कविता

प्रश्न

19:21:00

सुखानं नांदू लागण्याची गोष्ट नव्हेच ही.
सुखदुःख सापेक्ष.
पण अपेक्षांची सोनेरी हरणं चौखूर उधळतात, सरत्या वर्षांचे हिशेब तुडवत.
बाजी कभी इधर, तर कभी उधर.

गालिबचं तसं सोपं होतं. 
इमान आणि कुफ्र स्वतंत्र. 
माझ्या इमानाचे आणि कुफ्राचे प्रदेशही बेमालूम मिसळत गेलेले. 
बाजी कभी इधर, तर कभी उधर.

इथे झगडे स्वतःशीच आहेत. 
लोक निमित्तमात्र. 
तू लोकांच्यात मोडतोस की नाही, हा एक कळीचा प्रश्न. 
बाजी कभी इधर, तर कभी उधर.