दोन ब्लॅकाउट्सच्या मधल्या प्रवेशासारखी एक संध्याकाळ!

23:08:00

पावसानं गच्च दाटून अधिकच काळोखी, कातर केलेली संध्याकाळ. आधीच कासावीस वेळ. त्यात ही न कोसळणारी गुदमर. समोर पसरलेला लांबलचक हिरवागच्च शेताडीचा पट्टा. त्याला लागून असलेली जडावलेली गप्प गप्प खाडी. साऱ्याच्या निरंतरपणात भर टाकणारे पार क्षितिजापर्यंत वगैरे जाणारे आगीनगाडीचे फिलॉसॉफिकल रूळ आणि ऐन जुलैचा वेडसर वारा. या सगळ्याला अपुरेपण येऊ नये म्हणून की काय - चक्क चुकार बगळ्यांची एक पांढरीशुभ्र माळ.

सोबतीला एकटेपण. आसमंतात भरून राहिलेलं. कधी कोसळेल अंगावर त्याचा नेम नाही, पण तूर्तास तरी दबा धरून असलेलं. पावसासारखंच काळोखी करून.

आपल्या जिवात नेमकं काय चाललं आहे हे कळण्याची सुतराम शक्यता नसलेली गर्दी पार्श्वभूमीला पसरलेली. आपापल्या क्युबिकल्समधे, आपापल्या फोन्सवर, पीसींसमोर मश्गूल. त्यांच्यात आणि आपल्यात फक्त एका काचेच्या दरवाज्याचं अंतर. मागे स्वत:ला कामात बुडवून घेतली इमारत आणि आपण असे वारा अंगावर घेत सज्जात उभे.

मागचं-पुढचं सगळं काही क्षणांपुरतं नि:संदर्भ करून टाकत. काळाच्या मागच्या तुकड्यावर जे घडलं आहे त्याची जबाबदारी खांद्यावर पेलत, येणाऱ्या वाटेवर काय असणार आहे याबद्दल उत्सुक, पण पुरते बेखबर. सावध आणि बेसावधही. पूर्ण त्या क्षणाचे होऊन जाऊ पाहणारे. वर्तमानाच्या सतत धावत्या, निसटत्या तुकड्यावर जिवाच्या कराराने पाय घट्ट रोवून उभे असलेले.

धडधडणाऱ्या निर्दय शहराच्या कुशीत मिळून गेलेली ही शांत-निवांत-जिवंत संध्याकाळ.

यापरता अधिक आनंदाचा क्षण काय असू शकतो?

एन्जॉय...

You Might Also Like

12 comments

 1. ha sandhyakalimadhala ek kshan hota...please write about the rest...

  ReplyDelete
 2. Amazing!!तू एकदमच नेमक्या शब्दात लिहीलं आहेस...शुन्यपणा, निरर्थकता, परत एकदा पावसाचे चुकार संदर्भ. आपल्या शहरी संवेदनांचं वेगळं काय होऊ शकतं?

  ReplyDelete
 3. शीर्षक फारच जमून गेले आहे. एखाद्या छोट्या इनिंगची सुरुवात सर्जिकल स्क्वेअर कट् प्रमाणें व्हावी तसे. आणि हे छोटे टिपणही काव्यात्म झालेले आहे : किंचित् संध्याकाळीबद्दलचे आणि बहुश: निवेदिकेबद्दलचे. (काव्यात्म; काव्य नव्हे ) . पुन्हा एकदा, या लिखाणातील सिस्मोग्राफिक संवेदनशीलतेस सलाम.

  ReplyDelete
 4. Post sampave paryant mood change jhala vatata :)

  ReplyDelete
 5. शीर्षकाबद्दल धन्यवाद सौमित्रचे. कारण ’...आणि तरीही मी’ या त्याच्या कवितासंग्रहामधली एक कविता "दोन ब्लॅकाउट्समधल्या प्रवेशासारखं चाललंय आयुष्य..." अशी सुरू होते. त्यातला मूड इतका जवळचा वाटत होता, की तो या टिपणाला चपखल बसला..

  ReplyDelete
 6. नेमकं टिपलं आहेस बरंच काही...छान.....

  ReplyDelete
 7. " मागे स्वत:ला कामात बुडवून घेतली इमारत आणि आपण असे वारा अंगावर घेत सज्जात उभे."
  बाहेर काळोख झालाय, एकदम भरून आलंय आणि माझ्या मैत्रिणीने मला सांगितल्यावर मी खिडकीतून बाहेर पाहीलं आणि तुझ्या या पोस्टची आठवण झाली. :-) दोन जगांतलं एकमेकांशी अगदी वेगळं असलेलं वातावरण.....आताच अनुभवून आलेय. :-))
  म्हटलं तुला सांगावं.
  -विद्या.

  ReplyDelete
 8. सहज सुंदर भावूक आणि एकदम थोडक्यात उतरवलेली एक झकास संध्याकाळ.

  शेवटी कसं असतं ना ... हे अनुभव सगळ्यांचे सारखेच. पण तुझ्या सारखे साहित्यीक माझ्या सारख्या "normal" लोकांना ते शब्दात बांधायला मदत करतात.

  धन्यवाद!

  ReplyDelete
 9. Tujhyach shabdat sangaych tar 'maja yetey'! :)

  ReplyDelete
 10. chhanach lihilayes!! itakya chhan bhavuk lekhala comment hi tashich takadichi dyayala pahije, pan mala shabd kami padatahet!! :-)

  post suru karatanacha ani sampavatanacha mood ekdum vegavegaLe aahet na? asach hota baryachada lihun mann mokaLa hota, aNi anandi hi. :-)

  enjoy! ;)

  ReplyDelete
 11. gr8 going.............keep it up:)............vachat rahav.......khup kahi anubhavalela,pan tuzyasarakha shabdat mandata nahi ale...........

  ReplyDelete
 12. Really Nice Blog!!

  http://mimarathicha.blogspot.com

  ReplyDelete