I'm just being foolishly absurd!

21:24:00

अशीही काही युद्धे खेळावी लागतात,
ज्यात निर्णायक पावलांनी आणि निर्विकार चेहर्‌यानं
पराभव एखाद्या डोंबासारखा उभा असतो
पुढच्याच टप्प्यावर.
आपण प्रॅक्टिकल शहाणपणा इत्यादी दाखवून
साळसूद माघार घ्यायची आहे की
पाठ फिरवण्याचा प्रॅक्टिकल निर्णय घेणार्‌या
आपल्याच सूर्याजी पिसाळांची मानवी मजबुरी क्षमाशीलपणे स्वीकारत,
बेमुर्वतपणे रक्तबंबाळ होत
पुढे घुसून ताठ मानेने मरायचे आहे
इतकाच वाव उरतो निवडीला.
युद्ध जिंकणे वा हरणे अशा वेळी अगदीच बिनमहत्त्वाचे झालेले.
डोळ्यांत उतरलेले गरम लालबुंद आवेगी रक्त
आणि डोक्यात उरलेले
'मागे फिरायचे नाही-' इतकेच तुटक वेडसर शब्द.
बाकी सगळे आपल्या जगातले नव्हेच.
अशा वेळी रक्तातला वेडसर मुरारबाजी जिंकतो
की रक्तातच दबा धरून बसलेल्या डार्विनच्या बिलंदर पेशी जिंकतात...
इतकेच पाहायचे खरे तर.
अशा वेळी काय करतात
ते खरे तर मला अजूनही उमगलेले नाही.
जीव वाचवून मुकाट खरीदावेत
शहाण्या रसिकासारखे
पिंजर्‌यातले लव्हबर्डस् इत्यादी
की झाला-न झालेसा
स्वप्नांचा राजवर्खी उदास स्पर्श जपावा
बोटांवरला?
प्रश्न मोठे भाग्याचे...
या असल्या प्रश्नांची उत्तरे देता येणे दूरच राहिले,
असले प्रश्न पाडून घेणेही आचरट आणि आत्मघातकी मानले जाते तुझ्या जगात.
माफ कर मित्रा...
I'm just being foolishly absurd!

You Might Also Like

7 comments

 1. hmm, roark ki keating - that is the question.

  ReplyDelete
 2. prashn moThe bhaagyache

  agadi paTala.

  aadhichyaa postmadhale "chandrasaheb"
  pan aavaDale.

  ReplyDelete
 3. खल्लास..हे म्हणजे "वेडात दौडले.."चं वैयक्तिकरण केल्यावर जसं होईल तसं झालय. अर्थात महाराजांच्या उचकवण्यानंतर तिथे घुसून मारण्याचाच एक पर्याय होता आणि इथे आत्माहाराज काय सांगतात त्यावर मुरारबाजी व्हायचं की डार्विन हे ठरतं.
  तुला एक सांगु का? मागे ही बोललो होतो, फारसं कलाकार होणं नाही परवडत:(, कोणत्याचं अर्थानं. मुखवटे इतके घट्ट चढवायचे की चेहरयाचाच एक भाग बनावेत. ऎन संध्याकाळी एकटे असताना किंवा माथ्यावर चंद्र चढला की कवी-लेखक होण्याच्या हौशी भागवून घ्याव्यात. मुखवटे काढताना चेहरा होतो रक्तबंबाळ होतो पण तो भाग वेगळा. शहाणी माणसं तिकडे करतात दुर्लक्ष.

  ReplyDelete
 4. "प्रश्न मोठे भाग्याचे"..खरंय!

  उनसे बात भी क्या करते?
  जवाब तो बंद हो चुके थे
  उनके पास जवाब नही थे,
  की उन्हे वे सोचने नही थे?
  सोचते तो भी क्या सोचते?
  शायद यही की वह जवाब नही जानते
  वह सवाल ही नही पूछते,
  तो हम जवाब भी क्या देते?
  अगर ऐसेही आगे चलते
  तो फिर बात क्या करते?
  शुक्र है इसके जवाब जल्दी मिल पाए
  खून की पुकार सुनी तो ये सवाल हमें आए

  (हे उगीच !)


  on a different note,

  तुझा हा जो चेहरा नसलेला (?) मित्र सगळ्या ब्लाँगमधून डोकावत असतो, त्याची आताशा मला कीव करावीशी वाटते. एखाद्याचा किती जाहीर उद्धार व्हावा?

  ReplyDelete
 5. नंदन -
  अहं, असं नाही मला वाटत. निवडीला वाव असतो का खरंच, हा प्रश्न आहे माझा.

  क्षिप्रा -
  आभार!

  संवेद -
  तुलाही परत तेच... निवडीला वाव असतो का खरंच?

  ए सेन मॅन -
  क्या बात है! ही कविता मिळाली या पोस्टच्या निमित्तानं हेच एक पुरेसं बक्षीस आहे, बाकी सगळं खड्ड्यात गेलं!
  आणि बाय दी वे - मित्र निमित्तमात्र नव्हे का? सगळा झगडा शेवटी आपला आपल्याशीच...

  ReplyDelete
 6. "मित्र निमित्तमात्र नव्हे का? सगळा झगडा शेवटी आपला आपल्याशीच..."

  bilkul sahi!

  ReplyDelete