Monday, 29 November 2010

कशासाठी? पोटासाठी

जादूचा दिवा हरवून किंवा झिजून गेल्यानंतरच्या सर्वसामान्य अल्लाउद्दिनची गोष्ट ऐकलीय कुणी कधी?

किंवा

वंडरलॅंडचा पत्ता विसरून गेलेल्या; पोरंबाळं आणि त्यांचे होमवर्क्स, विजबिलं-किराणा, क्रेडिड-कार्डाची बिलं या लबेद्यात गुरफटलेल्या ऍलिसची?

किंवा

मगलवर्ल्डमधे अडकून पडलेल्या आणि सकाळ-संध्याकाळ इमाने इतबारे लॉग-इन-लॉगाउट करणार्‍या आणि महिनाअखेरीस टाइमशिट भरणार्‍या हॅरीची?

आय वण्डर. कसं असेल त्यांचं आयुष्य?

किंवा खरं तर -

आय डोण्ट वण्डर.

7 comments:

  1. होईल गं.
    हॅरीला हात धरुन डायगॉन ऍलीपर्यंत हात धरुन नेऊन ’जा च तू, मी बघतो इथलं’सांगणारा भेटेल.
    अलादीनला आज ना उद्या ’जीनी नाही’ हे मान्य करुनही अद्भुत जगायला शिकता येईल.
    सगळं होतं.
    Just Hope.
    बरं..आणखी एक.
    वंडरलॅंडचा पत्ता विसरुन गेलेल्या ऍलिस ला ’अडकवायला’ तुला पोरंबाळं आणि त्यांचे होमवर्क्स, विजबिलं-किराणा, क्रेडिड-कार्डाची बिलंच मिळाल्याचं वाचून ’च च च च’ झालं. आय लौ ऍलिस.:))

    ReplyDelete
  2. sahich... kas suchat tula he?
    As Shraddha said.....hope floats...

    ReplyDelete
  3. Diva haravalyavar to Aladdin fakt RK Laxmananchya "You Said It" madhech yeu shakel - "baghya"chya bhumiket.. Baki divas Samanya ayushya pan anandane jagel..

    Alice aplya porabalanna ani mag natvandanna goshta sangtana punha punha tichya wonderland chi feri maarelach..

    ani Harry? 'Jagadguru Harrymaharaj Chamatkari' hoil.. mag timesheet cha tension nahi!! :)

    ReplyDelete
  4. तू कधी अल्लादिनला जेवताना पाहीलयस? अ‍ॅलिसला कधी बोनसची चिंता करताना पाहीलयस?
    आणि हॅरीचं अ‍ॅपरायजल होताना?
    ती दुनिया रंगीत असेल खरी पण काळे पांढरे रंग तिथेही असतीलच. डोकं ज्याच्या आधारावर चालतं, तो पोट नावाचा अवयव दिवसोंदिवस फुगतच चाललाय बाई...

    ReplyDelete
  5. यानंतर harry Alice आणि अलादिन आपल्यासारखेच होणार... मग त्यांची गोष्ट काय आणि आपली काय..

    ReplyDelete
  6. superb!!!thodkyat ...pan barach kahi

    ReplyDelete