tag:blogger.com,1999:blog-5101902922267909808.post6447686611496818777..comments2024-01-11T08:45:34.310+05:30Comments on to friends...: मगल्Meghana Bhuskutehttp://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-5101902922267909808.post-3327866063689216032018-01-11T07:36:59.435+05:302018-01-11T07:36:59.435+05:30Yup. Wish you the same again and again. Yup. Wish you the same again and again. Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5101902922267909808.post-45767445476179591902018-01-07T02:44:36.047+05:302018-01-07T02:44:36.047+05:30:) magic! In our life we work,we work hard,we achi...:) magic! In our life we work,we work hard,we achieve things, we love our parents, friends, partners,we meet new people,make new connections,we strive to become our best selves and feel proud,happy, satisfied.

But rarely, very very rarely in life we feel that truly magical feeling.truly extra ordinarily magical!Starry and glittery! Asita Ajgaonkarhttps://www.blogger.com/profile/12255611754143889450noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5101902922267909808.post-62564876828095177142017-04-21T23:29:47.462+05:302017-04-21T23:29:47.462+05:30बराच वेळ भवति न भवति करतेय. लिहावेत का खरंच शब्दार...बराच वेळ भवति न भवति करतेय. लिहावेत का खरंच शब्दार्थ? एकीकडे 'पण मग काय गंमत आहे?', तर एकीकडे 'अॅ? हे काय कोडं आहे का? ते सोडवल्यावरच खजिन्याचा मार्ग मोकळा करणारं. उगाच काहीतरी जीएसदृश उच्चभ्रू चाळे!' असे झोके. शेवटी विंदांना स्मरून लिहितेच आहे शब्दार्थ.

रूम ऑफ रिक्वायरमेंट - ही हॅरीच्या शाळेतली एक जादुई खोली आहे. शाळेच्या सातव्या मजल्यावरच्या व्हरांड्यात गेलात, तर एरवी तिचा दरवाजाही सापडत नाही. त्याच्यावरून तेरा येरझारा घातल्या, तरी सुगावा लागत नाही. पण जर तुम्हांला खरीच तिची गरज असेल, तर तुमच्या गरजेच्या सगळ्या - सगळ्या गोष्टी आणि आकारही धारण करून ती बया तुम्हांला सापडते.

डिसॅपरेशन - एका ठिकाणाहून गुप्त होणं. आणि दुसरीकडे प्रकट होणं म्हणजे अॅपरेशन.

बॉगार्ट - आपल्या अंतर्मनातल्या भीतीनं धारण केलेलं दृश्यरूप. त्या रूपाकडे बघून घाबरलात, तर ते अजून अजून अकराळ-विक्राळ होतं. पण त्याला फिदिफिदि हसलात, की विरून जातं.

पॅ(पे)ट्रॉ(ट्रो)नस - आपल्या मनातली लय भारी आठवण मनात घोळवत हातातली जादूची छडी रोखायची आणि म्हणायचं- एक्स्पेक्टो... पेट्रोनम! की तुमच्या स्वभावाशी मेळ खाऊन असलेल्या एखाद्या प्राण्याच्या रूपातलं एक गोजिरवाणा जिवंत ढग आकाराला येतो आणि तुमचं काही काळ रक्षण करतो.

हाउसेस् उर्फ घरं - हॅरीच्या शाळेतले, चार ढोबळ प्रवृत्तिविशेषांनुसार विभागलेले चार गट. त्यांचे राखीव रंग असतात. (पुढे स्पॉयलर आहे. सबूर.)

स्नेप - हे गोष्टीतलं एक पात्र. प्रेम मनात दडवून वरून खलनायकी रंग धारण करणारं.

सरतेशेवटी - मगल् म्हणजे ज्याला जादू अवगत नाही, अवगत होणं शक्य नाही, किंवा निदान अजूनतरी ज्याच्यातल्या जादुई शक्तीनं डोकं वर काढलेलं नाही, असा मनुष्यप्राणी.Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.com