लिहिण्याची सवयच गेलीय.
विश्राम बेडेकरांनी म्हटलं आहे, त्या चालीवर आपण लिहिल्याशिवाय जगू शकतो म्हणजे आपण लेखक नाही. मग हा अट्टाहास कशासाठी?
उगाच खुजली म्हणून.
पांढर्यावर आपल्या नावानं काळं झालेलं दिसलं की गारगार, एकदम सत्ताधीश वाटतं म्हणून.
कुणी कुणी 'वा, छान' म्हणतं म्हणून.
कुणी 'कशाला लिहिता ही नष्ट घाण' असं खरोखरीचं चिडून विचारल्यावर अजूनच उचकायला होतं म्हणून.
एरवी काही अंगाला लावून न घेता अल्लाद पार होणार्या आपल्या वॉटरप्रूफ कातडीला लिहिता लिहिता कुठेतरी जोडलं गेल्यासारखं वाटतं म्हणून.
कुठल्यातरी आठवणीतल्या किंवा स्वप्नातल्या क्षणाच्या अर्धुकात, लिहिल्यावर एकदम रितं-मोकळं-ओझंहीन वाटल्याचा भास अजून शिल्लक आहे म्हणून.
सगळीच उत्तरं. किंवा कुठलीच नाहीत.
पोटाचा खड्डा भरून बराच रिकामटेकडा वेळ आणि खुमखुमणारी ताकद उरते हेच कदाचित उत्तर.
तरीही लिहिण्याची सवय गेलीय. म्हणजे आपण लिहिण्यावाचण्याला एक निरुपयोगी छंद मानणार्या लोकांइतके माजलो की काय? कदाचित तसंच.
हा माज उतरवण्याकरता तरी लिहीत राह्यलं पाहिजे.
लिहिण्याची सवयच गेलीय, तरीही.

अगदी अगदी अगदी अगदी!! :)
ReplyDelete(रडवेली स्मायली टाकायला हवी होती की काय...)
kharach ga..:( lihinyachi savay geliy aani tya flow madhe vichar karnyachi aani kadhi etaka excite vhaychi savay pan keliy ki lihilyashivay jhop lagu naye....
ReplyDeletePan tari lihit rahila pahije tu tari...mhanje amhala vachayla tari milel. I was excited to see updates on ur post..was expecting a big,long post.. :-( Tu lihich barr aata.
-Vidya.
पुरे बरं का हे आता. आमच्याकडून मारे लिहून घेतलं, आपण का लिहितो म्हणून. तेव्हा पिल्लू सोडून शांत राहिलीस नि आता सूड उगविल्यासारखी एकामागून एक पोस्ट...लिहिण्याबद्दल...फार झालं आता...
ReplyDeleteन लिहिता राहता येतं म्हणून न लिहिताच राहिलं पाहिजे का? तू न लिहून (तुझ्यासकट) कोणाचंच काही बिघडत नाही, तर तू लिहूनही काही बिघडत नाही. त्यामुळे "ऐसेही किसी न जाने के बहाने के लिए आ" सारखं, कधी लिहिता येतं म्हणून लिही.
e mala sane man chi comment khoop awadliye!!!
ReplyDeletetuza post cha prayojan kay aahe mahit nahi... pan saway tikwayla lihayla hawa yat mala barach kahi distay !! right?
बर्याच दिवसांनी नवे पोस्ट. म्हणून आनंद. नवे आलेले पोस्ट काहीसे पुरेशा न शिजलेल्या भाजीसारखे. म्हणून काहीशी निराशा. मात्र ब्लॉग या प्रकाराचे प्रवाही स्वरूप मला पुरेसे आकळले नसल्याची जाणीव आहे. म्हणून या पोस्टवरील माझे वरील जज्ज्मेंट अवैध ठरते.
ReplyDeleteलिहीण्यामागच्या कारणमीमांसेमधे एक सनातन कारण दिसले नाही , जे (मला वाटते) थोडे महत्त्वाचे आहे : Writing is an expression alright.But I see an element of quest , of search in it : particularly in some of the writing of this blog.
व्यक्त होण्यासाठी हा सगळा प्रपंच हे खरेच. आणि हे व्यक्त होणे म्हणजेच लिखाणाच्या अस्तित्त्वाची निशाणी हेही खरेच. What would exist in any writing , if there wasn't any expression ? पण कधीकधी लिखाण करणे म्हणजे कशाचा तरी शोध घेणे असते. कसला शोध ? तो लिहिता लिहिता कसा घ्यायचा ? किंवा कसा "लागतो" ? याला काही ठाशीव उत्तरे नाहीत. पण गणितातले एखादे प्रमेय मांडून ते सुटते का ते आपण पहातो , तद्वत् लिहिण्यातूनही घडत असावे. नेहमी नाही ; सर्वांसाठी नाही. पण कधीकधी.
हे कारण या लेखात कसे नाही ?
vyasani maaNasanche punavarsan (rehab) jevha hota, tevha pahili payari "Maza naav amuk aahe, aani maza vyasan amuk amuk aahe" ashi asate mhaNae - sweekarachi. Mag pudhe etar payarya - punarvasanachya. Ha lekh mhaNaje asheech pahili payari aahe ase dharun chalato.
ReplyDelete(Payari-baahya) Nandan :)
तेंची वाक्य झोंबलेली दिसतात हो! बरय, मी आगी लावत राहीन
ReplyDelete