Friday, 22 June 2007

कुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहोब्बत का भरम रख...

’रंजिशी सही...’ डोक्यात घुमत असलेलं. कुठल्याही गाण्याबरोबर चालताना अर्ध्या वाटेवर डोकं वाटा चुकायला लागतं तसंच... कधी आपली ’महान’ एकाग्रता चकव्यात गुंतवते, तर कधी गाणंच पायवाट सोडून रानोमाळ भटकायला भाग पाडतं...तशातली गत झालेली. रुना लैलाचा शांत, ठाम घायाळ सूर पाझरतो आहे एका लयीत. त्याची एक नशाच चढल्यासारखं झालेलं...

’कुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहोब्बत का भरम रख...’ इथे अडायला झालं.

भरम...?

खरी मी तिच्याही आधी ’तू भी तो कभी मुझको मनाने के लिए आ...’वर जाऊन तिची वाट पाहते नेहमी. पण ’मोहोब्बत का भरम रख...’? म्हणजे? पुढे जाताच येईना.

भरम...

इथे अपरिहार्यपणे मेघनाची आठवण झाली. किती वेगवेगळ्या प्रकारे या भ्रमांचं विश्व साकारलं आहे तिनं. भ्रमांचा आधार आयुष्याला जोडून ठेवणारा आणि त्यांना नाकारताना लागणारी प्रचंड अमानुष ताकद... लख्ख सत्य समोर दिसत असूनही ते नाकारून भ्रमांना कवटाळून बसण्यातली ’अठरावा उंट’मधल्या संजीवची अगतिकता... आणि ’टेलिंग दी ऍबसॉल्यूट ट्रुथ वॉज पार्ट ऑफ माय स्ट्रॅटेजी...’ म्हणून भीषण एकटेपणाला सामोरं जाणारी ’नातिचरामि’मधली मीरा...

भ्रमांच्या मोहक आधाराचं आणि फसवं आभासी सुख देण्याच्या क्षमतेचं किती नेमकं भान आहे तिला...

तशीच गौरीची कालिंदीही.

इतक्या साऱ्या तडजोडी करून जोडत तर काहीच नाही आपण...
तडजोडी मोडताना होणाऱ्या विध्वंसाचं काय?
आणि तडजोडी जगताना होणाऱ्या विध्वंसाचं?

हाही भ्रमांच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा निकराचा प्रयत्नच की...

’तुझ्या कैफात मी आता तुलाही लागलो विसरू,असे समजू नको तू की, तुला मी टाळतो आहे...’ असं म्हणतात सानेकर, तेव्हा हा ’मोहोब्बत का भरम’ असतो त्यांना खुणावणारा? असावा. नाहीतर ’तुझा आभास सोनेरी मला सांभाळतो आहे...’म्हणजे काय?

सरतेशेवटी हे सारे भ्रम?

नात्यांचे...कुणी आपल्यासाठी असण्याचे...कस्मे-वादें निभावण्याचे...प्राणांवर नभ धरण्याच्या आश्वासनांचे...स्वप्नांचे...

असूदेत. खोटे, अल्पजीवी, कधी ना कधी जमिनीवर आदळणारे.. असूदेत. तरीपण मला हवेत. समोरच्या माणसाला नेमकं काय आणि किती कळतं आहे त्याचे अंदाज बांधणंच हातात असतं फक्त...असं म्हणत चरफडत आले आहे मी नेहमीच. तरीही. भ्रमांची ताकद कळते आहे मला आता. मला नको आहे सत्य-बित्य इतक्यात. ते मीरालाच मिळू द्या. तूर्तास तरी आपल्याला नको. आपल्याला आपले भ्रम प्यारे आहेत..


कुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहोब्बत का भरम रख...
तू भी तो कभी मुझ को मनाने के लिए आ....

क्या बात है!

कधी ना कधी ’येह आखरी शम्माही बुझाने के लिए आ...’वर पोचायचंच आहे...
तोवर ’पिन्दार-ए-मोहोब्बत का भरम रख...’ इतकंच खरं...

15 comments:

  1. nashib aani thankas.
    vegal lihilyabaddal.
    changal zalay.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. Pan Bhramacha bhopala phutla ki khup tras hoto. Tyapeksha to naslelach bara.

    ReplyDelete
  4. आधी चुकीचा बाण सोडतो; रुनानं पण ही गजल म्हटली आहे का? मी तर मेहंदी हसनचीच ऎकली आहे.
    सत्य आणि भ्रम..साराच perceptionचा खेळ आहे. Absolute truth कशाला म्हणायचं आणि का, हा आदी प्रश्नच आहे. प्रत्येक सत्यामागे कधीही कोसळू शकणारी गृहीतके आहेतच की

    ReplyDelete
  5. भ्रम-विभ्रमाच्या या morbid attraction च्या मागची तर्कागत संगती लावण्याच्या प्रयत्न लेखांत कुठे दिसला नाही. भ्रमाची ताकद जाणवतें; पण नेमकी कशांत ? टळटळीत , अचल आणि म्हणून मनॉट्नस् सत्याच्या ऐवजी कॅलिडोस्कोपिक , हरघडी बदलणारे mirage आकर्षक वाटते म्हणून ? असे असेल तर मग तपश्चर्येप्रमाणें जगणाऱ्या पतिव्रतेपेक्षा रोज संध्याकाळी नव्या कुणाकरतां नवी नव्हाळी ल्यालेली कुणी जास्त आकर्षक ठरते काय ? हे प्रश्न सोपे आणि सरधोपट उत्तरांचे नव्हेत , पण त्यांच्यापर्यंत लेखणीने जायला हवे आतां. लेखाचे तारुं खोल पाण्यांत सोडले ; परंतु गवसणी फार मोठी घडल्यासारखी वाटले नाही..

    हे छिद्रान्वेषण नव्हे. This is an appeal to find your own league, which is certainly bigger.

    ReplyDelete
  6. तुझ्या पोस्टची केव्हापासून वाट पहात होते आणि आज नसेल नवीन पोस्ट तर का नाही असंही विचारणार होते. पण नवीन लिखाण पाहून आनंद झाला. पण खरं सांगू? यातलं जे काही गाणं, काव्य़ आहे हे मी ऎकलं नाहीये आणि त्याचसोबत बाकी व्यक्तिरेखांचे संदर्भही कळले नाहीत. पण दोन वाक्य अत्तिशय आवडली.
    "तडजोडी मोडताना होणाऱ्या विध्वंसाचं काय?
    आणि तडजोडी जगताना होणाऱ्या विध्वंसाचं?" तडजोडी जगतानाचा विध्वंस जास्त असतो हे मान्य, अगदी १०० टक्के. :-)

    आता मला कळण्यासाठी दुसरी पोस्ट लवकर लिही प्लीज. तोपर्यंत मी या पोस्टचा अर्थ लावते. :-)

    -विद्या.

    ReplyDelete
  7. तीच्या भ्रमात तीलाही विसरण.. हे मला नेहमीच जाणवत म्हणुन खुप आवडल...

    ReplyDelete
  8. it was difficult to understand this post, especially since i havent heard the ghazal, nor have i read the books u refer to.
    samajaayachaa prayatna kelaa paahije... kadaachit ghazal aikali kinvaa ti pustaka vaachali tar kaahitari kalel...jau dey...shevti kaay aahe naa ki,

    "everything is an illusion...
    sab maayaa hai..."

    :)

    ReplyDelete
  9. बापरे! जबरदस्त अर्थपूर्णं आणि प्रेमाशी रिलेटेड दु:खांबद्दलसं लिहीलयेस हे पोस्ट! (अगदी माझ्या तरूणपणाची आठवण झाली!ह्यॅ..ह्यॅ..ह्यॅ..! :-) !!)

    चलता है! वयाच्या पंचविशी पर्यंतची वर्षे या प्रकारच्या दु:खात घालवशील, आणि मग कळेल की जग किती सुंदर आहे, आणि विनोदी / पॉझिटिव्ह एनर्जी देणारे साहित्य(वाचून), सिनेमे(पाहून) पुढे जगायची ताकद मिळवायची असते! दॅट्स इट!

    डोळे डबडबवून, हाता-पायातलं त्राण काढून घेणार्या पेठे, गौरी यांची संगत म्हणजे देवदासशी केलेली मैत्रीच - बिनकामाची!

    जे मनात आलं ते लिहीलं.. कोमल भावना दुखावल्याबद्दल क्शमस्व!

    ReplyDelete
  10. abhijit kulkarnichi comment mala aavadali aani patali,
    kharay.

    ReplyDelete
  11. "मेंहदी हसन"ची ऐकतो मी नेहमी...."रुना लैला"ची नाही ऐकली कधी....ही माझ्या आवडत्या गझलांपैकी एक आहे....अत्यंत सुरेख गझल....असो.....या ओळीवर नाही अडलो कधी...मला जराही वाटत नाही की तो शेर भ्रामक प्रेमाबद्दल वगैरे आहे...संपूर्ण गझल एकाच कल्पनेभोवती आहे..."तू मुझपे खफा है तो जमाने के लिए आ"...काही कर, वाट्टेल ते कारण काढ, पण ये बाई‍(बाबा)...त्यामुळे अर्थातच ती कारणंही विचित्रच असणार...न येण्याचे जसे बहाणे तुला येतात तशाच न जाण्याच्या बहाण्यासाठी ये वगैरे...ती कारणं दूरस्थ, क्षुल्लक असली तरी फार प्रभावीपणे पकडली आहेत...त्यामुळे त्या कारणांच्या सत्यासत्यतेपेक्षा मला कविच्या कल्पनाशक्तीला दाद द्यावीशी वाटते आणि ते वैचित्र्य इतक्या सहज व्यक्त करणारी अदा जास्त आवडते...मी फक्त त्या नजाकतीतच गुंततो..."सरतेशेवटी हे सारे भ्रम?" या प्रश्नाची शहानिशा बरी वाटली पण तो प्रश्न या ओळीमुळे पडावा?...नाही पटलं....

    ReplyDelete
  12. ही गझल भ्रामक प्रेमाबद्दल आहे असं मलाही नाही वाटत. पण या खेपेला ऐकताना तो ’भरम’ शब्द अडवून गेला आणि मग त्याच्यामागे हे असं भरकटणं आलं. पद्मजानं कुठेसं म्हटलं आहे, त्याप्रमाणे माणसाला अर्थपूर्ण जगत राहायला असल्या भ्रमांची गरज लागतेच, असं वाटलं. आपल्याला वाटतात तेवढे निरर्थक नसतात ते. कुठल्यातरी गुलबकावलीच्या फुलामागे धावताना राजपुत्र किती जंगलं, संकटं, राक्षस आणि परीक्षांना तोंड देतो आणि त्याचा हा प्रवासच अधिक रंगतदार आणि त्याला शहाणा करून जाणारा ठरत नाही का? तसंच कदाचित भ्रमांचं, स्वप्नांचं, ध्येयांचं... गुलबकावलीची फुलं. म्हटलं तर निरर्थक, म्हटलं तर सार्थ.
    हे सगळं मला नीटपणे मांडता आलेलं नाही हे मात्र मान्यच.
    आणि अभिजीत, प्रेमाबिमाबद्दल हे खरं आहेच. आणि तू म्हणतोस तशी लवकरच त्यातून बाहेरही पडेन मी. पण हे फक्त प्रेमाबद्दलच खरं आहे, असं वाटतं तुला?
    बाकी भावना-बिवना दुखावल्या गेलेल्या नाहीत माझ्या! असंच जे मनात येईल ते लिहीत जा, मजा येते!
    या गझलेच्या बऱ्याच वेगवेगळ्या व्हर्जन्स सापडतात. मेहंदी हसन, गुलाम अली, शहनाझ बेगम, आशा भोसले, रुना लैला... मला सर्वांत जास्त रुना लैला आवडली. पण हा फारच सब्जेक्टिव्ह प्रांत...
    रुना लैलाच्या व्हर्जनची लिंक देतेय -
    http://www.4shared.com/file/10448683/63a8e9d2/Runa_Laila_-_Ranjish_Hi_Sahi.html?s=1

    तसेच हे शब्दही -
    ranjish hii sahii dil hii dukhaane ke liye aa

    aa phir se mujhe chho.D ke jaane ke liye aa

    pahale se maraasim na sahii phir bhii kabhii to

    rasm-o-rahe duniyaa hii niibhaane ke liye aa

    kis kis ko bataaye.nge judaa_ii kaa sabab ham

    tuu mujh se Khafaa hai to zamaane ke liye aa

    kuchh to mere pindaar-e-muhabbat ka bharam rakh

    tuu bhii to kabhii mujh ko manaane ke liye aa

    ek umr se huu.N lazzat-e-giriyaa se bhii maharuum

    ai raahat-e-jaa.N mujh ko rulaane ke liye aa

    ab tak dil-e-Khush_faham ko tujh se hai.n ummiide.n

    ye aaKhirii shamme.n bhii bujhaane ke liye aa

    The following ashaar are by Talib Baghpati but Mehdi Hassan
    always sings them as part of this Gazal.

    maanaa ki muhabbat kaa chhipaanaa hai muhabbat

    chupake se kisii roz jataane ke liye aa

    jaise tujhe aate hai.n na aane ke bahaane

    aise hii kisii roz na jaane ke liye aa

    ReplyDelete
  13. Meghana, many a times i was in office when I thought to listen to this song.But today finally I listened to it. :-) And I cant thank enough for giving this song here. Wowwwww....everything in your post makes sense now....I liked these two lines the most:
    "kis kis ko bataaye.nge judaa_ii kaa sabab ham
    tuu mujh se Khafaa hai to zamaane ke liye aa"
    I cant explain my happiness to have found this song. :-)
    -Vidya.

    ReplyDelete
  14. मेघनाजी,
    हा "जी" मी अत्यंत आदरापोटी लावतोय कारण ही आहे तसंच. ही गझल, गौरी, सानिया अन् मेघना ह्यांच लिखाण हे सगळंच मला अतिशय आवडतं पण नक्की काय आवडत हे तू ह्या तुझ्या सॉलिड्ड पोस्टमधून समजावून दिलेल आहेस त्याबद्दल थॅन्क्स. :D

    ReplyDelete
  15. मला हे आवडलंय . बाकी शब्दांचा कीस पाडायचा नाहीये आत्ता. मस्त झालंय

    ReplyDelete