Wednesday 22 February 2012

पांढर्‍यावर काळं


या नोंदीला तसा काही अर्थ नाही. पण अगदीच निर्मनुष्य शांततेला छेद द्यायचं ठरवलंय मी - कसल्याही स्पष्टीकरणाशिवाय. म्हणून हे पांढर्‍यावर काळं. आपापल्या जबाबदारीवर... इत्यादी.
---
वेगवान, सनसनाटी, धरून ठेवणार्‍या - पण परभाषक - पुस्तकात बुडून गेले असताना एकदम साक्षात्कार झाला: आपण ज्या भाषेत वाचत असतो, त्याच भाषेत डोक्यातला विचारही चालतो. शिरूभाऊ वाचताना आपोआप 'हात् भोसडीच्या!' किंवा कुरुंदकर वाचताना '...आपण हे काळजीपूर्वक समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे' किंवा कोसला वाचताना 'उदाहरणार्थ' ... हे असे फटाफट डोक्यात उगवत असतात - फक्त पुस्तकाच्याच नव्हे, इतर कोणत्याही संदर्भात. म्हणून मग इंग्रजी वाचताना डोक्यातला विचारही इंग्रजी होतो आणि त्या विचाराला पुरेलशी भाषेची तयारी नसेल, तर अर्धवट धेडगुजरी वाक्यसमूह वेळ मारून नेतात.

म्हणजे सकस लिहून व्हायचं असेल, तर त्या भाषेतलं सकस-श्रीमंत वाचणंही अपरिहार्यच.
आणि तरी प्रभाव इत्यादी न पडू देण्याची कसरत.
आणि श्रेष्ठ वाचूनही स्वतःला न्यूनगंड येऊ नये, म्हणून लेखकू 'अहं'ला एक जास्तीचं टोक काढून ठेवायचं.

इज इट वर्थ इट? की हे आपल्याच धोतरात पाय अडकून पडणं फक्त?

नाही, पण हा वाद मी गुंडाळून ठेवलाय, जेव्हा हे पांढर्‍यावर काळं करायला घेतलं तेव्हाच. आता रडीचा डाव नाही.

7 comments:

  1. Welcome back :)

    इज इट वर्थ इट?
    - माझ्या मते तरी, हो. बाकी हा विषय तसा मोठा आहे. इतरांच्या प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक.

    ReplyDelete
  2. खूप बरे वाटले इथे नवीन update पाहिल्यावर.

    ReplyDelete
  3. मंडळ आभारी आहे असं म्हणण्याची पद्धत आहे...

    ReplyDelete
  4. Changlya vachanacha swathachya lekhnavar parinam hone ha ek side effect ahe.
    Asa side effect ahe mhanoon changla vachava kee naheee haa ha gahan prashna padoon ghena chukiche ahe. Vachanane aplya jaganyavar jo parinaam hoto to kaik patine mahatvacha ahe, tya nadaat tumchya likhanavar, vichar karnyachya bhashevar vagere temporary side effect zale tar zale.

    ReplyDelete
  5. अर्रे लोकहो! आभाराबद्दल आभार. :)
    जृंभणश्वानसाहेब, आपण कुठे गायब झालाय? तुम्हीपण खूप वाचताय का? :)

    ReplyDelete
  6. आता रडीचा डाव नाही. he ekdam patala. kharach far raddradd asate marathi blog var.

    ReplyDelete
  7. :O हे मी पाहिलंच नव्हतं. संवेदशी सहमत.

    ReplyDelete