Saturday 14 June 2008

पूर्ण भाग जाणारं पुस्तक

सगळं काही शेवटी आलबेल होतं. सगळ्या अडचणी सुटतात. सगळ्या अनाकलनीय कोड्यांची नीट संगतवार उत्तरं मिळतात. सगळ्या दुष्ट लोकांचं वाट्टोळं होतं. सगळ्या सज्जन लोकांचं अखेर यथासांग भलं होतं. नायकाला नायिका मिळते. ते एकमेकांवर संपूर्ण आणि सखोल प्रेम करू लागतात. आणि दोघे सुखाने नांदू लागतात.

असले शेवट असणारी पुस्तकं लिमिट डोक्यात जातात. काहीतरी उंचावरून खाली फेकून द्यावं, काहीतरी तोडून-मोडून-जाळून टाकावं, कुणाच्यातरी उगाचच कानफटात हाणावी, अश्या अनेक अनावर हिंसक इच्छा असल्या पुस्तकांचं शेवटचं पान संपवल्यावर जाग्या होतात. सगळं जग बेतशीर सुबकपणे आपल्या दीडवितीच्या शब्दकोड्यात चपखल बसवणार्‍या लेखकाची आणि वाचणार्‍या आपली दया-दया येते.

बाकी सगळ्याचं ठीक आहे. पण हॅरी पॉटरचं हे असं नेमकं कधी झालं?

नेमका पान क्रमांक वगैरे आता आठवत नाही.

उलट त्यातलं समांतर अद्भुत विश्व पाहिलं, तेव्हा भारावून जायला झालं होतं.

'मिरर ऑफ डिझायर'मधे साध्यासुध्या आरशासारखं आपलं प्रतिबिंब दिसत नाही, तर आपल्या अंतर्मनातल्या तीव्र इच्छा मूर्त झालेल्या दिसतात, हे कळलं तेव्हा त्यातल्या अर्थपूर्ण कल्पनेची भन्नाट मजा वाटली होती.

'विझार्ड नेव्हर चूजेस वॉण्ड, इट्स दी वॉण्ड हू चूजेस दी विझार्ड' हे अजब वाक्य वाचलं, तेव्हा चक्रावून जायला झालं होतं. पण मग त्यातून छडीसारख्या निर्जीव गोष्टीला बहाल केलेला जिवंतपणा आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्व दिसलं आणि बाईंबद्दल आदर वाटला.

'सॉर्टिंग हॅट'ची कल्पनाही अशीच अफलातून. आपल्याला जे व्हायचं असतं, ते आपल्याला होता येतंच. फक्त तितकी तीव्र इच्छा आणि निर्णयाचा ठामपणा असायला हवा, असं श्रीमंत तर्कशास्त्र सांगत होती बाई.

प्रत्येकाचा पॅट्रोनस फॉर्म (च् च्! पॅट्रोनस म्हणजे तुमच्या मनातल्या होकारात्मक भावनांनी तुमच्या वॉण्डमधून समूर्त होणं.) निरनिराळी रूपं घेतो इथवर ठीक आहे. पण लिलीवर नितांत प्रेम करणार्‍या स्नेपच्या पॅट्रोनसनं लिलीच्या पॅट्रोनसचा आकार घ्यावा? हे अद्भुत होतं.

राक्षसाचा प्राण कुठल्यातरी पोपटात असण्याची कल्पना आपल्याला कुठे नवीन होती? त्याच धर्तीवर व्होल्डरमॉटनं आपल्या जिवाचे सात तुकडे केले आणि अमर होण्याकरता ते कुठेकुठे दडवून ठेवले. पण त्याच्या जिवाचा एक अंश असावा चक्क हॅरीमधे. आणि त्यातून त्या दोघांमधे एक जिवंत दुवा निर्माण व्हावा? बालवाङ्मयाची काळी-पांढरी सरहद्द संपते आणि त्यांची अनाकलनीय सरमिसळ असलेला राखाडी प्रदेश सुरू होतो, तिकडे चाललं होतं सारं.

प्राणिसृष्टी म्हणू नका, भाषा म्हणू नका, मंत्र म्हणू नका, खेळ आणि विज्ञान म्हणू नका... एक संपूर्ण नवीन विश्व.

सर्वसाधारण कल्पना जर एकरेषीय असतील, तर हे कल्पनेचं विश्व म्हणजे एखाद्या प्रसरणशील ताकदवान विस्फोटासारखं होतं. दाही दिशांना विस्फारणारं. विस्फारत राहणारं.

दुर्दैवानं ते तसं राहिलं नाही. दर गोष्टीचा एक साचा ठरत गेला. नियम बनत गेले. दर वर्षी काहीतरी संकट यावं. हॅरीनं त्यावर मात करावी. सरतेशेवटी प्रोफेसर डंबलडोरनी सगळ्या अनुत्तरित प्रश्नांची संगतवार उत्तरं द्यावीत... सगळं कसं संतापजनक प्रेडिक्टेबल होत गेलं. शेवटच्या वर्षी हॅरीनं व्होल्डरमॉटवर मात केल्यावर त्याचं गिनीशी लग्न व्हावं, त्याला तीन मुलं व्हावीत (दोन मुलगे आणि एक मुलगी!) आणि त्यातल्या एकाचं नाव 'अल्बस सिव्हेरस' असावं हा तर गलिच्छपणाचा कळस होता.

अखेरशेवट हॅरीला पूर्ण भाग गेलाच.

फक्त हॅरीच नाही. अशी अपेक्षाभंग करणारी अनेक पुस्तकं असतात. माणसंही असतात - ज्यांचा थांग लागतो आपल्याला सहज. आणि सगळं इतकं सहज-प्राप्य-खुजं-नीटनेटकं असल्याबद्दल एक रानवट संताप येतो.

एरवी खरंतर एखाद्या संख्येला पूर्ण भाग गेलेला मला आवडतो. सगळं आलबेल चालू असल्याचा, सगळ्यावर आपला ताबा असल्याचा, सगळं नीट आवरून ठेवल्याचा एक फील येतो...

पण पुस्तकं, सिनेमे आणि माणसं? त्यांना पूर्ण भाग न जाण्यातच गंमत आहे.

14 comments:

  1. Yeah it's irritating to find things to be predictable while we we hope to explore the unpredictability. But Harry Potter is a human and so is Rowling!

    But still I would forgive her for the fringe benefits of failure and importance of innovation that she offers.

    ReplyDelete
  2. "Deathly hollows" vachun he tu lihila asnar.Last book was supposed to be "Grand finale" but it was disappoitning. Pan aadhiche 6 parts changle hote (at least mala tase watale)....tyamadhe story changlich build zali hoti.Maybe unexpected shevat karnyachya nada madhe shevtacha part fasla.
    BTW, tuzya list madhe ek gosht rahili - "Portkey". Ani harry potter chi series ek portkey ch navhti ka? veglya jagat gheun janari :)

    ReplyDelete
  3. barobar ahe tuza...
    kay gammat ahe purna bhag janyat...
    pan to jawa mhanun tar apn sagle aata-pita karat asto... te tasa pratyakshat kadhich hot nahi mhanun tar pustakat karun apli tahan bhagawnaycha prayatna asto... ani manatlyamanat aplyala hi kuthetari nakalat ka hoina to bhagakar purna vhawa ashi echchatar astech...

    harry potterchya babtithi tech zalay...
    'satha uttari sufal sampoorna'... asa mhanawasa watata shewat chalyawar...

    pan etkya mothya kalakruti baddal manasane possessive hona he swabhawikch nahi ka? aplya kalakrutila dusrya koni bhagu naye mhanun tine keleli khatpat mala ayogya watat nahi...
    ha tila support karaycha mudda nahi pan its perfectly human dear...

    ani poorna bhagun sampawla mhanun ticha mahatwa kami nahi hot... shewatanantr pan pudhe wat baghat sodun denya aiwaji tine te band karun taklay...

    ReplyDelete
  4. Harry Potter ne Hirwa Popat kelela disto ahe! :)

    pustakancha jau de...Mansana jar purn bhaag nahi gela tar urlelya baki cha apan kay karto? kuthetari vyasthit fir karaycha prayatna kartoch na?

    ReplyDelete
  5. I havn't read Harry Potter but did see some of the movies, and it's true that after first part the theme was harry - some trouble by Lord Voltmart - harry wins
    It's was bit irritating. Still those stories were intented for kids and that's wat Rowling showed with happy endings.

    ReplyDelete
  6. मी ज...रासं वेगळ्या पद्धतीनं मांडतो.

    सगळ्यात आधी त्या बाईला प्रणाम. तीनं ही सारी पुस्तकं लिहीली म्हणून नाही. पण कसं, सिक्वेल म्हटलं की बोअर व्हायलाच लागतं. मग तो शोलेचा सिक्वेल असो किंवा सरकारचा. पण त्यात आपोआपच एक प्रेडिक्टीबिलीटी येतेच. पण या बाईनं शेवटचं एक सोडलं तर बाकी साऱ्या पुस्तकात ती चांगलीच झाकून ठेवलीय. डेफ़िनेटली, ईव्हन पहिला भाग देखील तसा प्रेडिक्टेबलच आहे. पण नाविन्यामुळं आपण प्रेडिक्ट करायला धजत नाही. आणि एकदा का एक्स्पेक्टेशन्स सेट झाल्या की मग त्या पेक्षा कमी पर्फ़ोर्मन्स खपत नाही. आपल्या प्रोजेक्ट्समधे ही असंच काही होतं, नाही का!

    जरा सायकॉलॉजीच्या द्रुष्टीकोनातून विचार केला ना तर कसं असतं बघ, प्रेडिक्टेबल आणि अनप्रेडिक्टेबल ही दोन्ही अपेक्षाभंगाची समांतर कारणे आहेत. प्रेडिक्टेबल गोष्ट प्रेडिक्ट नाही करता आली तरी अपेक्षाभंग आणि अनप्रेडिक्टेबल अशी छाप असलेलं प्रेडिक्ट केलं तरी अपेक्षाभंगच. आणि गणिताच्या नियमानुसार तुम्ही पोकळीकढे जरी बराच वेळ बघत बसाल तरी तुम्हाला त्यात पॅटर्न सापडेल. मग रोलींगबाईच लिखाण तर फिजीकल एक्झिंस्टन्स आहे. त्यात तर आपल्याला पॅटर्न नक्कीच सापडेल. "गुप्त" सिनेमामधे काजोल ने मर्डर केलाय हे कळालं की झाल ... संपली मजा... तसंच पॉटर आणि त्याच्या कहाण्याचं.

    महत्वाचा मुद्दा असा की आपल्या लहानपणीही फ़ेणेच्या रुपात हॅरी होताच. पण तेंव्हा तो आपल्याला प्रेडिक्टेबल नव्हता वाटला. कदाचीत वाढत्या एक्स्पिरिअंन्सचा परिणाम. काय म्हणते!

    ReplyDelete
  7. माणसांनी अनवटच असण्याचा आता इतका नियम झालाय की त्यांच सहज समजून येणं तुला अपेक्षाभंगाचं दु:ख/संताप देतय कां? असं कोणी असेलच निवळ सहज तर त्या पारदर्शीपणाचं कौतुकच करुन टाक लगेच. गढूळून तळ दिसेनासं होणं फार दूर रहात नाही.
    भाग आपल्या मनाचेच जात नसतात बरेचदा. आणि म्हणून मग गणितं सुटता सुटत नाहीयेत असं वाटत रहातं.
    सुंदर लिहिलं आहेस. विचारांना ’भाग’ पाडत जातात तुझी पोस्ट बरेचदा. त्यातलं हे एक.
    अर्थात HP बद्दल आठवताना मला तरी त्या पुस्तकांनी केवळ निखळ आनंदच दिला इतकंच आठवायला आवडेल. बाकी काही विचार नकोच.

    ReplyDelete
  8. आम्हाला इंग्रजी मुळी येतच नाही त्यामुळे पुस्तक वाचणं जमलेलं नाही. आम्ही आपले हॅरी पॉटर और सॉसरस (??) स्टोन असं हिंदीत पाहातो. "उडा ले जायेगी हैरी ये झाडू तुम्हे" असं न डब करता सरळ सरळ "हैरी , ये झाडू तुम्हे उडा ले जायेगी" असं डब केल्यानं सिनेमे पाहीले पण गेले, मजा पण आली आणि फास्टर फेणे शेवटी संकटातुन सुटणारच हा जसा नियम आहे, तश्य़ाच पद्धतीनं हॅरी पण शेवटी सुटत जातो. आता सिनेमा, पुस्तक लहान मुलांचं, आपण कश्याला पाहावं/वाचावं? त्यांना सुखांत शेवट (श्या..जीन्स ची पॅन्ट!!)बरा पडतो.
    आता तू शिंग मोडून वासरात गेलीस आणि गणित बदललं.
    रोलिंग बाईंचा गेम थिअरीचा अभ्यास नसल्या कारणानं तू त्यांना माफ करुन टाकच..

    ReplyDelete
  9. me kadhi Harry Potter wachalela nahi ... pan hi post aawadali ... I got ur blogs link from somewhere and now wait for ur every new post ... Great to read ..

    ReplyDelete
  10. मी दिनेशशी सहमत :) पूर्ण भाग जण्याचीच तर धडपड असते न आपली सगळ्यांची.

    आधीच हॅरी हा जिव्हाळ्याचा विषय. त्या पुस्तकाने इतके दिले आहे की शेवटचा भाग हातात घेईपर्यंत भाग जाणे न जाणे काही फरक पडत नाही!

    हे झाले न आंधळे प्रेम :)

    पण एका गोष्टीशी सहमत. तो शेवटचा epilogue नको होता!

    ReplyDelete
  11. aata kay havay tula lihayala?
    kay kami aahe aata?

    ReplyDelete