अभिजीतने न दिलेला खो मी घेतला नि हे खरडलं.
बायका फक्त बायका आहेत म्हणून त्या करतील ते ते आपोआपच महान / प्रगतिशील / पुरोगामी ठरतं; या गृहितकाची जिम्मा मी तरी अल्पसंख्याकांचं नेहमीच बरोबर आणि ते कायमच सहानुभूतीस लायक, दलित साहित्य चाकोरीबाहेरचं / गावकुसाबाहेरचं असल्यामुळे थोर, योनी या निषिद्ध शब्दाभोवती आणि अवयवाभोवती फिरणारं नाटक केलं म्हणून ते आपोआपच चांगलं - या आणि असल्या समीकरणांमधेच करते. मग महिलादिनाचं आणि ’त्या होत्या म्हणून आम्ही आहोत’चं प्रयोजन काय?
लेट मी क्लिअर - माझेही या प्रश्नाबाबत मेजर घोळ आहेत. तेच सोडवायचा प्रयत्न चाललाय.
इतिहासात शिरायचं की कसं? मरो, होऊन जाऊ दे. अजूनही बायका स्वेच्छेनं मंगळसूत्रं, मुलंबाळं, घर-संसार, धुणी-भांडी, लिंगभेद आणि बरंच काय काय करतात किंवा करत नाहीत, हे मान्यच. तसंच अजूनही काही ब्राह्मणेतर जातीतल्या पोरानं ब्राह्मण (’ब्राह्मण’च्या जागी कुठलाही उच्चवर्णीय समाज घातला तरी चालेल) पोरगी गटवली, की त्याचा / त्याच्या आप्तांचा इगो कुठेतरी सुखावतोच. मग जातिभेद महान (किंवा गेला बाजार अपरिवर्तनीय वगैरे तरी) आहेत आणि त्यांच्या उच्चाटनाची / किमान त्यांतून होणार्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शोषणाच्या उच्चाटनाची गरज / शक्यता नाही असं म्हणायचं का?
कुठल्याही समाजात आपलं होणारं शोषण / आपल्यावर होणारा अन्याय या बाबींचा साक्षात्कार सगळ्याच्या सगळ्या शोषितांना एकसमयावच्छेदेकरून झाला, असं कधीच होत नाही. काही लोकांच्या लक्षात आधी येतं, काहींच्या नंतर. काहींच्या शतकानुशतकांनंतरही - किंवा खरं तर, कधीच - लक्षात येत नाही, तर काही जण सुधारकी रेट्याची वाट पाहण्यात वा समकालीन समाजाच्या वेगाशी सामोपचारानं जुळवून घेण्यात अजिबात वेळ दवडत नाहीत. स्वत:च्या आयुष्यातला अन्याय दूर करून मोकळे होतात. हे जे बाकीच्या समाजानं बदलण्याची वाट बघण्याचं नाकारणारे लोक असतात, त्यांचं उदाहरण पाहून बर्याच - सगळ्या नाही, बर्याच - परप्रकाशित लोकांनाही परिस्थितीचा साक्षात्कार होतो. हे परप्रकाशित लोक संख्येनं पुष्कळ असतात आणि त्यामुळे त्यांच्या बदलण्याचा परिणाम दृश्यस्वरूपात जाणवतो. त्यांच्या बदलातले फायदे-तोटे अधिक स्पष्ट होऊन दिसतात. तेव्हाच त्यांपैकी एखादा फायदेशीर बदल लोकमान्य होतो. ही लोकमान्यताही पहिल्याच टप्प्यात मिळत नाही. निरनिराळी घनता आणि शोषणक्षमता असलेल्या विस्तीर्ण प्रदेशात एखादा द्रवपदार्थ सावकाश झिरपत जावा, त्याची मातीत मुरण्याची तीव्रता, प्रमाण, वेग सगळंच मातीनुसार सापेक्ष असावं, तशी ही प्रक्रिया असते. एकाच वेळी निरनिराळ्या प्रदेशात निरनिराळ्या टप्प्यांवर असणारी.
हे साखळीच्या बाहेरचं एकांडा शिलेदार असणं ते साखळीतलाच एक महत्त्वाचा दुवा म्हणून स्वीकारलं जाणं - या प्रवासाला प्रदीर्घ कालावधी लागतो. आणि तरीही प्रक्रियेचा अंतिम बिंदू म्हणून काळाच्या कुठल्याही तुकड्यावर बोट ठेवता येणं अशक्य असतं.
आता अशा प्रकारे बदलाच्या एका टप्प्यावर असताना, बदल आपल्याला फायदेशीर ठरत असताना बदल सुरू करून देणार्या काही स्वयंप्रकाशी लोकांबद्दल कृतज्ञता वाटावी आणि ती व्यक्त करावी; यात राग येण्यासारखं काय आहे? हां, आता त्या कृतज्ञतेला किती वेटेज द्यायचं, आपल्या वाटचालींचे टप्पे यशस्वी मानून धन्य व्हायचं की नाही, आपलं आणि समकालीनांचं एकूणच यशापयश त्यांच्या मापानं तोलायचं की त्याला वर्तमानाचे अधिक कठीण निकष लावायचे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या त्या व्यक्तीच्या तारतम्यानुसार सापेक्ष आहेत.
अंधश्रद्धानिर्मूलनाची चळवळ आवश्यकच. पण एकंदर धर्मसंकल्पनेच्या आवाक्यामध्ये तिचं स्थान किती लहान-किती मोठं हे प्रत्येकाला दिसणार्या चित्राच्या समग्रतेवरच अवलंबून नाही का?
हॅपी विमन्स डे, बाय दी वे!

"आता अशा प्रकारे बदलाच्या एका टप्प्यावर असताना, बदल आपल्याला फायदेशीर ठरत असताना बदल सुरू करून देणार्या काही स्वयंप्रकाशी लोकांबद्दल कृतज्ञता वाटावी आणि ती व्यक्त करावी; यात राग येण्यासारखं काय आहे?"
ReplyDeleteMeghana - you have a tendency to take the air out of my argument. I guess its an individual choice. But I see these lofty historical figures on one side, and women around who contradict them and men around those women who are more than happy to maintain the status quo.
In all of that, such articles - though factually (probably) right - seem very hypocritical. Infact to assign such a day to women - I find it demeaning (to women). Its almost like, we have 'bail poLa' and 'naag panchami', so why not have 'mahila deen'.
काय की बॉ! मला काहीच कळालं नाही. सगळे तोच मुद्दा माडताहेत असं वाटलं...
ReplyDeletewhats d end result btw?
ReplyDeleteitihaas shikaaycha nasel aikaaycha nasel tareehi to astoch rahatoch na?
nywy HWD and नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
@Abhijit's comment here and Meghana's statement:
ReplyDeleteI think both of you are correct in your own perceptive. I think this 'day' concept is one more of the fads to sell out greeting cards. :-) Jokes apart, I would really like to Thank and remember all those who have contributed to women's rights fight. But at the same time why a day for that? Shouldnt I thank everytime I vote? Everytime I able to go to office and achive something or thank them for being able to get education till its possible? You know sometimes Pune Mirror has small news sections which I rarely go to, but the news I read cant beforgotten. Like a woman being put on auction and being purchased, or being put at home just because that country does not allow masks outside and her husband doesnt want her to be seen by other men. I mean what world do we live in? But to even think that its unfair I should have right to 'think' and I do have.And for that right, I think the history and these people should be rememebered but not one day, it should be your actions.
Now about Abhijit's point: I read your blog too and I am not able to put a comment there. I think you are over-reacting. :-) I support your point above but still I think you are over-reacting. You remember Chitrahaar and Rangoli and Chayageet? Every year on Holi we have the song from Sholay and on Navratri a song from old 'Suhaag' movie. And I really get irritated by these songs and as well by the person who talks abt it. Like for Holi, yeh rango ka tauhar hai, jo jeevan main rang bhar deta hai etcte .How irritating? But can we do anything abt it? Its their (media,etc) bread-n-butter. So let them get that. :-) Yes it is demeaning to women to have a woman's day.But then you men have the 'Labour day' for you. :-) take that for now, later we can raise a request to United Nations for having Mens' day. Hehe its funny. How would you celebrate it? Imagine a mens' day?:-))) Just kidding.
-Vidya.