Thursday 13 March 2008

आपल्याला मुळात लिहावंसं का वाटतं?

डोक्याच्या तळाशी खळबळणारे काही प्रश्न आणि नुकतीच घडलेली काही निमित्तं. म्हणून हे इथं मांडते आहे. ब्लॉग लिहिण्याचा - खरं तर लिहिण्याचाच - खटाटोप करणार्‍या सगळ्यांनाच उद्देशून आहेत हे प्रश्न. काही अंदाज. काही बिचकते निष्कर्ष. काही निरं कुतुहल.

सहमत व्हा, विरोध नोंदवा, वेगळी मतं मांडा.... हे फक्त विरजणापुरतं -

आपल्याला मुळात लिहावंसं का वाटतं हा प्रश्न कधी पडलाय तुम्हांला? लिहिणं आणि आपण यांच्यातले हे विचित्र संबंध नक्की काय आहेत, याचा छडा लावण्याचा फॅसिनेटिंग खेळ कधी खेळावासा वाटलाय?

सहसा असं दिसतं, की प्रचंड उंची गाठणार्‍या कलाकारांना निदान सुरुवातीच्या काळात तरी त्यांच्या माध्यमाखेरीज कशातच फारशी गती नसते. म्हणजे, जर कुठे 'अहं' गोंजारला जात असेल, तर तो तिथे. बाकी सगळीकडे नुसतंच हाड्-तुड् करून घेणं. हरणं. माती खाणं. मग आपोआपच माणूस आपल्या माध्यमाचा आसरा घेतो. तिथे अधिकाधिक रमत जातो. अभिव्यक्तीसाठी चॅनेल सापडत नाही, म्हणून ते माध्यमाकडे ओढले जात असतील, की माध्यमावर इतकी पकड आल्यावर काहीतरी ओकून टाकावं असं वाटत असेल? की दोन्हीही? की अजून काहीतरी निराळंच?

आणि इतक्या सरावाचं, सवयीचं, जवळ जवळ गुलामाइतकं पाळीव-इमानदार माध्यमही जेव्हा चॅनेल म्हणून अपयशी-अपुरं ठरत असेल तेव्हा?

तेव्हा स्वतःवरचा विश्वास उडावा इतकी टोकाची निराशा-चीड-हतबलता येत असेल? की त्याही परिस्थितीत कुठे तगून राहता येईल तर ते तिथेच, असं वाटून माध्यमाच्या कोशात दडी मारून राहावंसं वाटत असेल? अजून निराशा.. अजून चीड... अजून तगमग. आणि तरीही काय होतं आहे स्वतःला ते नाहीच धड गवसत. आत काय तडफडतं आहे, ते नाहीच बाहेर येत.

तेव्हा?

माध्यम आणि त्या माध्यमावर इतक्या अपरिहार्यपणे - एखाद्या अपंग मुलासारखे - अवलंबून असणारे आपण या दोघांचाही तीव्र स्फोटक संताप येत असेल? आणि या ठसठसणार्‍या दुखर्‍या ठणक्यातून उसळून येत असेल काही?

की दर वेळी हे इतकं इण्टेन्स, इतकं झांजावणारं काही नसतंच?कधी नुसताच इगो सुखावणं? माध्यमावरची स्वतःची हुकूमत अनुभवणं? 'सराईतपणा' एन्जॉय करणं?

नक्की काय? की सगळंच?

लिहिणं म्हणजे तुमच्यासाठी नक्की काय?

माझा खो संवेदला.

***


हा खेळ खेळायला चढत्या क्रमानं मजा येतच गेली, येते आहे. खरं तर खेळ अजून संपला नाही. पण आता साखळी लांबत चाललीय. अजून बरीच मंडळी लिहितील. तोवर साखळी एका ठिकाणी सापडावी, म्हणून थोडा खटाटोप -
"आपल्याला मुळात लिहावंसं का वाटतं?" - संवेद
ठिपक्यांची न बनलेली रेषा... - ट्युलिप
मैंने गीतों को रच कर के भी देख लिया... - राज
I think, therefore... - सेन मॅन
फिर वही रात है... - मॉन्स्यूर के
माझिया मना जरा सांग ना... - विद्या
खो-खो, चिमणी, मंत्रा! - जास्वंदी
मी आणि पिंपळपान - संवादिनी
मी का लिहिते? - यशोधरा
जेव्हां माझ्या ego च्या हातून माझ्या id चं मानगूट सुटतं तेव्हां. - सर्किट

9 comments:

  1. nakki nahi sangu shaknaar

    Pan mi hi lihito kahi na kahi tari aani chaapto majhya blog var
    http://maharashtramajha.blogspot.com

    lokehi yetat vachtat aani kautuk hi karataat, aataa lihilay BAL KESHAV THACKERAY, tumhi hi wacha n visarta

    ReplyDelete
  2. मला वाटते, लिहिणं म्हणजे आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून देणे किंवा आपल्यातील एखादे कला - कौशल्य जपणे

    ReplyDelete
  3. lihaN mhanaje... kagadaashii kinava tyaa madyamaashii maitri karan...kinva sa.nvaad saadhan...kadhii manaatalii bhadas baher kaadhan ... mala vatat lihan mhanaje vhyakt hon....

    ReplyDelete
  4. घेतला तुझा खो...

    ReplyDelete
  5. kho majhya paryant pochla aahe.
    thanks for the opportunity. :)

    ReplyDelete
  6. kheL kheLatahet sagaLe jaN...tu kay fakt pahat basNares ka tovar?..pudhe lihi ki aata...

    ReplyDelete
  7. barobar ahe nimish tuza... saglyanna kamala alaun hi aapli shant basli ahe...
    ani war roj lihite lihite mhanun aashwasana det aste...

    ReplyDelete
  8. च्यायला! भारीच खेळ चाललाय. एका पेक्षा एक मस्त लेख ... आणि छान जमलाय. लहानपणी आमच्या वाड्यातल्या पोरी "टप्पू दिला" खेळ खेळायच्या ... कोण म्हणतो टप्पू दिला .. अमक्या म्हणतो टप्पू दिला ... कारे अमक्या टप्पू दिला ... कोण म्हणतं टप्पू दिला ... तमक्या म्हणतो टप्पू दिला ... कारे तमक्या .....

    आणि हे सर्कल किती तरी वेळ चालायचं. म्हणजे तासऩतास निघून गेले तरी त्या पोरी अशाच फ़िरत रहायच्या.

    आवडला खेळ. मी मागल्या चार महिन्यात काहीच नाही लिहू शकलोय. पण अधनं मधनं वाचायला जरूर येतो. लिहीत रहा सगळे.

    ReplyDelete
  9. प्रयत्न केलाय ग लिहायचा :)
    या खेळाबद्दल धन्यवाद. लिहित गेले तशी विचारांना दिशा मिळत गेली

    ReplyDelete