Friday 3 January 2014

वाटेवरल्या मुशाफिरास


ही फार आवडलेली एक कविता -

To a Stranger..

PASSING stranger! you do not know how longingly I look upon you,
You must be he I was seeking, or she I was seeking, (it comes to me, as of a dream,)
I have somewhere surely lived a life of joy with you,
All is recall’d as we flit by each other, fluid, affectionate, chaste, matured,
You grew up with me, were a boy with me, or a girl with me,
I ate with you, and slept with you—your body has become not yours only, nor left my body mine only,
You give me the pleasure of your eyes, face, flesh, as we pass—you take of my beard, breast, hands, in return,
I am not to speak to you—I am to think of you when I sit alone, or wake at night alone,
I am to wait—I do not doubt I am to meet you again,
I am to see to it that I do not lose you.

- Walt Whitman

आणि हा तिच्या भाषांतराचा प्रयत्न -

वाटेवरल्या मुशाफिरास -

१.

परिचयाची खूण नाही, नाही वा लवलेशही
स्पंदनांचा मात्र तुझिया भास हो मज प्रत्यही
आसावल्या स्वप्नांतही तू स्वप्न होऊन राहसी
कोण जाणे कोणत्या जन्मातुनी ये ओढ ही?
आज या पिकल्या क्षणी वाटांस वाटा भेटता
गाठ नाही, भेटही पण, स्पर्श होई निसटता
या क्षणातून वाहिले, जे जे उधळले, जे राखले
कोण जाणे कोणत्या जन्मात येईल सांगता?
हेच होते हेच सारे, होय, हे मज लाभलेले
हातांत हातां मन गुंफुनी एकमेकां वाहिलेले
स्तन्य माझे, वीर्य माझे - ओठांतुनी ओठांतही
कोण जाणे कोणत्या जन्मात आपण प्राशिले?
मात्र आता एकट्याने, चालायचे, चालायचे
कातरी वेळांत दचकून तुज पुन्हा आठवायचे
पडतील फिरुनी गाठी अपुल्या, नक्की, मला ही खातरी
निर्धार आता हाच तोवर ना तुला हरवायचे

२.

तुझ्यावर खिळलेल्या माझ्या नजरेतली ही ओढ तुला पुरती ठाऊक नाही.
तुझेच स्पप्न पडत आले आहे मला वारंवार, तुला खरेच ठाऊक नाही.
कुठल्यातरी एका जन्मात नक्की खिदळलो आहो आपण एकमेकांसोबत
आपल्या ओझरत्या स्पर्शाच्या या निसटत्या क्षणातून,
वाहत निघाले आहे आपल्यामधून बरेच काही...
कुठल्यातरी एका जन्मी
ऐकले आहेत आपण एकमेकांच्या नाडीचे ठोके कान लावून
दिले-घेतले आहेत काही चिमणीचे घास, काही ऊबदार श्वास -
इतके की - आता आपल्या शरीरांतही केवळ आपले असे,
फार काही उरले नाही...
वाटेवरच्या या निसटत्या क्षणीही अचूक माझ्यापाशी पोचते आहे तुझी नजर
तुझ्या अंगाचा गंधही पोहोचतो आहे थेट इथवर
तसे तुझे तरी हात मोकळे कुठे आहेत?
माझ्या अंगांगांचे सारे वळसे वेढून बसले आहेतच की तुलाही...
इथून पुढली वाट मात्र एकट्यानेच काटायची आहे.
माझ्या ओठांवर असणार आहे लाखबंद मोहोर,
नि रात्रीलाही तुझ्या आठवणीचाच काय तो आधार आहे.
पण मला ठाऊक आहे -
अमावास्या जरी झाली, तरी उजाडायचे काही राहत नाही
फक्त तोवर हरपू द्यायचे नाही तुला क्षितिजापार...
मग गाठ पडायची काही राहत नाही!


7 comments:

  1. मला दोन गोष्टी आठवल्या: एक म्हणजे एक गाणं: Some day out of the blue
    In a crowded street or a deserted square
    I'll turn and I'll see you as if our love were new
    Some day we can start again, some day soon

    आणि दुसरं म्हणजे एक प्रसंग:
    त्या दिवसांमध्ये मी नुकती पंचविशी पार केली होती.आणि मी खूप म्हणजे खूप भटकायचे. ते देखील एकदम अनोळखी groups बरोबर.एका वर्षात मी भूतान,लडाख,हम्पी,दिल्ली अशा चार ट्रिप्स मारलेल्या मोठ्या आणि त्या ही वेगवेगळ्या लोकांबरोबर.मला इतकी मजा यायची नवीन माणसांना आपलं बनवायला.अगदी मनापासून सांगायचं तर मला झिंग चढलेली अशा भटकण्याची.तर माझ्या मैत्रिणीच लग्न होतं. आणि तिचा photographer चक्क BBC चा photographer होता चक्क.काहीतरी कारणांनी मी त्याच्याशी खूप गप्पा मारलेल्या.आणि त्याने तेव्हा मला हे सांगितलेला "beware.. once you start longing for strangers, you will lose your own people". मला तेव्हा खूप गम्मत वाटलेली आणि असा नाट्यमय dialogue वाटलेला.पण over the years, इ perfectly understood what he meant to say!

    आणि हो,मी तुला stalk करतेय.:p

    ReplyDelete
    Replies
    1. आभार.
      About stalking : When one is writing a blog, which is not private, she must have at least a tiny, shy, crazy part somewhere hidden, which enjoys such advances. Don't you think so?!
      Anyway, दोन्ही आठवणी आवडल्या. लक्ष्यात राहतील. मागे एकदा मी एक प्रयोग करून पाहिला होता. आपण अनुभवलेली एखादी कविता आपल्याला नक्की का आवडते, ती आपल्या डोक्यात कोणकोणत्या अनुभवांचं-आठवणींचं मोहोळ जागवते - हे जर आपण कवितेसकट कुणाला सांगितलं, तर ऐकणार्‍याला ती कविता माझ्या अनुभवांसकट आठवेल का? एकरेषीय अनुभव द्विमित, त्रिमित आणि कदाचित अनेकमित करत जाण्याचं हे तंत्र मला बेहद्द मोहक वाटलं होतं. ते मी आज उलट्या टोकाकडून अनुभवलं. आभारी आहे.

      Delete
    2. तू काय आभारी? मीच आभारी. आणि खरोखर फार मनापासून खूप खोलवरून आभारी आहे. आपण जेव्हा चार चौघांसारखं रुळलेल्या रस्त्यावरच आयुष्य जगत नसतो तेव्हा माझ्यासारख्या माणसांची,अनुभवांची अतिशय ओढ असलेल्या माणसाची फार तगमग होते.ज्या validation साठी मी चाचपडत असते अखंड,ते मला तुझ्यासारख्या लेखकांच्या लेखांमधून मिळतं आणि ती पाच मिनिट्स का होइना फार शांत वाटतं.validation कशाला वगैरे वेगळे मुद्दे आहेत. पण मला असं वाटत खरं.

      Delete
    3. माझा फार आवडता एक लेखक म्हणतो, 'लेखन म्हणजे गप्पाच. फक्त स्थळकाळाच्या हिशेबात दूरवर फेकून मारलेल्या!' तर - मनापासून गप्पा मारल्यावर वाटतंच शांत. भले त्याला validation म्हणा, किंवा आणखी काही.
      बाकी The feelings are mutual असं म्हणत आपण आभारप्रदर्शन आटोपतं घेऊ या. ;-)

      Delete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete