Sunday, 18 March 2012

वाटा आणि मुक्काम


जे जे म्हणायसाठी तगमग होते जिवाची
ते ते सारं निरर्थक आहे हे कळून घेताना
एकाच वेळी आतून भरून येणारे आपण
क्षितिजापर्यंत रिते होत जाताना
आत शिरलेल्या वाळूच्या कणाभोवती
मुकेपणानं मोती विणत जाताना
आधी कधीच न दिसलेल्या रिकाम्या जागा
अर्थपूर्ण मौनांनी भरल्या जाताना
कुठे चाललेले असतो आपण?
वाटा आणि मुक्काम
सारंच तर एकमेकांत मिसळत गेलेलं...

8 comments:

  1. aprateem! ha anubhav aslyamule, yatil bhav mazyaparyant purepur pohochala...

    ReplyDelete
  2. अप्रतीम! हा अनुभव गाठीशी असल्यामुळे त्यातील अर्थ, निरर्थकता, हतबलता माझ्यापर्यंत पुरेपूर पोचली.

    ReplyDelete
  3. hee (bahutek) bhaaree kawitaa aahe.

    ReplyDelete
  4. मस्तं! तू अनुराधा पाटील वाचल्यास का? तश्याच वाटेनं गेलीए कविता.

    वाटा आणि मुक्काम
    सारंच तर एकमेकांत मिसळत गेलेलं

    हे एकदम खासंच!

    इजा-बीजा झालेलंय. त्यामुळे तीजा होईलचं. नित्य लिहीण्याचं मनावर घेतलसं बघून बरं वाटतय :)

    ReplyDelete
  5. @परिमला आणि अभिजीत
    आभार. :)
    @संवेद
    अनुराधा पाटलांची एक कविता अभ्यासाला होती कधीतरी. बाकी काही नाही वाचलेलं.
    नियमित लिहिण्याचं म्हणशील, तर स्फूर्तीबिर्तीची वाट पाहायला आपण काय गडकरी वगैरे नाही, हे पटलंय मला आता. यूज इट ऑर लूज इट न्यायानं... :)

    ReplyDelete
  6. फ़ैज़ थी राह ससबसर मंज़ील
    हम जहां पहुंचे कामयाब आये

    असा एक शेर आहे फ़ैज़चा.

    तेव्हा वाटांच्या दुसर्‍या टोकांना
    वाट पाहत उभी असलेली घरं, माणसं
    नि समंजस वाटा
    ह्यांच्यातलं आपलं नेमकं कोण
    हे कळत नाही पटकन

    असंही कुणीसं म्हटलंय मागे.

    पण हे त्याहून भारी आहे. अधिक मग्न असलं तरी.

    ReplyDelete