पुन्हा या रस्त्यांवरून

15:27:00


शरीराच्या शरीरावर उमटणार्‍या मुद्रा
तात्पुरत्या आणि आजन्म,
उष्ण आणि जिवंत गरजांनी भारलेल्या,
विलक्षण खर्‍या,
आज-आत्ताच्या क्षणात पाय घट्ट रुतवून धरणार्‍या,
उद्यामध्ये पूर्ण बहरण्याच्या अनंत शक्यतांची बीजं पोटी घेऊन असणार्‍या.
मान्य.
पण त्यातच आहेत आपल्या बहुमितीय प्रसरणशील होऊ शकणार्‍या नात्याला चौकटींचे क्रूर संदर्भ देण्याच्या शक्यताही.
उद्या,
शरीरानं शरीरावर उमटणार्‍या मुद्रा
टळणार नाहीत.
ही अपरिहार्यता
आणि आश्वासनही.
तोवर जगून घेऊ देत मला
आपल्यामधले अशारीर, निवळशंख क्षण.
कसल्याही सस्पर्श देवाणघेवाणी शक्य नसताना
एकमेकांना उद्देशून हवेवर लिहिल्या गेलेल्या कवितांच्या ओळी.
प्रिय व्यक्तींनी दिलेले सल मिटवून टाकता येतील आपल्या कोवळ्या सुरांनी
अशा भाबड्या आशा बाळगत तळ्याच्या काठावरून सोडून दिलेल्या लकेरी.
टक्क जाग्या रात्री एकमेकांना सोबत करत, लखलखत्या आभाळाकडे पाहत
एकमेकांना सांगितलेल्या सुरस आणि चमत्कारिक, पर्युत्सुक सिनेमास्कोपिक गोष्टी.
शब्दांची, अर्थांची आणि मौनांचीही भाषांतरं.
स्पर्शांच्या तहानेइतकं हे सारंही माझ्या आतड्याचं आहे,
हे तुलाही ठाऊक असेलच
असा अनाकलनीय विश्वास...
जगून घेऊ देत.
पुन्हा या रस्त्यांवरून
आपण चालू न चालू...


You Might Also Like

8 comments

 1. khas.... natyatli natyavishayichi hi bhavana achuk vyakta zaliye... echha asunahi ji nehmi nistun jate aani bolavasa vatat astanahi bolta yet nahi...

  ReplyDelete
 2. तुझ्या कवितादेखील, इथे म्हणतेस तसे, माझ्या आतड्याच्या आहेत. त्यांना मात्र सस्पर्शच भिडलो, त्यांतून वेगळं होता येत नाही.
  उपकार आहेत.

  ReplyDelete
 3. सचिन,
  आभार. उपकाराची भाषा नको. कृतज्ञतेनं नको, वा उपरोधानंही नको. प्लीज.

  ReplyDelete
 4. Mi parva vachali hi Kavita...ani ti mala etaki Mazi vatali ki mala Tula hehi sangavena ki mala avadali ti Kavita. Mag parvapasun aajparyant baryachada vacahli. Ani mag mhatala Tula na sangana he ki mala kiti avadalie ti kavita,mala kiti bhayankar apali vatatey ti ha nalayakpana ahe.
  Kewadhi kewadhi khari Kavita ahe hi.kiti chapakhal. Lihit Raha muli.

  ReplyDelete
  Replies
  1. आभाराखेरीज दुसरं अर्थपूर्ण काही नाही म्हणायला. :)

   Delete