Wednesday 7 May 2014

स्वप्नसर्प


जागांशी जडती नाती
नात्यांच्या दुखर्‍या जागा |
पावसात गुंतून राही
मायेचा अवघड धागा ||

माळावर सूर्य उद्याचे
दिवसाची देती ग्वाही |
रात्रींचा हुरहुरवारा
तरी जिवास वेढून राही ||

चढलासे बघ मज सखया
हा मोहफुलांचा अर्क |
देहात फुलांचे दंश
डसला स्वप्नांचा सर्प...

6 comments:

  1. आधीच सॉरी म्हणतो पण ज..रा समिक्षकी अंगाने लिहीतोय (अस्सं मीच म्हणणार!)
    एक विशिष्ट छंद किंवा मीटरवर कविता झाली की ह्हा बघ ग्रे..स म्हणतात तसं नाही म्हणणार मी. उलट दुसऱ्या आणि तिसऱ्या कडव्यात शेवटची ओळ मीटरच्या बाहेर गेली आहे. कवितेचं डिसेक्शन करु नये पण मला तिन्ही कडवे सुटे-स्वतंत्र वाटताहेत, एक कॉमन अंडरकरंट आहे पण मर्यादित. शिवाय नियम नसला तरी शब्दांची पुनरावृत्ती टाळणे श्रेयस्कर उदा. नाती- नात्यांच्या, मोहफुलांचा-फुलांचे.
    असो. कवितेत कवी आणि त्याचे/तिचे प्रकटणे हे सर्वात महत्वाचे. खुप दिवसांनी लिहीलसं आणि त्या निमित्तानं मला ही लिहीता आलं यात खुप काही आलं.

    ReplyDelete
  2. काय झालं. ... भट्टी बंद पडलीय की विश्राम चालू आहे? माझा विश्राम जरा जास्तच लांबला होता.

    ReplyDelete
  3. @संवेद
    हॅट! सॉरी काय आणि लेका! आक्षेप मान्यच. पण शेवटी आपल्या गूगलबापाचा ब्लॉग आहे. करा प्रयोग च्यामारी...
    @mad-z
    मधे अंंमळ शांततेचा काल होता खरा. आता बघू...

    ReplyDelete
  4. @आंबट-गोड
    ग्रेसचं नाव ऐकून गुदगुल्या झाल्या. खोटं का बोला! पण संवेद म्हणतो आहे ते सत्य आहे. त्या कवितेत बर्‍याच फटी आहेत.

    ReplyDelete