खूप जिवाजवळच्या माणसांबद्दल आपण मोकळेपणानं आणि तटस्थपणे बोलूच शकत नाही, तसंच काहीसं पुस्तकांबद्दल वाटायचं . अजूनही वाटतं. पण आपल्यातले काही भाग आपल्यातून सोडवून हे असे तळहातावर निरखायला घेतले, म्हणजे मग त्यांच्या निराळ्याच बाजू दिसायला लागतात. आपल्याही.
---
तर पुस्तकं.
मला काय वाटतं पुस्तकांबद्दल? अगदी प्रामाणिक आणि तत्काळ उत्तर - प्रचंड इन्सेक्युअर्ड वाटतं.
स्वतःची पुस्तकं नीट कव्हरं-बिव्हरं घालून जपून, कडेकोट बंदोबस्तात वगैरे ठेवणं तर ठीकच आहे. सगळेच जण कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर ते करतातच. पण पुस्तकांच्या दुकानात किंवा लायब्ररीच्या काउंटरवर आपल्या हातातली पुस्तकं सोडून शेजारच्या माणसानं कुठली पुस्तकं घेतलीयेत ते बघून जीव कासावीस व्हावा? रद्दीवाल्याच्या समोरचा जुन्यापान्या पुस्तकांचा ढीग कुणी उलथापालथा करत असेल, तर आपल्या डोक्यातलं घाईचं काम सोडून आपणही तिथे धाव घ्यावीशी वाटावी? ताज्या दिवाळी अंकांची थप्पी घरी घेऊन जात असताना वाटेत कुणी ओळखीची काकू-मावशी भेटून त्यांनी अंक मागू नये म्हणून आपण आडगल्ली पकडावी? वाढदिवसाला घरी आलेल्या लोकांनी दिलेली पुस्तकं ताबडतोब एकट्यानं उघडता यावीत, म्हणून कधी एकदा पाहुणे जाताहेत असं होऊन जावं?
मला कुणी हे सांगितलं असतं तर मी सांगणार्याच्या तोंडावरच फिदिफिदी हसले असते, इतकं वेडसर आहे हे. पण आहे.
---
एखादा खूप वापरून झालेला पत्त्यांचा कॅट असतो. त्यातल्या किलवर गोटूचा एक कोपरा थोडा झिजलेला असतो. चौकट एक्का पोटातून वाकलेला असतो. आणि इस्पिक मेंढीच्या एका कोपर्याचा टवका उडालेला असतो. पूर्ण सुट्टी जर इमाने-इतबारे पत्ते खेळण्यात घालवली असेल, तर सुट्टी सरता सरता सफाईदारपणे ही तिन्ही पानं ओळखता येतात. त्याच जातीचा संबंध माझा माझ्या पुस्तकांशी असतो.
उदाहरणार्थ 'नेगल'च्या पान नंबर अडतीसवर नेगलच्या फोटोपाशी एक लिंबाच्या सरबताचा थेंब पडलेला मला नीट आठवतो. वाचता वाचता तो आला नाही, तर एकदम चुकल्या चुकल्यासारखं होतं. किंवा 'दुस्तर हा घाट'मधे 'मनुष्याने मोहाला नेहमी शरण जावे, असं ऑस्कर वाईल्ड म्हणतो'पाशी ही पेन्सिलीची अलगद खूण कुणी करून ठेवली असेल? मी तर असल्या अभ्यासू खुणा करत नाही. मग? दर वेळेला तिथे यायच्या आधीच, दिमित्रीच्या वाक्यासोबत मी त्या खुणेचीही वाट बघत असते नकळत. तिथे पोचून 'कुणी केली असेल खूण'चा निरर्थक निष्फळ खेळ खेळूनच पुढे सरकायचं. किंवा रद्दीवाल्याकडून नकद रुपये पाच मोजून आणलेलं 'कोसला' वाचताना त्याच्या मुखपृष्ठाचं पान दुसर्या हातात सांभाळावं लागतं, किंवा बाजूला काढून ठेवावं लागतं. तरी ते तस्सं सांभाळायचं.
आपल्या पुस्तकांशिवाय परक्या शहरात राहताना, पुस्तकं उसनी आणून वाचताना 'आपल्या' पुस्तकातलं एखादं पान - त्यांतली एखादी ओळ संदर्भहीन वा ससंदर्भ डोळ्यांसमोर येते, तेव्हा काय करायचं? पुस्तकांना फोन थोडाच करता येतो?
---
पुस्तकातली पात्रं पुस्तकातली नसतातच. उदाहरणार्थ 'बाधा'मधली रमा. किंवा 'रेणुकेचे उपाख्यान'मधली रेणू. किंवा 'मुखवटा'मधली नानी.
पण लोक चक्क अमकं अमकं पात्र असं का वागलं, अशा छापाच्या चर्चा करतात. त्यांच्या वागण्याची आणि त्यांना तसं वागायला लावणार्या लेखकाच्या अकलेची चर्चा. असं कसं करू शकतं कुणी?
ती पात्रं नसतात. माणसंच असतात. जिवंत. हाडामांसाची. आपले आपले निर्णय घ्यायला मजबूर असणारी. लेखकाला मुकाट बसवून ठेवणारी. आपण पुस्तकाबाहेर. वादळाबाहेर. वार्यापावसाआड. किनार्यावर सुरक्षित. अशा परिस्थितीत त्यांचे न्यायनिवाडे करणारे, त्यांच्या बर्या-वाईट निर्णयांना तोलत चिकित्सा करणारे आपण कोण?
पण अशा चर्चा होतात. आणि आपल्याच घरातल्या कुणाबद्दल चव्हाट्यावर चवीनं बोललं जावं आणि आपण नेभळटपणानं ते ऐकून घ्यावं, हेही मुकाट मान्य करावं लागतं.
---
मालकीचं पुस्तक. बक्षिसाचं पुस्तक. आपल्या पैशांनी विकत घेतलेलं पुस्तक. कुणी भेट दिलेलं पुस्तक. कुणाचं ढापलेलं पुस्तक. कुणाचं परत करायचं राहून गेलेलं पुस्तक. अनेक निरनिराळे टप्पे.
दर टप्प्यावर मालकी हक्काच्या भावना, त्यांची तीव्रता आणि टोक, त्यामागची कारणं बदलत जातात.
दर टप्प्यावर तीच पुस्तकं निरनिराळे अर्थ, निरनिराळ्या जातीच्या सोबती देऊ करतात.
आता आपली बस भरली, असं कितींदा मनाशी आलं; तरी आयुष्यात हक्कानं-नव्यानं पाय ठेवायला येणार्या माणसांसारखी पुस्तकं जमा होत जातात.
तरी अजून मला पुस्तकांबद्दल वाटणारी मूलभूत भावना बदललेली नाहीच आहे. इन्सेक्युअर्ड वाटणं. ते आहेच!
हे बरं लक्षण म्हणायचं की वाईट?