नकोच

22:34:00

काय हवं?

नावगाव?
घरदार?
मूलबाळ?
शेजसंग?
डागदागिना?
प्यारमोहोबत?
कस्मेवादे?
नको.
नकोच.

एखादा शहाणा शब्द.
थट्टामस्करी मूठभर.
वादवादंग पसाभर.
असण्याची आस.
सोबतीनं वाढणं.
शिळोप्याच्या गप्पा.
ठेचांची कबुली कधी.
धीर मागणं हक्कानं.
देणं सठीसामाशी.
मागता,
- न मागताही.

पुरे झालं.
भरून पावलं.
पाणी पाण्याला मिळालं.

मिळालं?

You Might Also Like

3 comments

 1. मिळालं? नाही मिळत.मन हावरट होतं.अजून अजून मागू पाहत

  ReplyDelete
  Replies
  1. अगदी, अगदी. म्हणूनच प्रश्नचिन्हावर शेवट.

   Delete
  2. Yes. म्हणूनच जास्त आवडली

   Delete