चोख शांततेचा एक नखभर तुकडाही सापडत नाही आसमंतात
दिवसाच्या कुठल्याही प्रहरी.
दिवसाच्या कुठल्याही प्रहरी.
एफेम जॉकीची अर्थहीन धेडगुजरी बकबक,
चिरडीला आलेल्या गाड्यांचे हॉर्न्स,
चिरडीला आलेल्या गाड्यांचे हॉर्न्स,
बसच्या पत्र्यावर जिवाच्या आकांताने थपडा मारत प्रवासी गोळा करणारा क्लीनर,
छातीचा ठोका चुकवणारी दीडदोन पुरुष उंचीची स्पीकर्सची भिंत,
छातीचा ठोका चुकवणारी दीडदोन पुरुष उंचीची स्पीकर्सची भिंत,
‘अगला स्टेशन मुलुंड...’
‘रांडांना दारात हुबं र्हाऊन हवा खायाला पायजे...’
ढोलताशेलेझीम.
उरलंच थोडं अवकाश काही तुरळक सांदीफटींतून
आवाजानं न बरबटलेलं
चुकूनमाकून,
तर कुणीतरी घाईघाईनं हवेत सोडून दिलेली फिल्मी संगीताची एखादी सुरेल अश्लील पिचकारी.
जणू शिवीच देतो आहे कुणी अंगावर चालून येणार्या या भयाकारी राक्षसाला
अगतिकपणे
आईवरून.
निरवतेची तहान लागलीच कधी कुणाला,
तर उन्हाळ्यातल्या रात्री उत्तम.
दिवे जातात आणि उकाडा असह्य होऊन लोक एमेसीबीला फोन करत सुटतात,
त्याआधीची काही मिनिटं सर्वदूर शांतता असते आसमंतात.
सगळं काही आलबेल असल्याचं भासवणारे
पंख्यांचे भर्र आवाज
एसीच्या यंत्राचा गुरगुराट
फ्रीजचे अव्याहत हुंकार
टीव्हीच्या असंख्य च्यानेलांच्या व्हाईट नॉइजचं गिरमीट
कोमात गेलेलं असतं सगळं.
त्या वेळी छाती भरून मारता येतो एक दम.
फेफडों की बीमारी गेली खड्ड्यात.
पावसाच्या आवाजालाही जिथे असते
‘पूरा शहर पानी में’ची अव्याहत पार्श्वभूमी,
तिथे ओठाशी जळणार्या निखार्याचा अस्फुट चरचरीत आवाजच फक्त
निरवतेची लालकेशरी मुद्रा उमटवू शकतो मनावर,
हे कळत जातंच इथल्या प्रत्येकाला
कळत नकळत.
No comments:
Post a Comment