात इतक्या काही स्वयंपूर्णही नाहीत. पण त्या कवितेच्या पार्श्वभूमीवर मला नेमक्या उतरलेल्या वाटल्या.
हे सगळं माझं मत. मेघनेचं काय, ते तीच जाणो.
तुझा ० चा त्रागा नि माझं ०.४ साठी उग्गाच स्पष्टीकरण देणं मागल्या पानावरून पुढे चालूच राहणार बहुदा :-) तेव्हा तुझ्यासाठी explicitly -
मेघने, कविता ठीकच आहे.
@ अश्विनी,
बटबटीत नि भडक असं काय वाटलं ह्यात हे नेमकं कळलं नाही.
असं शहाणपणाने सगळं स्वीकारणं खूप कठीण आहे पण
ReplyDeleteपोस्ट का नाही आवडलं? मला आवडलं. लिहून होणं, न होणं फारसं महत्वाचं नाही आणि त्याची पर्वाही नाही पण माती तयार आहे ही जाणीव फार सुखाची. आत्मविश्वासाची. आपल्याला हवं तेव्हा(च) बीज रुजवून घेऊ आणि भरभरुन फुलवू ही मस्ती त्यातूनच येणार.
ReplyDeleteमनातले विस्कळीत विचार लांबलचक न भरकवटता अशा छोट्या छोट्या तुकड्यांमधे बंदिस्त करुन मांडलेले मला तरी खूप आवडतात.
malahi awdla. ka awdla va kay awdla sangne avghad ahe..
ReplyDeleteकविता किंवा खूप बांधेसूद असं काही लिखाण नव्हतं हे. मनात आलं, उतरवलं - हेच खरं. हात लिहिता राहावा म्हणून, मनातले विस्कळीत विचार एखाद्या अर्थपूर्ण वाटणार्या आकृतीत उतरवण्याचा सराव राहावा म्हणून. ते बटबटीत का वाटावं, हे मात्र मला कळलं नाही. शिवाय मनात आलं ते ते वेगवेगळ्या आकृतिबंधांतून लिहून पाहण्यासाठीच ना स्वत:चा ब्लॉग असतो? कधी जमून जातं, कधी फसतं. निव्वळ प्रयोग आहे म्हणून तो जसा चांगला’च’ ठरतो असं नाही; तसंच अयशस्वी प्रयोग छापायला अघोषित बंदी असते असंही नाहीच ना?
ReplyDeleteअसो!
अगं, बाकी पोस्ट ठीक आहे पण त्याचा ऋतुचक्राशी लावलेला संबंध मात्र फार फार खटकला..आत आत जपलेलं ,फक्त स्त्री लाच उमजू शकेल असं हे सत्य इतके उघडे शब्द लेवून पुढे आलेलं खरंच नाही आवडलं. भलेही त्याचा संबंध असेल सर्जनाशी, पण म्हणून सगळे संकेत असे धाब्यावर का बसवायचे?
ReplyDeleteअश्विनी,
ReplyDeleteपोस्ट चांगलं-वाईट-भिकार कसंही असू दे. त्याबद्दल कुठल्याही प्रतिक्रियेचं स्वागतच आहे. तिथे मी कोणताही वाद घालणार नाही.
पण संकेतांचं म्हणशील, तर नक्की कुठले संकेत? ऋतुचक्र चालू असलेल्या स्त्रीनं सभेत येऊ नये, धर्मकार्यात सहभागी होऊ नये, देवाला शिवू नये - असेही संकेत आहेतच. आणि अजूनही ते पाळले जातात, अशी बेटं आपल्या देशात - अगदी आपल्या आजूबाजूलाही - आजही आहेतच.
पण मला न पटणारे संकेत मी नाही पाळत.
स्त्रीचं ऋतुचक्र आणि लेखकाच्या डोक्यातली सर्जनापूर्वीची अवस्था या दोहोंमधलं नातं जवळचं वाटलं. मग ते व्यक्त करताना कसला आडपडदा पाळायचा? त्यात काय लज्जास्पद, गूढ, किंवा, लपवून सुरक्षित ठेवावं असं आहे?
स्फुट भिकार असेल. फसलेलं असेल. उगाच असेल.
पण केवळ 'स्त्रीच्या खाजगी शरीरचक्राचा उल्लेख न करण्याचा संकेत मोडल्यामुळे' ते भिकार-बटबटीत वाटत असेल, तर ते यशस्वी (किंवा सोज्ज्वळ-लोकमान्य) व्हावं म्हणून मी तो उल्लेख टाळणार नाही.
किती शोधावा लागला तुझा ब्लॉग. कायच्या काय खाली गेला होता! आठवुन आठवुन शोधला तेव्हा सापडला
ReplyDeleteबरं ते जाऊ दे. तुला खो दिलाय (शेवटी एकदाचा). तो घे अन लिही निमुटपणे
Lihi g kahitari.
ReplyDelete