Tuesday, 13 January 2009

आम्ही लटिके ना बोलू...

एखादा देणेकरी सतत आसपास दिसत राहावा तसंच हे. गप्प, घुमा, निर्विकार चेहर्‍याचा, चिवट देणेकरी. त्याला नजरेसमोरून वारता वारता आपण थकत जातो, पण तो थकत नाही. कुठल्याही जिवंत अनुभवाच्या परीघात हक्कानं येत राहतो तो. निर्लज्जपणाचा आव आणत आपण अधिकाधिक अस्वस्थ.
चंदन-आंघोळीच्या ताज्या गंधापासून ते प्रचंड मानसिक दमणुकीच्या कडेलोट क्षणीही - हे शब्दांत पकडता येईल? वापरता येईल कुठे? - असा धंदेवाईक प्रश्न डोकं वर काढत राहतो आणि आपण आपल्यावरच्याच संतापानं होत राहतो बेभान.
धड भोगता येत नाही, धड मांडता येत नाही अशातली अवस्था. शरम तर वाटतेच आहे. तरीही - एकदाच कोलाजाची एक धेडगुजरी गोधडी विणून नामानिराळं व्हावं का- असा गेंडाकातडी प्रश्न पडतोच. आपण लोचट की हा प्रश्न लोचट - अशी कोडीही नकळत सोडवत बसलेले आपण.
अशाच कितव्यातरी क्षणी हातात येतो एखाद्या अनुभवाचा निसटता तुकडा. आपण धंदेवाईक तानाजी होऊन घोरपडीच्या वरताण नख्या रोवतो. आता शेंडी तुटो वा पारंबी तुटो, वरती पोचायचं आहे बस्स, असं डोळ्यांत उतरलेलं रक्त. तरीही हातात मातीच येते. येऊ शकते.
सर्जनाचे रंग असेही. विटके. मळके. रंगहीन.

7 comments:

 1. तुमचा ब्लॉग बरेच दिवस अपडेट झालेला नव्हता. त्यामुळे हे पोस्ट येऊनही आठवडेच्या आठवडे उलटून गेले , तरी वाचलेच नव्हते.
  स्फुट आवडले. सर्वात आधी , मला वाटते , स्फुटलिखाण, ललितनिबंध किंवा ब्लॉगचा तुम्ही जो फॉर्म अंगिकारला आहे तो मला एकदम पसंत आहे. विचारकणांचे स्फटीक बनल्यानंतर एका बशीत घेऊन ते अभ्यासावे , वर खाली करून त्यांची चमचम अनुभवावी , त्यातून काही नवा पॅटर्न बनतो का ते पहावे तसा हा तुमचा प्रकार. ते मला आवडते. तुमच्या खासगी आयुष्याबद्दल काहीही माहिती नसूनही - किंबहुना नसल्यामुळेच , जास्त निरामयतेने - या "प्रयोगां"चा आनंद लुटता येतो आहे.
  तर, हे तुमचे प्रस्तुत पोस्ट. अनुभव येणे - त्यांच्याबद्दल, त्यांच्यामुळे घुसळून , सचैल होऊन किंवा मलिन होऊन निघणे आणित्याचवेळी याबद्दल साक्षीभाव ठेवून असणे यातील विरोधाभास इथे चांगला अधोरेखित झालेला आहे. मूळ "कोर्‍या" अनुभवावर मळकट बोटे फिरवण्याची प्रतिमा मला विलक्षण वाटली. "आपण धंदेवाईक तानाजी होऊन घोरपडीच्या वरताण नख्या रोवतो." या वाक्यावर , गडकरींच्या राजसंन्यासातल्या (माझ्या मते "जिवाजी कलमदाने "च्या ) प्रसिद्ध विधानाची छाया आहे : "असा एकही गड नाही की जिच्यावर या बुद्धीची घोरपड चढू शकत नाही "या अर्थाचे. (सॉरी , मूळ वाक्यातला लहेजा आणि माझे अंधुक आठवणीतले उधृत यात काडीचाही संबंध नाही !)

  मला असे वाटते , याहून थोडेसे खोल पाणी होईल एपिस्टेमॉलॉजीचे : "How do we know what we know?" याचाच एक भाग प्रस्तुत पोस्टच्या एका वाक्याशी जोडता येईल. पोस्टमधले वाक्य आहे : "कुठल्याही जिवंत अनुभवाच्या परीघात हक्कानं येत राहतो तो. " त्या संदर्भात खालील आकृती पहावी. कदाचित ती या वाक्याला अनुलक्षून आहे असे वाटू शकेल : http://en.wikipedia.org/wiki/File:Classical-Definition-of-Kno.svg

  ReplyDelete
 2. आईशपत - हा मुक्तासुनीत थोर आहे!
  तो सेन्सिबल बोलला पहिले ५० टक्के - then he lost me.
  Meghana - I dont know you - but I absolutely hate you when u talk about that - लोचट प्रश्न shit and देणेकरी and stuff.
  You seem like a different person when you get to the past para. I know u r trying to be honest with urself - सुक्याबरोबर ओलंही जळतं - or vice versa or whatever.
  The difference became too stark when I read this post after the latest one.

  I am not asking you to change - thats not possible with anyone - but for whoever's sake - make it hard-hitting.

  Say - ले भेंचोद - and say the same stuff! How hard can it be?

  ReplyDelete